कायदा सण देव प्रक्रिया सामाजिक संस्था

गल्लीतील गणपती मंडळ रजिस्टर कसे करावे?

3 उत्तरे
3 answers

गल्लीतील गणपती मंडळ रजिस्टर कसे करावे?

5
गणपती मंडळीच रजिस्टर आत्ता ऑनलाईन झाले आहे



तुम्हला खाली एक लिंक देतो ह्या लिंक वर जाऊन तुम्ही नियम व अटी प्रमाणे रजिस्टर करू शकता



गणेश मंडळांची नोंदणी आता ऑनलाईन - https://www.deshdoot.com/ganesh-https://www.deshdoot.com/ganesh-mandal-registration-now-online/
-registration-now-online/


ह्या लिंक वर जा


तुम्हला सर्व माहिती डिटेल मध्ये मिळेल
Ganpati mandal registration
Ganpati mandal registration
उत्तर लिहिले · 21/3/2018
कर्म · 38690
5
आपणाकडे सार्वजनिक मंडळामार्फत गणपती ,शिवजयंती व नवरात्रोंत्सव साजरे करतात.यासाठीं मंडळ रजिस्टर करणे आवशयक असते.कोणतीही धर्मदाय संस्था, धार्मिक संस्था, अन्य कुठल्याही संस्था यांनी सार्वजनिक न्यास कायद्याअंतर्गत आपल्या संस्थेची नोंदणी करणे आवश्यक असते, हे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. कारण सार्वजनिक न्यासाकडे येणारी वर्गणी, देणगी, स्थावर मालमत्ता ही जाहीर करावी लागते. त्यामुळे पारदर्शकता निर्माण होते.
*♨️मंडळांची नोंदणी करण्याचे दोन प्रकार असतात.♨️*http://bit.ly/3aV1qqf

पहिला प्रकार म्हणजे काही मोठमोठी मंडळे महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायदा १९५0 अंतर्गत नोंदणी करतात. तर काही मंडळे कायमस्वरूपी नोंदणीकृत नसतात. त्यांच्यासाठी सार्वजनिक न्यास ४१ (सी) अंतर्गत अल्पकाळासाठी म्हणजे सहा महिन्यांपर्यंत नोंदणी करता येते. यात सर्व खर्च धर्मदाय आयुक्तांना दाखवावा लागतो. मुळात ज्या संस्था नोंदणीकृत असतात त्यांची घटना असते. या घटनेत तीन ते पाच वर्षे असा कालावधी दिलेला असतो. यात निवडणूक घ्यावी लागते. त्यानंतर जो बदल होतो तो धर्मदाय आयुक्तांना कळवावा लागतो. कार्यकारिणी, त्यानंतर दुसरी कार्यकारिणी असते.याआधी गणेशोत्सव मंडळांना स्वतः जाऊन संबंधित कार्यालयांना अर्ज द्यावा लागायचा. मात्र, आता सर्व गोष्ट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असल्याने खटाटोप कमी करण्यात आला आहे.
आता नोंदणी अॉनलाईन असुन नोंदणीसाठी धर्मादाय कार्यालयाच्या www.charity.maharastra.ov.in या वेबसाईटवरून नोंदणी करता येते.
अर्ज सादर करताना सदस्यांच्या सहीचा हस्तलिखित ठराव, सदस्यांच्या ओळखपत्राची प्रत, जागा मालकाचे परवानगी पत्र, प्रतिष्ठीत व्यक्ती यांचे सदस्यांच्या ओळखीबाबतचे पत्र, मागील वर्षीच्या उत्सवाचे हिशेब आणि मागील वर्षी घेतलेल्या परवानगीपत्राची प्रमाणित प्रत सादर करणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर या संबंधित माहिती अर्जदाराला ई-मेल द्वारे दिली जाईल. या सोबतच या ई-मेल मध्ये दिलेल्या तपशिलानुसार अर्जदाराने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे या साठी आवश्यक अशी रक्कम जमा करायची आहे.
काही अडचण असल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधल्यास त्यांना मार्गदर्शन करतात.
0

गल्लीतील गणपती मंडळ रजिस्टर करण्यासाठी खालील प्रक्रिया आहे:

  • नोंदणी कायद्यानुसार निवड: तुमच्या मंडळाची नोंदणी करण्यासाठी योग्य कायदा निवडा. तुम्ही खालील कायद्यांनुसार नोंदणी करू शकता:
    • सार्वजनिक न्यास अधिनियम (Public Trust Act): जर मंडळ धार्मिक किंवा धर्मादाय कारणांसाठी काम करत असेल, तर या कायद्यानुसार नोंदणी करता येते.
    • संस्था नोंदणी अधिनियम (Societies Registration Act): जर मंडळ सांस्कृतिक, सामाजिक किंवा शैक्षणिक कारणांसाठी काम करत असेल, तर या कायद्यानुसार नोंदणी करता येते.
  • आवश्यक कागदपत्रे: नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. साधारणपणे खालील कागदपत्रे लागतात:
    • अर्जाचा नमुना (Application Form)
    • मंडळाच्या सदस्यांची यादी (List of Members)
    • अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांचे आधार कार्ड आणि ओळखपत्र (Aadhar Card and ID Proof of President, Secretary, and Treasurer)
    • मंडळाचा उद्देश आणि नियम (Objectives and Rules of the Mandal)
    • स्थावर मालमत्तेचे कागदपत्र (Property Documents, जर मंडळ मालमत्तेचा मालक असेल तर)
    • नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC), जर आवश्यक असेल तर
  • अर्ज सादर करणे: आवश्यक कागदपत्रे घेऊन निबंधक कार्यालयात (Registrar Office) अर्ज सादर करा.
  • शुल्क भरणे: नोंदणी शुल्क भरा.
  • पडताळणी आणि नोंदणी: निबंधक तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील. सर्व काही ठीक असल्यास, ते तुमच्या मंडळाची नोंदणी करतील आणि तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) देतील.

अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या এলাকার निबंधक कार्यालयात संपर्क साधू शकता.

नोंद: कायद्यानुसार नोंदणीची प्रक्रिया किंचित बदलू शकते, त्यामुळे संबंधित कार्यालयाकडूनcurrent माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी उपयुक्त दुवे:

उत्तर लिहिले · 29/3/2025
कर्म · 1760

Related Questions

पत्नीने घटस्फोट घेतल्यास मुलांची जबाबदारी कुणाकडे असते?
पत्नीला पतीकडून घटस्फोट पाहिजे आहे परंतु पत्नी सरकारी नोकरीत आहे. तर पत्नीने पतीकडून घटस्फोट घेतल्यास पत्नीच्या नोकरीवर त्याचा काही परिणाम होतो का?
भारतीय न्याय दंड संहिता पीडीएफ मिळेल का?
मी १२ तास काम करतो आणि मला ओवरटाइमला थांबायचे नसेल, तरी मला जबरदस्तीने थांबवले तर मी काय करू?
कंपनीत कामावरून टोचर करत असेल तर मी न्याय कोणाकडे मागायचा?
मी एका कंपनीत काम करतो आणि मला अचानक कामावरून कमी केले आहे, तर मी न्याय कोणाकडे मागायचा?
परमिट रूम व बिअर बार यासाठी सार्वजनिक काय नियम आहेत?