5 उत्तरे
5 answers

पित्त कमी करण्यासाठीचे उपाय कोणते?

22
वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’

संजीव वेलणकर आरोग्य

‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे  आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. जन्माला येतानाच आपण ज्या प्रकारची प्रकृती घेऊन येतो, ती आयुष्यभर बदलत नाही. माणसाची शरीरयष्टी, शारीरिक गुण, स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं प्रकृतीवर अवलंबून असतं, असं आयुर्वेद मानतो. अर्थात तुमची प्रकृती वर दिलेल्या तीनपैकीच एक असली पाहिजे, असं नाही. काही जणांच्या बाबतीत ते दोषांचं मिश्रण देखील असू शकतं. हे सगळं जाणून घेणं उत्सुकता वाढवणारं असलं तरी आपली स्वत:ची प्रकृती कुठली हे आपल्या वैद्यांकडून तपासून जाणून घेतलेलं बरं. कारण त्यानुसार आपल्याला चालणारे आणि न चालणारे पदार्थ वेगळे असू शकतील.
पित्त प्रकृती
‘पित्त’ प्रकृतीच्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग सहसा गोरा आणि शरीरयष्टी मध्यम असते. त्यांची जीभ, टाळू, हाताचे तळवे, ओठ लालसर वर्णाचे असतात. केस पिंगट रंगाचे असतात आणि ते लवकर पिकतात. त्यांच्या त्वचेला सुरकुत्याही लवकर पडतात. ही मंडळी बुद्धीनं चांगली तीक्ष्ण असल्याचं बघायला मिळतं. यांना राग लवकर येतो. वारंवार भूक लागते आणि यांच्या आहाराचं प्रमाणही अधिक असतं. पित्त बिघडलं तर त्वचेवर लाल पुरळ येणं, फोड किंवा पस होणं, हातापायांचा दाह होणं, चक्कर येणं, भरपूर तहान लागणं, जेवायला अगदी १५-२० मिनिटांचा उशीर झाला तरी गळून गेल्यासारखं वाटणं अशा तक्रारी उद्भवतात.
पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
यांना अन्नात मधुर, कडू आणि तुरट रस चालेल. आंबट, खारट आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ मात्र यांनी प्रमाणातच खावेत. साजूक तूप, दूध, ताक, सरबतं, रसदार कोशिंबिरी (विशेषत: गाजर, काकडी इ.) गोड फळं, ताज्या रसदार भाज्या या व्यक्तींसाठी चांगल्या. पडवळाची भाजी यांच्यासाठी विशेष चांगली. रोजच्या जेवणातले पदार्थ बनवताना जिरे आणि धन्याची पूडही जरूर वापरावी. या लोकांनी आवळा जरूर खावा. आवळा चवीला आंबट असला तरी त्याचा विपाक मधुर असतो.
काय टाळावं-
यांना फार गरम अन्न चालत नाही. आहारात या व्यक्तींनी पापड, लोणची, आंबवलेले बेकरीचे पदार्थ, अतिमसालेदार पदार्थ टाळावेत. सिगारेट, अल्कोहोल, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन खरं तर सर्वानीच टाळलेलं चांगलं, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना या गोष्टींचा त्रास लवकर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या सवयी टाळाव्यातच.
वात प्रकृती
‘वात’ प्रकृतीच्या व्यक्तींची अंगयष्टी बारीक असते. त्यांचे केस, त्वचा, नखं रुक्ष असतात. त्यांना कमी झोप पुरते. या व्यक्ती सहसा बोलक्या असल्याचं दिसून येतं. नखं खाणं किंवा दात खाण्याची सवय त्यांना असते. यांना अन्न किंवा पेयं गरम आवडतात, गार यांना चालतच नाही. या व्यक्तींना बद्धकोष्ठाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. वात बिघडला किंवा चुकीचं काही खाण्यात आलं की वात प्रकृतीच्या व्यक्तींना त्वचा काळवंडणे, अंगदुखी, लवकर थकवा येणे, आवाज फाटणे किंवा चिरकणे, वजन कमी होणे असे त्रास होऊ शकतात.
वात प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
आहारात सहा रस मानले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट हे ते रस. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट आणि खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू आणि तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. या लोकांनी कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियांची चटणीही यांच्यासाठी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यांमध्ये या लोकांसाठी मूग चांगला.
वात प्रकृतीच्या व्यक्तींनी अन्न शक्यतो गरमच खावं. थंड आणि शिळं अन्न टाळावं. यांनी उपवास टाळावा. चणे, राजमा अशी द्विदल धान्ये रुक्ष आणि वात वाढवणारी असतात. ती टाळली तर बरे.
कफ प्रकृती
‘कफ’ प्रकृतीच्या व्यक्ती भरदार शरीरयष्टीच्या असतात. यांची हाडं मजबूत असतात. शारीरिक कामाचा झपाटा आणि स्मरणशक्तीही उत्तम असल्याचं दिसतं. हे लोक सहसा धैर्यवान असतात, म्हणजे त्यांना भीती कमी वाटते. यांना थंड किंवा शिळं अन्न आवडत नाही. ताजं आणि गरमच जेवण लागतं. कफ बिघडला तर या व्यक्तींचं वजन वाढलेलं बघायला मिळतं. दम लागणं, कफ होणं, पटकन अपचन होणं, अंग जड होणं, काहीच करायची इच्छा न उरणं अशा तक्रारीही कफ बिघडल्यामुळं होऊ शकतात.
कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
या व्यक्तींसाठी तुरट, कडू आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ चांगले. गोड, आंबट आणि खारट रसाचे पदार्थ मात्र यांनी कमीच खावेत. ज्वारी, नाचणी यांच्यासाठी चांगली. भाज्यांचे सूप उत्तमच. ते बनवताना हिंग, जिरे, मोहरी, लसूण यांचा वापर जरूर करावा. मसाल्याचे पदार्थ जरूर वापरावेत. यांनी पदार्थ तळण्यापेक्षा भाजून खाल्लेले बरे. आहारात जवसदेखील जरूर खावेत. जुने धान्य, जुना तांदूळ खावा.
काय टाळावं-
पचायला जड, स्निग्ध, तळलेले अन्नपदार्थ टाळावेत. बटाटा, रताळी यांसारखी पिष्टमय कंदमुळं टाळावीत. बटाटय़ाचे वेफर्स शक्यतो टाळलेलेच बरे. दही कमी खावे. कडधान्यात उडीद कमी खावेत. मिठाईही प्रमाणातच खावी. शिळे, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ नकोतच.

🌹आरोग्यम् धनसंपदा🌹
-------------------------------
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*

*पित्ता'वर विजय* *मिळवा१०घरगुती उपचारांनी*

*पित्ताची समस्या दूर करा . घरगुती उपायांनी !*

अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग  पित्तावर  उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली  विविध रूपातील  'एन्टासिड्स'(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पहा .

 *आरामदायी केळं*

केळ्यातून शरीराला  उच्च प्रतीच्या  पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल (acid ) निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच 'फायबर'  शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते.

पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.

*फायदेशीर तुळस* :

तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या  विषारी घटकांपासून बचाव करते.                  
तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा .

 *अमृतरुपी दुध* :

दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक  आम्ल निर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दुध खेचून त्याचे अस्तित्व संपवते . थंड दुध प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते.  

दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे . मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.

  *बहुगुणीबडीशेप*

बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते . बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते.

बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास  मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास , बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.

*पाचक जिर*ं :

जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते , ज्यामुळे पचन सुधारते , मेटाबॉलीझम  सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात .  

जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो . किंवा तुम्ही  जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी  थंड करून प्या. 

*स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग* :

लवंग चवीला तिखट असली तरीही  लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते . लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार  दूर होतात.

जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा , त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या . यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.

*औषधी वेलची*:

आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते . स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण  वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो.

पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट / सालीशिवाय ) ती पाण्यात टाकून उकळा , हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल .

*वातहारक  पुदिना* :

पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो . पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते .

पित्ताचा त्रास होतअसल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा . थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरदेखील पुदिना गुणकारक आहे. पुदिन्यातील 'मेन्थॉल' पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास , डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.

*आल्हाददायक आलं* :

आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो . आल्याच्या सेवनाने पचन सुधारते . तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो . आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते.

पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या . किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावरथोडा गुळ  टाकून चुपत रहा.

 *पित्तशामक आवळा* 

तुरट, आंबट चवीचा आवाळा  कफ आणि पित्तनाशक असून त्यातील 'व्हिटामिन सी' , अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते .

-रोज चमचाभर आवळ्याची पावडर / चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही .

- कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात.

 
*ग्रीनक्रॉस हेल्थ केयर आणि क्लिनिकल लॅब साठी संकलित*
दुर्गामाता मंदिरा शेजारी त्रिमूर्ती चौक नवीन नाशिक नाशिक
9371777900/9370777900/0253 2377900
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
उत्तर लिहिले · 19/8/2018
कर्म · 569245
14
ऍसिडिटी आणि पित्तावर घरगुती उपाय

ऍसिडिटी झाली असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खा.
सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने ऍसिडिटी कमी होते. 
खाण्यानंतर लवंग चघळण्यानेही ऍसिडिटीतून आराम मिळतो.
नेहमी ऍसिडिटीचा त्रास होण्यार्‍या लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या.
रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते. 
नियमित तुळशीचे सेवन ऍसिडिटी मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे.
जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते. 
तसेच मुळ्यावर लिंबू आणि  काळेमीठ घालून खाल्यानेही ऍसिडिटी कमी होते.
मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो. 
पित्ताच्या उलट्या होत असतील तर, फ्रिजमध्ये साखर घातलेले दूध थंड करा, त्यात बर्फ घालून प्या, उलटया त्वरीत थांबतात.

उत्तर लिहिले · 9/3/2018
कर्म · 458560
0
पित्त कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • आहार बदल:
    • थंड पदार्थ: ताक, दही, लिंबू सरबत, नारळ पाणी यांसारख्या थंड पदार्थांचे सेवन करा.
    • मसाले टाळा: तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा.
    • फळे आणि भाज्या: फळे आणि भाज्या भरपूर खा.
  • जीवनशैलीतील बदल:
    • तणाव कमी करा: योगा आणि ध्यान करा.
    • पुरेशी झोप: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
    • वेळेवर जेवण: जेवण वेळेवर करा आणि ते नियमित ठेवा.
  • घरगुती उपाय:
    • आले: आल्याचा चहा प्या किंवा आल्याचा छोटा तुकडा चघळा. WebMD
    • आवळा: आवळ्याचा रस प्या. Netmeds
    • तुळस: तुळशीची पाने चघळा किंवा तुळशीचा चहा प्या.
  • डॉक्टरांचा सल्ला:
    • जर पित्ताचा त्रास वारंवार होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे उपाय पित्त कमी करण्यास मदत करू शकतात.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1440

Related Questions

मुलगी पचवण्यासाठी काय करावे?
वस्तूंना जपावे आणि त्यांची काळजी घ्यावी?
गण्डयोग निवारण करण्यासाठी काय उपाय करावा?
आज सकाळी कोलगेट संपला यावर काय उत्तर आहे?
लिंबू सोडा पित्तामध्ये का घेतात?
दृष्ट कशी काढावी?
एखाद्याला रात्री झोपताना रामरक्षास्तोत्र, घोरकष्टोधरण स्तोत्र, मारुती स्तोत्र वगैरे म्हणूनही झोपेत स्वप्न पडून झोपेत व्यत्यय येत असेल, तर स्वप्न न पडण्यासाठी त्याने काय उपाय करावा?