व्यक्तिमत्व समाज समाजसुधारणा महाराष्ट्राचा इतिहास

संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणता उपदेश दिला?

4 उत्तरे
4 answers

संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणता उपदेश दिला?

10
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्‍न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वर्‍हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत.
उत्तर लिहिले · 15/1/2018
कर्म · 123540
1

संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणता उपदेश दिला?

उत्तर लिहिले · 9/11/2022
कर्म · 40
0

संत गाडगे महाराजांनी जनतेला दिलेला उपदेश खालीलप्रमाणे:

  • स्वच्छता: गाडगे महाराजांनी लोकांना स्वच्छता राखण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी स्वतः झाडू घेऊन गावे स्वच्छ केली आणि लोकांनाही स्वच्छता অভিযানে भाग घेण्यास प्रवृत्त केले.
  • शिक्षण: शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, त्यांनी मुलांना शाळेत पाठवण्याचा आग्रह धरला.
  • अंधश्रद्धा निर्मूलन: समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा आणि रूढीवादी विचार दूर करण्याचे कार्य त्यांनी केले.
  • साधे जीवन: गाडगे महाराजांनी साधे जीवन जगण्याचा आणि अनावश्यक खर्च टाळण्याचा संदेश दिला.
  • माणुसकी: सर्वांशी प्रेमळपणे वागण्याचा आणि गरजूंना मदत करण्याचा उपदेश त्यांनी दिला.
  • धर्म: "देव दगडात नाही, तर तो माणसांत आहे" हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले.

या उपदेशांच्या माध्यमातून गाडगे महाराजांनी समाजाला एक नवी दिशा दिली.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

छत्रपती शाहू महाराजांनी काय सुरू केले?
शाहू महाराजांचे कार्य स्पष्ट करा?
छत्रपती शाहूमहाराजांचे कार्य स्पष्ट करा?
छत्रपती शाहू महाराजांचे कार्य स्पष्ट करा?
संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणती उपदेश दिला?
सद गाडगे महाराजांनी जनतेला कोणता उपदेश दिला?
गाडगे बाबांच्या कीर्तनातील उपदेशाचे सार सांगा?