अन्न पोषण आहार

मटण चिकन खाण्याचे फायदे?

3 उत्तरे
3 answers

मटण चिकन खाण्याचे फायदे?

9
मटण व चिकन खाण्याचे भरपूर फायदे आहेत..
जाणून घेऊयात कोण कोणते फायदे होतात..

--चिकनमध्ये ट्रायप्टोफन आणि व्हिटॅमिन बी ५ हे दोन पोषक घटक असतात. यामुळे तुमचे शरीर आतून शांत होते आणि ताण-तणाव काही मनिटांतच दूर होतो. जर तुम्हाला कधी खूपच ताण आला असेल तर नक्कीच चिकनचे सेवन करा. याच्या चवीने तुम्ही तृप्त व्हाल. तसेच तुम्हाला शांत झोपही येईल..

▶मसल्स बनविण्यासाठी-

-चिकनला लीन मीट म्हटले जाते, याचा अर्थ कमी फॅट आणि जास्त प्रोटीन असते. ज्यांना आपल्या मसल्स बनवण्याचा शोक आहे त्यांनी उकडलेले चिकन अवश्य खावे..

▶हाडे मजबूत होतात-

-चिकनमध्ये फास्फोरस आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे हाडे मजबूत होतात. हाडे कमजोर असलेल्या व्यक्तीसाठी हा खूप चांगला आहार आहे. तसेच यामध्ये सेलेनियम असल्याने ते अर्थराईटिस या समस्यांवर गुणकारी ठरते..

▶हार्ट अटॅकपासून बचाव-

-यामध्ये व्हिटॅमिन बी ६ असते जे होमोसिस्टीन लेवल कमी करते. जर तुमच्या शरीरात होमोसिस्टीन असेल तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. परंतु चिकनचे सेवन केल्याने तुमचा यापासून बचाव होऊ शकतो..

▶कर्करोगावर गुणकारी -

-चिकन हा प्रोटीनचा खूप चांगला स्त्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी ३ असून ते कर्करोगाशी लढण्याची क्षमता देते. तसेच यातील सेलिनियम हे या आजारांपासून तुमचे रक्षण करते..

▶रोगप्रतिकारक क्षमता-

-चिकनमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि अनेक प्रकारचे मिनरल्स असतात. जे इम्यून सिस्टमला चपळ बनवते. सर्दी खोकला दूर करण्यासाठी उकडलेल्या चिकनमध्ये काळी मिरी मिसळून खाल्ल्याने आराम मिळतो. तसेच यात झिंक असल्याने एक वाटी सूप पिले तर तुमची भूक वाढण्यासही मदत होते..


धन्यवाद..!
उत्तर लिहिले · 26/11/2017
कर्म · 5210
1
Khup sare fayde ahet bava...
1-health
2-strength
3-heat increases
उत्तर लिहिले · 26/11/2017
कर्म · 1335
0

मटण आणि चिकन खाण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे:

मटणाचे फायदे:
  • प्रथिने: स्नायू आणि ऊतींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक.
  • लोह: हिमोग्लोबिन तयार करते, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन पोहोचतो.
  • व्हिटॅमिन बी 12: मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आणि डीएनए उत्पादनासाठी महत्त्वाचे.
  • झिंक: रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि जखमा भरण्यास मदत करते.
चिकनचे फायदे:
  • प्रथिने: भरपूर प्रमाणात प्रथिने असल्याने स्नायूंच्या वाढीसाठी उत्तम.
  • कमी चरबी: चरबीचे प्रमाण कमी असल्याने हृदयविकारांसाठी चांगले.
  • सेलेनियम: थायरॉईड कार्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी आवश्यक.
  • फॉस्फरस: हाडे आणि दातांसाठी उपयुक्त.

टीप: कोणताही आहार घेताना तो संतुलित असणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2200

Related Questions

कमी कॅलरीचे अन्न कोणते?
जेवण पोटभर जात नाही?
जेवण जात नाही?
एखाद्या व्यक्तीला एनर्जी एकदम कमी झाल्यावर लवकर एनर्जी येण्यासाठी काय करावे?
पसाभर बदामामध्ये किती प्रोटीन असते?
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी कोणता आहार घ्यावा?
100 ग्रॅम सोयाबीनमध्ये प्रथिने किती असतात?