2 उत्तरे
2
answers
मला दूध व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे आहे?
4
Answer link
दुग्ध व्यवसाय
दुग्ध व्यवसाय
शेतीपूरक परंपरागत व्यवसाय
शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो.
आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडेगाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार,जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात.
संगोपन
ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी असाव्यात. त्यांच्या संगोपनासाठी सर्व सोयी उपलब्धअसाव्यात. उदा. पिण्याचे पाणी, लाइट, वाहतुकीचा रस्ता, गोठा, शहर १०-२० कि.मी अंतरावर असावं. उपलब्ध क्षेत्राला हुकमी पाणी पुरवठयाची सोय असावी. नजीक पशुवैद्यकीय दवाखाना असावा. या किमान बाबी दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक आहेत.
दुधाळ गाई आणि म्हशीं
फायदेशीर दुग्धव्यवसायासाठी दुधाळ गाईची आणि म्हशींची निवड करावी. दुधाळ गायींची खास वैशिष्टये असतात. त्या वैशिष्ट्यांच्या गाई खरेदीकराव्या. त्याचप्रमाणे म्हशीही निवडाव्यात. दुग्ध्व्याव्सायाच्या दृष्टीने एका वितात गाईने साधारणपणे ३६०० लिटर दुध दिलं पाहिजे. म्हशीने २५०० लिटर दुध दिलं तर दुग्ध व्यवसाय फायदेशीर होतो. दुग्धव्यवसायासाठी नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या विटाच्या गाई किंवा म्हशी निवडाव्या. त्यांचं वय ३ ते ४ वर्षाच असावं. त्या वर्षाला एक वेत देणाऱ्या असाव्यात. निरोगी असाव्यात. गुग्ध व्याव्सायासाठी जर्सी, होल्स्तीन-फ्रिजीयन,देवणी, गिर, सिंधी, थारपारकर, या गाई पाळाव्यात. तर दिल्ली, मुऱ्हा, पंढरपुरी, जाफराबादी, या म्हशी पाळाव्यात.
आदर्श गोठा
गाई-म्हशीसाठीचा गोठा आदर्श असावा. गाई-म्हशींची संख्या १६ पर्यंत असेल तर एकेरी पद्धतीचा गोठा असावा. आणि १६ पेक्षा जास्त संख्या असेल तर दुहेरी गोठा असावा. तोंडाकडे तोंड,अगर शेपटीकडे शेपटी आणि मध्ये दोन मीटर रुंदीचा रस्ता अशी रचना असावी. शेपटीकडे शेपटी म्हणजे tail to tail हि रचना चांगली असते. तोंड खिडकी कडे असल्याने हवा मिळते. संसर्गजण्य रोग होण्याचा धोका नसतो. दुध काढणं सोयीचं होतं. गोठ्याची जमीन सिमेंटकोब्याची असावी. मुत्र वाहण्यासाठी शेपटीच्या दिशेने नाळी असावी. गोठ्याची उंची १४ ते १५ फुट असावी. ८ फुट भिंत आणि ४ फुट खिडकी ठेवावी. गाई-म्हशीला १.५ ते १.७ मीटर लांब आणि १ ते १.२ मीटर रुंद अशी गोठ्यात जागा असावी. भरपूर आणिस्वच्छ पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळ्या जागेत असावा. गाई-म्हशींना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या रोज ३% वाळलेला आणि हिरवा चार असावा. प्रत्येक लिटर दुधापाठीमागे ३०० ते ४०० ग्राम पशुखाद्य, तर ५० ते १०० ग्राम क्षारमिश्रण देणे महत्वाचं आहे. अ, ब, क, आणि ई जीवनसत्वासाठी हिरवा चारा दिलं गेलाच पाहिजे. म्हणजे दुधात घनपदार्थ (एसएनएफ) म्हणजेच जास्त फॅट मिळते. अलीकडे जैविक दुधनिर्मितीला महत्व प्राप्त झालेले आहे.
गाई-म्हशींना घटसर्प, फऱ्या, फाशी, ब्रुसेलोसीस हे जीवाणूजन्य आजार, तर देवी, बुळकांडी, लाल्याखुरकूत, रेबीज, डेंग्यू, हे विषानुजान्य रोग, गोचीडआणि जंत हे परोपजीवी रोग आढळतात. त्यासाठी लसीकरण करून घ्यावे म्हणजे जनावराचं आरोग्य चांगलं राहतं.
तंत्र दूधविक्रीचे...
एखाद्या दुग्ध प्रक्रियादाराचे यशस्वी होणे किंवा टिकून राहणे, हे सर्वस्वी ग्राहकांच्या त्या उत्पादनातील असणाऱ्या विश्वासावर अवलंबून आहे.यासाठी उत्पादकाने विक्री तंत्र, ज्ञान आणि कौशल्याची आवश्यकता आहे.
आपला विभाग आणि बाजारपेठेनुसार दूधविक्रीचे नियोजन करावे लागते; परंतु सर्वसाधारणपणे व्यवसाय पूर्ण क्षमतेने तग धरण्यासाठी; तसेच भविष्यातील वृद्धीसाठी काही गोष्टींचा विचार, अभ्यास आवश्यक आहे. बहुतेक वेळा नवीन लहान व मध्यम प्रक्रियादारांना विपणासंबंधी खूप कमी किंवा अजिबात अनुभव नसतो. व्यवसाय सुरू करताना काही प्राथमिक गोष्टींची प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.
पदार्थ वितरण व्यवस्था
वितरण व्यवस्था --------- मध्यस्थ
1) उत्पादक - ग्राहक ------------ 0
2) उत्पादक - फेरीवाले- ग्राहक --- 1
3) उत्पादक - प्रक्रियादार - ग्राहक - 1
4) उत्पादक - प्रक्रिया करणारा
किरकोळ विक्री - ग्राहक ------------- 2
5) उत्पादक - प्रक्रिया करणारा
किरकोळ विक्रेता - ग्राहक ----------- 2
6) उत्पादक - दूध सहकारी संघ-
प्रक्रिया करणारा - किरकोळ विक्रेता ग्राहक-- 3
7) उत्पादक - दूध वाहक - प्रक्रियादार
किरकोळ विक्रेता - ग्राहक ------------------ 3
टीप
मध्यस्थांच्या संख्येमुळे उत्पादक आणि ग्राहकांवर किमतीच्या बाबतीत फरक पडतो. विक्रीची जेवढी साखळी लहान तितका ग्राहकाला फायदा जास्त (कमी किमतीमुळे) आणि उत्पादकालाही चांगला नफा मिळतो. जास्तीच्या मध्यस्थामुळे पदार्थात भेसळीचे प्रमाण वाढण्यास एक प्रकारची संधीच मिळते.
विपणन आणि दूध, दुग्ध पदार्थांची किंमत
1) उत्पादनाची किंमत हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचा ग्राहकाच्या मागणीवर प्रभाव पडतो.
2) विक्रीसाठी उत्पादनाची किंमत ही स्पर्धात्मक हवी.
3) उत्पादनाच्या टप्प्यात दूध खरेदी, प्रक्रिया, पॅकेजिंग, कच्चा मालाची किंमत, साठवणूक, वितरण इ. खर्च कमीत कमी ठेवावा. किंवा हा खर्च कसा कमी राहील हे पाहावे.
दुग्ध पदार्थांच्या किमतीतील घटक
1) कच्चा दुधाची किंमत,
2) कच्चे दूध गोळा करणे, वाहतूक करणे,
3) प्रक्रियेचा खर्च
4) विपणन आणि वितरण यासाठी लागणारा खर्च,
5) पॅकेजिंगचा खर्च,
6) कर,
7) विक्री साखळीच्या प्रत्येक पायरीवरचा नफा (दूध गोळा करणे,प्रक्रिया आणि विक्रीतील मार्जीन)
पदार्थाच्या वास्तववादी किमतींसाठी
बाजारातील कार्य ---------------------- खर्चातील घटक
1) कच्चे दूध खरेदी -- कच्च्या दुधाचा खर्च, मजूर, लागणारी सामग्री, खरेदीतील मार्जीन
2) वाहतूक: मात्र वाहतुकीचा खर्च, सामग्री येणारा खर्च, वाहतुकीचे मार्जीन.
3) प्रक्रिया: कच्चा माल, त्यासाठीची यंत्रणा, उपकरणे, मजूर, पॅकेजिंग, वीज, वितरण आणि विपणन, प्रक्रियेतला मार्जीन.
4) मार्केटिंग आणि वितरण: वाहतूक, मजूर, सामग्री, भाड्याने देणे, किरकोळ विक्री मार्जीन.
टीप: स्थिर किंमती आणि बदलत्या किमती अशा श्रेणी पडतात. इमारत, यंत्रे यांचा घसारा इ. देखील यामध्ये ग्रहीत धरावा. हिशेब करताना खर्चाचे सर्व घटक ग्राह्य धरणे अभिप्रेत आहे.
विपणन माहितीची पद्धत आणि संशोधन
1) बऱ्याच ठिकाणी सर्व समावेशक विक्री माहितीचा अभाव असतो. अशा ठिकाणी प्रक्रियादाराने किंवा त्यांच्या संघटनेकडून छोटे मेळावे किंवा सभाआयोजित करून माहितीचा प्रसार करावा.
2) बाजाराचे लहान सर्वेक्षण किंवा ग्राहकाचा अभ्यास यांद्वारे माहिती संकलित करावी.
3) जो पदार्थ तुम्ही उत्पादित आणि विक्री करणार आहात, या संबंधीची जवळपास सर्व आवश्यक माहिती हवी. यामुळे कुठल्या प्रकारचा पदार्थ,कधी, कुठे आणि किती उत्पादित करावा आणि विक्री करावा यांचे ज्ञान होईल. यामुळे ग्राहकाला योग्य तो पदार्थ, योग्य त्या जागी निश्चित वेळेत पोहोचवल्यास तो ग्राहकांना उपलब्ध होईल.
नेमकी कोणती माहिती असावी ?
* कुठल्या विभागात विक्री करणार?
* किमतीविषयक माहिती (किमतीतील बदल सवलत इ.).
* एकूण ग्राहकांची संख्या आणि त्यांचे प्रकार.
* सध्याची आणि भविष्यातील उत्पादन- पुरवठा पातळी.
* बाजारातील स्पर्धेकांची संख्या आणि प्रकार.
* दुधाचे विपणन, प्रक्रिया यांच्या व्यवहार्यतेचा अभ्यास.
टीप: दूध व दुग्धपदार्थांची विक्री किंवा प्रक्रिया या व्यवसायात उतरताना अगोदर व्यवहार्यतेचा अभ्यास करावा. जेणेकरून नियोजित व्यवसायाची आर्थिक व्यवहार्यता सिद्ध होईल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्यवसायासाठी वास्तव्यकारक, वास्तववादी योजना करणे आवश्यक आहे.
व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी
* किती दूध उत्पादित होणार (सकाळ, संध्याकाळ).
* त्या विभागातील सध्या दुग्धपदार्थ विकले जाण्याचे मार्ग.
* स्थानिक उत्पादक किती पैसे घेतात? ताजे दूध तसेच प्रक्रिया पदार्थांच्या दराचा अभ्यास करावा.
* आपल्या भागत उत्पादित होणाऱ्या पदार्थांच्या चवीचे ज्ञान असावे. यावरून ग्राहकाला पदार्थ आवडतो का नाही हे ठरविता येईल.
* ऊर्जेचे स्रोत (इंधन, वीज, पाणी इ.)
* मुख्य गुंतवणूक (जमीन, इमारत, यंत्रे, वीज इ.).
* व्यवसायाचे स्पष्ट नियोजन. जे टिकून राहण्याची क्षमता व्यवहार्यता दर्शवेल.
व्यवसायाची मार्गदर्शक योजना
1. व्यवसायाचे वर्णन
* कुठल्या प्रकारच्या व्यवसायाचे नियोजन आहे?
* तुम्ही कशा प्रकारचे उत्पादन विकणार?
* बाजारपेठेत कशा प्रकारची संधी आहे? (नवीन, विस्तार, हंगामाप्रमाणे, वार्षिक).
* विक्रीच्या वाढीसाठी काय संधी आहेत?
2. विक्रीची योजना
* आपले संभावित ग्राहक कोण?
* तुमचा बाजारपेठेतील हिस्सा, बाजारपेठेत ग्राहकांच्यामध्ये उत्पादन कसे प्रसिद्ध होईल ते कसे टिकून राहील?
* तुमचे स्पर्धेक कोण? त्यांच्या व्यवसायाची कशी प्रगती होत आहे?
* तुमच्या उत्पादनाची विक्रीसाठी प्रयत्न कसे करणार?
* तुमचे पुरवठादार कोण?
* तुमचा व्यवसाय कोठे स्थिर आहे?
3. संघटित नियोजन
* व्यवसायाचे व्यवस्थापन कोण करेल?
* व्यवस्थापकासाठी कुठली शैक्षणिक अर्हता पाहाल?
* किती कर्मचाऱ्यांची गरज भासेल?
* पैशाचे नियोजन कसे कराल? (यामध्ये सुरवातीस आवश्यक गुंतवणूक ग्राह्य धरलेली आहे.)
* तुम्ही नोंदी कशा ठेवाल?
* कायदेशीर मालकी कशी निवडाल आणि का?
* कुठल्या प्रकारच्या परवान्यांची गरज आहे?
* कुठल्या नियमांचा व्यवसायावर परिणाम होईल?
4. आर्थिक नियोजन
* पहिल्या वर्षी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज.
* व्यवसाय सुरू करण्यास किती खर्च आवश्यक आहे?
* पहिल्या वर्षी फायदा घेण्यासाठी किती विक्रीची गरज आहे?
* उत्पादनात कसा विराम असेल?
* यंत्रांसाठी किती भांडवल आवश्यक आहे?
* एकूण किती पैशांची गरज आहे?
* संभवनीय निधीचा स्तोत्र.
* कर्ज कसं घ्याल? (तारण, सुरक्षितता)
विक्री तंत्रातील अनुभवाचे बोल
(लेखक कृषी महाविद्यालय, धुळे येथे कार्यरत आहेत)
आपल्या उत्पादनाच्या विक्रीत वाढ होण्यासाठी उत्पादनाला विशिष्ट "ब्रॅंड नेम' तसेच लोगो आवश्यक आहे. विक्री करताना पॅकेजिंगही चांगले हवे.
विक्रीचे नियोजन
* किरकोळ विक्रीसाठी विविध दुकाने, मॉल.
* हॉटेल्ससाठी रोज लागणारे पदार्थ म्हणजे पनीर, दही, चक्का. यात पनीर हा जास्त आवश्यक पदार्थ आहे.
* आचारी, जेवणाचे कंत्राट घेणारे यांच्याशी संपर्क ठवून त्यांना वेळोवेळी आवश्यक पनीर, दही, चक्का, खवा, बासुंदी, अंगुर रबडी, रसमलाई पुरवता येईल.
* आचारी, जेवणाचे कंत्राट घेणाऱ्या लोकांशी सतत संपर्क ठेऊन लग्नाच्या तारखेनुसार पदार्थांची आगाऊ नोंदणी करता येईल.
* लग्नसमारंभासाठीचे हॉल, लॉन्स यांच्या मालकांशी संपर्क ठेऊन त्या ठराविक दिवशी आवश्यक दुग्धपदार्थ पुरवता येतील.
* हॉस्पिटलसाठी आवश्यक, कमी फॅटचे दूध, चॉकलेट दूध इ. पुरवता येईल.
* आपल्या आजूबाजूच्या भागातील कॉलनीमध्ये काही खास दुग्धपदार्थांचे तांत्रिकदृष्ट्या आरोग्यासाठीचे महत्त्व पटवून देऊन दुग्धपदार्थ विकतायेईल.
* पदार्थाची पौष्टिकता, गुणवत्ता, त्यांची आवश्यकता (वैज्ञानिक दृष्टिकोनातून), तयार करतानाची स्वच्छता याचे संगणकावर सादरीकरण करूनग्राहकाचा विश्वास संपादन करता येईल.
दुग्ध प्रक्रिया उद्योगापूर्वी सर्वेक्षण महत्त्वाचे...
भारत जगात दुग्ध उत्पादनात आघाडीवर आहे. येत्या काळात दुधाची मागणी वाढती आहे, तर दुसऱ्या बाजुला आजही ग्रामीण भागात दुधाला शहरी भागाच्या तुलनेत हवा तितका दर मिळत नाही. देशाच्या एकूण दूध उत्पादनात 37 टक्के दूध हे दुग्धपदार्थांच्या प्रक्रियेसाठी वापरले जाते.यात 24 टक्के दूध हे अनियोजित क्षेत्रात वापरले जाते. येथेच दुग्धपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यास खूप मोठा वाव आहे.
अनेक जिल्ह्यांत हजारो बचत गट, विविध आर्थिक उन्नतीचे गट कार्यरत आहेत. अनेक जिल्ह्यांत विविध योजनांमार्फत गाई, म्हशींचे वाटप केल्यामुळे दुग्ध उत्पादनात काही ठिकाणी वाढही झालेली दिसते. "फ्लश सीझन' म्हणजे जास्त दुधाच्या काळात तर गाईचे दूध अनेकडेअऱ्यांमध्ये नाकारले जाते किंवा अत्यंत कमी दर मिळतो. हे लक्षात घेऊन गावातील तरुण गट, तसेच महिला बचत गटांनी एकत्र येऊन आपल्या गावातील, तसेच आसपासच्या इतर गावांतील शेतकऱ्यांकडून अतिरिक्त दूध गोळा करून ते पुढे विक्रीकरता न पाठवता प्रक्रिया केल्यास चांगली किंमत मिळू शकते. फक्त गरज आहे ती तंत्रज्ञानाची जोड व स्वच्छ, शुद्ध, उत्तम दुग्धपदार्थ पुरवण्याची.
दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरू करताना.... दूध प्रक्रिया करताना कुठले पदार्थ बनवावेत, यंत्रसामग्रीवर बराच खर्च करावा लागेल का, उत्पादित प्रक्रिया पदार्थ कोण घेणार, विक्री कशी करणार, पॅकेजिंगचे काय, ब्रॅंड तयार होईल का, असे अनेक प्रश्न व्यवसायास सुरवात करणाऱ्यांच्या मनात येतात.यासाठी पहिल्यांदा या उद्योगासंबंधी प्राथमिक अभ्यास महत्त्वाचा आहे.
दुग्धजन्य पदार्थांची मागणी -
1) गाव, शहर, निमशहर यानुसार पदार्थांची संख्या कमी-जास्त होऊ शकते. परंतु सर्वांगाने विचार केल्यास अनेक हॉटेल, ढाबे, जेवणाची कंत्राटे घेणारे, या सर्वांना पनीर, खवा, तूप, दही, चक्का इ. ठराविक प्रमाणात लागत असतो.
2) हॉटेल, ढाबे यांची पनीरसाठीची रोजची मागणी असतेच.
3) लग्नाच्या जेवणात गुलाबजाम, मिठाईसाठी खवा, चक्का, पनीर इ. आवश्यक असतो. शंभर माणसांसाठी गोड दुग्धपदार्थ- उदा. गुलाबजाम तयार करण्यासाठी अंदाजे पाच किलो खवा म्हणजेच 500 ते 700 माणसांसाठी 25 ते 35 किलो खवा हा कच्चा माल म्हणून लागेल. तसेच शंभर जणांसाठी जेवणासाठी एका भाजीत पनीर वापरावयाचे असल्यास साधारणपणे 10 किलो पनीर लागेल. थोडक्यात, बाजारपेठेत मागणी आहे. ही मागणी आपण शोधली पाहिजे.
विक्रीचे नियोजन -
1) कुठल्याही व्यवसायात मागणी एकदम वाढणार नाही. बचत गटांच्या विविध प्रदर्शनांतून, "ऍग्रोवन'ने भरवलेल्या प्रदर्शनातून स्टॉल्स लावल्यास मोठ्या प्रमाणात जाहिरात होऊन मागणी वाढते.
2) हॉटेल, ढाबे यांची दुग्धपदार्थांसाठीची रोजची मागणी असतेच.
3) लग्नसमारंभाची मागणी लक्षात घेऊन तेथील जेवण तयार करणाऱ्या आचारी लोकांशी संपर्क ठेवून अपल्या दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढविता येईल.
4) अशा प्रकारे मागणी वाढत गेल्यास आजूबाजूच्या शहरांतील शॉपिंग मॉल्स, सुपर शॉपी, दुकाने इ. ठिकाणी योग्य पद्धतीने पॅक केलेले दुग्धपदार्थविक्रीसाठी ठेवता येतील.
यंत्रसामग्रीची गरज -
1) छोट्या यंत्रांचा वापर करून शेतकऱ्यांच्या गटांना दूध प्रक्रियेच्या दृष्टीने लघुउद्योगांकडे वळण्यास मोठी संधी आहे.
2) खवा, पनीर, पेढा, श्रीखंड, लस्सी, क्रीम सेपरेशनसाठी लहान स्वरूपातील यंत्रे उपलब्ध आहेत.
3) विविध पदार्थांसाठी वेगवेगळ्या क्षमतेची बांधणीची यंत्रे महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. आपल्या उत्पादनानुसार ती विकत घेता येतील.
4) खवा उत्पादनासाठी कमीत कमी 40 हजारांपासून ते 2.5 लाखांपर्यंत यंत्रे उपलब्ध आहेत. पनीरसाठी साधा पनीर प्रेस 15-20 हजार, तर न्यूमॅटिक प्रेस हा 50 हजार ते 2.5 लाखांपर्यंत मिळू शकेल.
5) दुधातील साय वेगळी करण्यासाठी क्रीम सेपरेटरची किंमत 25 ते 40 हजारांपर्यंत आहेत. सुरवातीस एक किंवा दोन पदार्थांसाठी लागणारी यंत्रे खरेदी करून, गरजेनुसार इतर पदार्थांच्या निर्मितीसाठी यंत्रे विकत घेता येतील.
पॅकेजिंगसाठी डबे -
1) विविध दुग्धपदार्थांसाठी पॅकेजिंग मटेरिअल निवडताना मूळ पदार्थ व पॅकेजिंग मटेरिअलची गुणवत्ता विचारात घ्यावी.
2) सध्या बाजारात सहज उपलब्ध होणारे पीव्हीसी किंवा पॉलिप्रॉपिलीनचे प्लॅस्टिकचे डबे बासुंदी, गुलाबजाम, श्रीखंड, रसगुल्ला इ. साठी वापरतायेतील.
3) मिठाई ठेवण्यासाठी कागदापासूनची वेष्टने व प्लॅस्टिकचे वेगवेगळे प्रकार लॅमिनेट करून वापरता येतील.
4) अनेक प्रकारच्या प्लॅस्टिकची घनता, ताणशक्ती, ऑक्सिजनच्या प्रवेशक्षमतेमध्ये फरक असतो. या प्रकारच्या क्षमता तपासून त्या-त्याप्लॅस्टिकसंबंधी खात्री पटवता येते.
5) पनीर, मिठाईसाठी व्हॅक्यूम पॅकिंग वापरले जाते. नवीन तंत्रज्ञानामध्ये मॉडीफाइड ऍटमॉसफिअर पॅकेजिंग ऑक्सिजन ऍबसॉर्बर तंत्र उपलब्ध झाले आहे.
ब्रॅंडिंग महत्त्वाचे -
1) आपल्या उत्पादनाचा ब्रॅंड विकसित करण्यासाठी जाहिरातींबरोबरच स्वच्छ, शुद्ध, योग्य मूल्यवर्धित आणि पॅकेजिंग केलेले दुग्धपदार्थ तयार करणे खूप महत्त्वाचे आहे.
2) आजघडीला नवनवीन तऱ्हेने दुग्धपदार्थ उत्तमरीत्या पेश करून आपल्यासमोर येत आहेत. "मॉल' संस्कृतीमुळे एकच पदार्थ चार-पाच प्रकारे ग्राहकांसमोर येत आहेत.
3) बदलत्या जीवनशैलीमुळे पौष्टिक, शुद्ध, नैसर्गिक रंग आणि रसायनविरहित पदार्थांकडे कल वाढतोय. यासाठी स्थानिक उपलब्धतेनुसार दुग्ध पदार्थांत फळांचा वापर, कमी फॅटचे दुग्धपदार्थ, कमी कॅलरीजचे पदार्थ (कृत्रिम साखरेचा वापर), तंतुमय पदार्थांचा वापर अशा अनेक प्रकारे मूल्यवर्धन करता येईल.
4) दुग्धपदार्थ तयार करत असताना मिळणारे उप-उत्पादन- उदा.- स्किम मिल्क (फॅट नसलेले) जे साय काढल्यानंतर मिळते, निवळी जे पनीर,छाना तयार करताना मिळते, ताक इत्यादीवर छोटीशी प्रक्रिया करून विक्री करता येते. या प्रक्रियेच्या पद्धती अत्यंत सोप्या व सहज करता येण्याजोग्या आहेत.
5) ग्राहकाला उत्पादनाची गुणवत्ता पटवून दिली तर विक्रीत वाढ तर होईलच, तसेच ही माहिती "ब्रॅंड' बनवण्यासाठीही उपयुक्त ठरेल.
दुग्धपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण - कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालयातील पशुशास्त्र व दुग्धशास्त्र विभागांत आयोजित होणारे मेळावे, प्रशिक्षण यातून दुग्धपदार्थ निर्मितीची माहिती मिळेलच, तसेच दुग्ध महाविद्यालय, पुसद, विविध जिल्ह्यांतील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये प्रशिक्षण, माहिती मिळेल. आणंद, गुजरात येथील प्रशिक्षण दुग्धतंत्र महाविद्यालय प्रसिद्ध आहे. येथे पाच-सहा दिवसांचे दुग्धतंत्रातील विविध प्रशिक्षण कार्यक्रम शेतकरी, डेअरीतील तंत्रज्ञ यांच्यासाठी सुरू असतात. प्रशिक्षण, भोजन, निवास यांचा खर्च धरून साधारणपणे प्रशिक्षण कालावधीनुसार 4 ते 10हजार रुपये शुल्क आहे. याचबरोबरीने राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना येथेही प्रशिक्षण मिळते.
दूध उत्पादनावर परिणाम करणारे घटक
गाई-म्हशींपासून मिळणाऱ्या दुधाचे नमुने निरनिराळ्या ठिकाणी व वेळी गोळा करून त्यांचे रासायनिक पृथक्करण केल्यास, त्यातील घटक सारखेच असतात. परंतु घटकांचे प्रमाण हे वेगवेगळे आढळते. दूध व दुधाचे पदार्थ बनविताना व खाद्यान्न म्हणून त्यांचा वापर करताना हे फरक महत्त्वाचे ठरतात. दुधातील घटकांच्या प्रमाणावर परिणाम करणाऱ्या प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे -
1) जनावरांचा प्रकार - निरनिराळ्या प्राण्यांच्या दुधातील घटकांच्या प्रमाणात व दूध उत्पादनात प्राणीनिहाय फरक आढळतो. उदा. गाय, म्हैस, शेळी इ.
2) जनावरांची जात - एकाच प्रकारच्या जनावरांच्या अनेक जाती आढळतात. त्यांच्या जातीप्रमाणे दुधातील घटकांच्या प्रमाणात व दूध उत्पादनात प्राणीनिहाय फरक आढळतो. उदा. गाईमध्ये जर्सी, गौळाऊ; तर म्हशीमध्ये मुऱ्हा, जाफराबादी इ.
3) दुधाच्या काळाचा टप्पा - गाईच्या दुधाचा काळ जसजसा पुढे जातो, म्हणजे वाढतो तसतसे दुधात स्निग्धांशांचे प्रमाण थोडेसे वाढते. याउलट दूध तिसऱ्या महिन्यापर्यंत वाढून नंतर हळूहळू कमी होते व 9-10 महिन्यांत आटते.
4) गाईचे वय - पहिल्या वेतापासून तिसऱ्या वेतापर्यंत दूध व स्निग्धांशांचे प्रमाण थोडे थोडे वाढते. नंतर ते स्थिर राहून 12-14 वर्षे वयानंतर कमीहोते.
5) वैयक्तिक फरक - एकाच जातीच्या गाईंना सारखेच खाद्य दिले व व्यवस्थापनदेखील सारखेच असले, तरीदेखील त्यांचे दूध उत्पादन व दुग्धघटकांमध्ये फरक आढळतो. हा फरक आनुवंशिकतेच्या कारणामुळे होतो.
6) ऋतुमानानुसार फरक - दुधामध्ये स्निग्धांशांचे प्रमाण उन्हाळ्यात थोडे कमी व हिवाळ्यात थोडे अधिक असते. हाच फरक दूध उत्पादनातदेखील आढळतो.
7) दूध काढण्याच्या वेळांमधील अंतर - 24 तासांत दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये 12 तासांपेक्षा अधिक अंतर असेल, तर अधिक वेळानंतर काढलेल्या दुधाचे प्रमाण अधिक व स्निग्धांशांचे प्रमाण कमी राहील.
8) दोहनाच्या वेळचे, सुरवातीचे व अखेरचे दूध - गाईच्या एकाच वेळेच्या दोहनाच्या सुरवातीच्या धारांमध्ये स्निग्धांश कमी, तर शेवटच्या धारांमध्ये बराच अधिक असतो. हा फरक दोन-तीन टक्क्यांपर्यंत राहू शकतो.
9) विण्याच्यावेळी गाईची स्थिती - विण्याच्या काळात गाय धष्टपुष्ट असून अंगावर चरबी अधिक असेल, तर अशा गाईंमध्ये सुरवातीच्या काळातील दुधात स्निग्धांश अधिक राहून नंतर 15-20 दिवसांनंतर तो थोडा कमी होऊन स्थिर राहतो.
10) गाईचे खाद्य - खाद्याची कमतरता असल्यास, त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. मात्र दुधातील घटकांवर विशेष परिणाम होत नाही.त्यांना स्निग्ध पदार्थ खाऊ घातले तरी दुधातील स्निग्धांश 0.2 टक्क्यापेक्षा जास्त वाढणार नाही. त्याकरिता संतुलित आहार देणेच योग्य आहे.
आयुर्वेदिक/ वैदिक उपचार - आयुर्वेद/ वेदामध्ये खालीलप्रमाणे वनस्पतींचा उपयोग केला असता, दुधाचे फॅटचे प्रमाण वाढल्याचे दाखले सापडतात.थोड्या प्रमाणात हे प्रयोग करण्यास हरकत नाही.
अ) बरेच शेतकरी जनावरांना ढेपेऐवजी कापसाची सरकी खाऊ घालतात. ती तशीच न देताभरडून, भिजवून खाऊ घातल्यास दुधाचे/ फॅटचे प्रमाण वाढते.
ब) एरंडीची पाने जनावरास भरपूर खाऊ घातल्याने (एक महिना) दूध वाढते.
क)चवळीच्या ओल्या शेंगा अथवा बीज भिजू घालून ते भरपूर खाऊ घालावे, दूध वाढते.
ड) मेथी खाऊ घातल्यास दुधाबरोबरच जनावरांची आरोग्यशक्ती वाढते.
इ) अंबाडीचे बीज भरडून पाण्यात घट्ट शिजवून त्याचे गोळे खाऊ घातल्यास दूध वाढते.
ई) उडीद भिजवून भरपूर खाऊ घालावे (एक महिना).
फ) जनावरास भरपूर गाजरे खाऊ घातल्यानेही दूध वाढते.
ग) वासनवेल भरपूर खाऊ घातल्यानेही गाई-म्हशी भरपूर दूध देतात.
व्यवस्थापन -
अ) दूध एकाच माणसाच्या हाताने ठराविक वेळेतच (सहा ते आठ मिनिटे) काढावे.
ब) दूध काढण्याच्या वेळा ठराविक व समान अंतराने नियमित असाव्यात.
क) दूध काढताना सुरवातीच्या पहिल्या दोन ते तीन धारा आपण न घेता, जमिनीवर सोडून वाया घालविणे आवश्यक असते. कारण जनावराच्या स्तनांमध्ये बाह्य रोग जिवाणू, विषाणू जातात ते यामुळे बाहेर जातात. त्यामुळे हे जरूर करावे. परंतु शेवटची धार मात्र निपचून पूर्णपणे काढावी. कारण शेवटच्या धारेमध्ये फॅटचे प्रमाण वाढत-वाढत जाऊन सर्वाधिक असते. वासरू पान्हा सोडण्यासाठी किंवा दूध पाजण्यासाठी सुरवातीलाच पाजावे; शेवटी नव्हे.
ड) म्हशींना गाईप्रमाणे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पोळ तसेच खांदा नसतो.

0
Answer link
दुग्ध व्यवसाय: माहिती
दुग्ध व्यवसाय हा भारतातील एक महत्त्वाचा कृषी उद्योग आहे. दुग्ध व्यवसाय म्हणजे दुधाचे उत्पादन, प्रक्रिया आणि वितरण करणे.
दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी:
- जागा: गाई आणि म्हशींना बांधण्यासाठी तसेच चारा साठवण्यासाठी पुरेशी जागा असावी.
- गाई किंवा म्हशी: चांगल्या प्रतीच्या आणि जास्त दूध देणाऱ्या गाई किंवा म्हशींची निवड करणे आवश्यक आहे.
- चारा: गाई आणि म्हशींना नियमितपणे चांगला चारा देणे आवश्यक आहे.
- पाणी: गाई आणि म्हशींना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय करणे आवश्यक आहे.
- डॉक्टर: गाई आणि म्हशींची नियमित तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकाची (veterinarian) आवश्यकता असते.
दुग्ध व्यवसायाचे फायदे:
- दुग्ध व्यवसाय हा एक चांगलाSide business (part time business) आहे.
- दुग्ध व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळते.
- दुग्ध व्यवसाय ग्रामीण भागातील लोकांना रोजगार देतो.
सरकारी योजना:
दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना राबवते. या योजनांमध्ये कर्ज आणि अनुदानाचा समावेश असतो.