औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय दात दंत आरोग्य आरोग्य

माझी दाढ प्रचंड किडली आहे, एका बाजूने कीड लागून पोकळ जागा झाली आहे तसेच बाहेर हिरडी पण सुजून तिथे तोंड आले आहे. डॉक्टरांना दाखवलं पण त्या गोळ्यांनी आणखीनच उष्णता निर्माण होत आहे, जबड्याला सूज येऊन आत ठणका मारत आहे. यावर काय घरगुती उपचार करता येतील?

5 उत्तरे
5 answers

माझी दाढ प्रचंड किडली आहे, एका बाजूने कीड लागून पोकळ जागा झाली आहे तसेच बाहेर हिरडी पण सुजून तिथे तोंड आले आहे. डॉक्टरांना दाखवलं पण त्या गोळ्यांनी आणखीनच उष्णता निर्माण होत आहे, जबड्याला सूज येऊन आत ठणका मारत आहे. यावर काय घरगुती उपचार करता येतील?

7
त्याची सुरवात असती तर घरघुती अथवा आयुर्वेदिक उपचारांनी बरी झाली असती..आता त्यावर एकच उपाय ती दाढ पुर्णपणे काढुन टाका. आणि त्याजागी चांदी किवा आता नविन दाढ सुद्धा बसवुन देतात..
याचे Video Youtube वर आपणास पाहता येतील
किंवा खालील प्रकिया करावी

कुचके झालेले दात वाचवण्यासाठी 

खूप किडून कुचके झालेले, तुटलेले दात आणि दाढा वाचवण्यासाठी आता आणखी एका मटेरियलचा शोध लागला आहे. या मटेरियलचे नाव आहे ‘फायबर पोस्ट’. हे मटेरियल खूप कठीण आणि भक्कम- एखाद्या काडीसारखे किंवा खिळ्यासदृश असते. रूट कॅनाल केलेल्या दाताच्या रुट कॅनालमध्ये हे मटेरियल खोचले किंवा रोवले जाते. या फायबर पोस्टचा एक भाग दाताच्या मुळात जातो, तर उर्वरित भाग दाताच्या कुचक्या आणि तुटलेल्या भागात जातो. अशा प्रकारे हे मटेरियल भिंतीत खोचलेल्या खुंटीसारखे तुटलेल्या दाताला आधार देते. नंतर या फायबर पोस्टवर कंपोझिट रेझिन मटेरियलचे ‘बिल्डअप फिलिंग’ करतात व त्यावरून दातावर ‘कॅप’ बसवतात. अशा रितीने प्रचंड किडलेला, कुचका दातही वाचतो. मात्र हे फायबर पोस्ट लावण्याचे काम तितकेच कौशल्याचे आहे.  
उत्तर लिहिले · 22/5/2018
कर्म · 530
5
तुमचे दात कितपत किडले आहे हे त्यावरून उपचार ठरवता येते... त्यामुळे दात किडला की प्रत्येकवेळी रुट कैनल करावेच लागते असे नाही.. पण दाताची किड त्याच्या आतल्या संवेदनाक्षम भागापर्यन्त पोहोचवून असह्य ठणका लागतो तेव्हा रूट कैनल उपचाराने दात वाचविणे शक्य आहे...
तुम्हाला भविष्यात याहुन अधिक त्रास नको व्ह्यायला म्हणून घरगुती उपायापेक्षा दाताचे डॉक्टर यांच्या कडून उपचार करुन घ्या...
घरगुती उपयाने आराम मिळतो पण मुळापर्यन्त इलाज होणे कठीण आहे... म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या...
उत्तर लिहिले · 22/5/2018
कर्म · 458580
0
दाढ किडल्यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत:

1. लवंग तेल:

उपाय: लवंग तेलामध्ये युजेनॉल (eugenol) नावाचे नैसर्गिक वेदनाशामक असते. कापसाच्या बोळ्यावर लवंग तेल घेऊन तो बोळा दुखणाऱ्या दाढेवर ठेवा.

फायदा: यामुळे तात्पुरता आराम मिळतो आणि वेदना कमी होतात.

2. मीठाच्या पाण्याचे गुळणे:

उपाय: एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून त्याने गुळण्या करा.

फायदा: मीठाच्या पाण्याने सूज कमी होते आणि तोंडातील जंतु दूर होतात.

3. हळद:

उपाय: हळदीमध्ये कर्क्युमिन (curcumin) असते, ज्यामुळे ती एक चांगली जंतुनाशक आणि दाह कमी करणारी ठरते. चिमूटभर हळद पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा आणि ती किडलेल्या दाढेवर लावा.

फायदा: यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.

4. लसूण:

उपाय: लसणामध्ये ॲलिसिन (allicin) असते, ज्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. लसणाची एक पाकळी ठेचून किडलेल्या दाढेवर ठेवा.

फायदा: यामुळे जंतुसंसर्ग कमी होतो आणि वेदना कमी होतात.

5. थंड शेक:

उपाय: बर्फाचा तुकडा एका कपड्यात गुंडाळून घ्या आणि त्याने चेहऱ्याच्या त्या भागाला शेक द्या जिथे दाढ दुखत आहे.

फायदा: थंड शेकमुळे सूज आणि वेदना कमी होतात.

6. ॲलोवेरा (कोरफड):

उपाय: ॲलोवेरा जेल किडलेल्या भागावर लावा.

फायदा: ॲलोवेरामध्ये दाह कमी करणारे आणि शांत करणारे गुणधर्म असतात.

सूचना:

  • हे सर्व उपाय तात्पुरते आहेत. दंतवैद्यांकडे जाऊन योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.
  • डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांमुळे उष्णता वाटत असेल, तर त्याबद्दल त्यांना नक्की सांगा.
हे उपाय करूनही आराम न मिळाल्यास, दंतवैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5220

Related Questions

दातांसाठी सर्वात चांगली टूथपेस्ट कोणती?
दात आणि दाढीला कीड लागली आहे, तर ती कीड कशी काढावी?
दात मजबूत करण्यासाठी काही उपाय आहेत का?
दातांवर अन्नाचा पिवळसर थर कडक झाला आहे तर त्याला काढण्यासाठी काही इलाज?
लहान मुलाला दात येत असताना त्रास झाल्यास काय करावे?
माझे वय ३७ वर्ष आहे आणि माझे समोरील खालचे दोन दात हलतात, ते पक्के करण्यासाठी काही उपाय सांगा आणि याचा वजनाशी काही संबंध असू शकतो का?
दातदुखीच्या कथा व्यथा तुमच्या शब्दांत लिहा?