मला कुक्कुटपालन व्यवसाय चालू करायचा आहे, मला त्याबद्दल माहिती पाहिजे.
मला कुक्कुटपालन व्यवसाय चालू करायचा आहे, मला त्याबद्दल माहिती पाहिजे.

कुक्कुटपालन: मुक्त-संचार
शेतकऱ्यांनी मुक्त संचार पद्धत अवलंबिल्यास त्याचे अनेक फायदे आहेत.
मुक्त पद्धतीने संभाळ केल्यास 100 पक्षी अगदी कमी वेळ आणि भांडवल खर्च करुन व्यवसाय सुरु करता येतो. एक दिवसाची पिल्ले विकत घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता.
कोंबड्या मोकळ्या सोडल्यास उत्पादन प्रति अंडे अणि प्रति पिल्लू खर्च कमी होतो. सुरुवातीचे काही दिवस उदाहरणार्थ ३ आठवडे पिल्लांची काळजी घेतली जाते. ब्रूड केल जाते. अणि त्यांचा अंगावर पंख तयार होऊ लागताच त्यांना परसामधे मुक्त फिरण्यासाठी सोडले जाते.
मुक्त संचार पद्धतीने कुक्कुट पालन करण्याचे फायदे
1 मजुरांवरील खर्च अणि खाद्यवरील खर्चा मधे बचत होते. फ़क्त नैसर्गिक शत्रु, कोल्हे, कुत्रे, मुंगुस यांपासून रक्षण करावे लागते.
2 सुधारित जातीचा कोंबड्या नैसर्गिकच स्वतःचे खाद्य शोधून पोट भरू शकतात. हे पक्षी परिसरामधे फिरून कीड़े, कोवळे गवत तसेच टाकाउ अन्न पदार्थ खाऊन जगतात.
4 सुधारित जातींचा कोंबड्या, गिरीराज, वनराज, RiR जाती कोंबड्या लवकर अंडी देण्यास सुरुवात करतात अणि जास्त अंडी देतात.
5 मुक्त संचार पद्धतिमधे कोंबड्या फ़क्त रात्री निवाऱ्यासाठी शेड मधे येतात त्यामुळे स्वछता करने अत्यंत सोप्पे असते.
व्यवसाय सुरु करण्यासाठी शेड ची उभारणी
शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्या नजिक किंवा शेता मधे शेड ची उभारणी करावी.

कुक्कुटपालन: शेड उभारणी
साधारण १ ते १.५ वर्गफूट (square feet) प्रति पक्षी ह्या हिशोबने आपल्या गरजेनुसार पक्क्या शेड ची उभारणी करावी.
मध्यभागी 10 ते 12 फुट उंच अणि दोन्ही बाजूस 8 ते 10 फुट उंची ठेवावी.
शेड ला 2 ते 3 फुट उंच भिंत असावी.
चिकन मेश या जाळीच्या साह्याने शेड बंदिस्त करावे.
जमिनीवर फरशी किंवा कोबा करावा.
कोंबड्यांना मुक्त संचारा साठी शेड ला लागून मोकळी कंपाउंड जाळी मारलेली जागा असावी.
नियोजन
अंडी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने पहिल्या दिवसा पासून स्वतंत्र नियोजन करावे.
गावरान अंडी उत्पादना साठी पक्षी संभाळताना चार मुख्य टप्प्यामध्ये व्यवसाय करावा लागतो.
गावरान जातीची किंवा गावरान क्रॉस जातीची एक दिवसाची पिल्ले घेऊन या व्यवसायची सुरुवात करावी। त्यासाठी आपल्या नाजिकच्या मध्यवर्ती अंडी उबवनि केंद्रातून पिल्ल खरेदी करवित।
१. ब्रूडिंग – ऊब
ब्रूडिंग कसे कराल
जेव्हा आपन मशीन च्या मदतीने पिल्ल जन्माला घालतो आणि विकत घेतो तेव्हा त्यांच्या सोबत त्यांची आई नसते. म्हणून त्याना कृत्रिम उष्णता द्यावी लागते, ज्याला शास्त्रीय भाषेत ब्रूडिंग करणे असे म्हणतात.
एक दिवसाच्या पिल्ला च्या अंगावर पीसे नसतात ते स्वतःचे तापमान नियंत्रित करू शकत नाहीत. यासाठी 2 व्हॉट प्रति पिल्लू एवढी कृत्रिम उष्णता त्यांना ब्रुडर मधून द्यावी.
सुधारित गावरान जातीची एक दिवसाची पिल्ल आणून त्याना कृत्रिम उष्णता दिली जाते. वयाचे एकवीस दिवस होई पर्यंत ब्रूडिंग केले जाते. या मधे पक्षी अत्यंत नाजुक रित्या हाताळला जातो.
ब्रूडर ची उभारणी कशी करावी
ब्रूडर म्हणजे कृत्रिम उष्णता देण्यासाठी तयार केलेली पेटी !
ब्रूडर गोल आकाराची असावी. त्यासाठी, शक्यतो प्लास्टिक किंवा पत्र्याच्या शीट चा वापर करावा. एका ब्रूडर ची क्षमता 100 ते 200 पिलांची असावी. जास्त गर्दी होउ देऊ नये.
ब्रूडर उभारताना एक ते दीड फुट उंचीच्या प्लास्टिक किंवा पत्र्याच्या 6 ते 8 फुट लांब शीटचे दोन्ही टोक जुळवून गोल आकार द्यावा. त्या मधे लाकडाचा भूसा किंवा भाताचे तुस लीटर मटेरियल म्हणून वापरावे. ज्यावर वर्तमान पत्राचा थर द्यावा. यामध्ये गरजेनुसार इंकैंडेसेंट बल्ब लवावेत जेणेकरून उष्णता निर्माण होईल. ही उष्णता कमी जास्त करण्यासाठी बल्ब ची उंची दोरी च्या साह्याने कमी जास्त करण्याची सोय करावी. बल्ब ला प्लास्टिक टब किंवा पाटी च्या साह्याने आच्छादन (कव्हर) करावे जेणे करुन उष्णता वाया जाणार नाही.
यामध्ये गरजेनुसार खाद्याची आणि पाण्याची भांडी ठेवावित. पिल्ले फार्म वर आणण्याआधी 24 तास ब्रूडर सुरु करुण योग्य रित्या चालत आहे अणि योग्य ते तापमान निर्माण करीत आहे याची खात्री करावी.
ब्रुडिंग करताना घ्यावयाची काळजी
ह्या अवस्थेत मरतुक होण्याची संभावना जास्त असते, त्यामुळे पुरेशी काळजी घेणे फार महत्वाचे असते.
– ब्रूडर चे तापमान योग्य राखने
– प्रामुख्याने खलील लसी देने
– लासोटा
– गंभोरो
– इन्फेक्शस ब्रोंकाइटिस
– फौलपॉक्स
– योग्य प्रमाणात प्रतिजैविक आणि जीवनसत्व द्यावीत.
– 18 ते 19 % प्रोटीन युक्त आहार ज्याला स्टार्टर म्हणतात तो द्यावा.
– 21 दिवस पूर्ण होताच पिल्ल ब्रूडर मधून लीटर वर हार्डेनिंग साठी सोडवित थोड़ी जागा वाढवावी.
एक दिवसाचे पिल्लू घेतल्यावर काय काळजी घ्याल ?
मध्यवर्ती अंडी उबवनि केंद्रातून किंवा खाजगी हॅचरी मधून एक दिवसाची पिल्ल 100 पिल्लू प्रति बॉक्स अश्या स्वरूपात पॅक करुन दिली जातात. शेतकऱ्यांनी पिल्ले पाहून विकत घ्यावीत. पिल्ले सुदृढ, निरोगी आणि चपळ असावीत. तसेच त्यांना पहिल्या दिवशी मरेक्स ही लस दिल्याची खात्री करावी.
पिल्ले प्रवासातून फार्मवर आणत असताना अलगद जास्त हेलकावे न देता आणावेत. फार्मवर पिल्ले पोहोचताच बॉक्स उघडून पिल्लांची मरतुक झाली आहे का ते पहावे. मेलेली पिले वेगळी काढावित. साधारण 1 लीटर उकळलेल्या पाण्यात 100 ग्राम गुळ किंवा एलेक्ट्रोल पाउडर मिक्स करुन, थंड करुन घ्यावे. नंतर प्रत्येक पिल्लाची चोच 2 ते 3 वेळा या पाण्यात बुडवून त्यास पाणी पिण्यास शिकवावे आणि नियंत्रित तापमान तैयार केलेल्या ब्रूडर मधे सोडावे.
पहिले काही तास गुळ पाणी पिने खुप महत्वाचे आहे. कारण गुळ पाण्यामुळे पिलांच्या आतड्यात असणारा चिकट पदार्थ बाहेर येऊन पोट वाहण्यास मदत होते. असे ना झाल्यास विष्ठेची जागा तुंबुन मरतुक होउ शकते.
साधारण 4 तासांनंतर मक्का भरडा किंवा तांदळाची कणी खाऊ घालावी. दुसऱ्या दिवशी चिक स्टार्टर हे खाद्य पदार्थ सुरु करावेत.
साधारण पहिले 21 दिवस ब्रूडिंग करावे. त्या नंतर पिलांच्या अंगावर पिसे तयार होऊ लागताच ते स्वतः च तापमान स्वतः नियंत्रित करू शकतात. या पुढे काही दिवस पिल्ल शेड मधे सोडावेत आणि नंतर कंपाउंड मधे मोकळे सोडावेत. एक महिना पूर्ण होताच पिल्लाना चिक फिनिशर हे खाद्य पदार्थ सुरु करावेत.
२. – ग्रोइंग – वाढ (4 ते 5 महीने)
ग्रोइंग स्टेज मधे पक्षांची वाढ घ्यायची असते. या अवस्थेत नर आणि मादी पक्षी वेगळे करावेत आणि अनावश्यक नर विकुन टाकावेत किंवा मांस उत्पादनाच्या दृष्टीने स्वतंत्र वाढ़वावेत.
या काळात योग्य शारीरिक वाढ अत्यंत महत्वाची असते. त्यांना मुक्त संचार उपलब्ध करावा व ग्रोवर फीड खाऊ घालव ज्यात 15 ते 16 % प्रोटीन असेल. योग्य प्रमाणात खनिज मिश्रण तसेच जिवनसत्वांचा पुरवठा अपेक्षित आहे.
खालील लसी देऊन घ्याव्यात.
लासोटा बूस्टर
फौलपॉक्स बूस्टर
३. लेयिंग – अंडी घालणे ( 6 ते 18 महीने)
वयाच्या 24 आठवड्यानंतर पक्षी अंडी देण्यास सुरुवात करतात.
या अवस्थे नंतर आपले उत्पादन सुरु होते.
या काळात पक्षांना 18 ते 19 % प्रोटीन युक्त आहार ज्याला लेयींग मेष म्हणतात तो द्यावा. त्यासोबत 5 % कैल्शियम स्त्रोत द्यावा. तसेच अंडी घालण्यासाठी नेस्ट बॉक्स पुरवावेत प्रति 5 कोंबडी एक या प्रमाणात. साधारण वयाच्या 72 आठवड्यांपर्यंत उत्पादन घ्यावे.
४. मौल्टिंग स्टेज
72 आठवडे अंडी दिल्यानंतर पक्षी मौल्टिंग अवसस्थेत जातात, ज्यामधे पक्षी आपले पीसे गाळतात आणि त्याजागी नविन पीसे उगावतात. शक्यतो या अवस्थेत पक्षी कत्तलीसाठी विकावेत. या टप्प्यानंतर उच्च अंडी उत्पादन मिळत नाही.
उत्पन्न-खर्च
शेतकऱ्यांनी एक दिवसाच्या पिल्ला पासून सुरुवात करावी. एक दिवसाचे पिल्लू घेऊन ते अंडयावर येई पर्यंत अंदाजे 120 ते 150 रुपये खर्च होतो.
100 कोंबड्यांपैकी 60 ते 70 माद्या निघाल्यास 40 ते 45 अंडी अंदाजे दररोज मिळणे अपेक्षित आहे. बाजारात या अंडयाला 5 ते 8 रुपये दर मिळतो. येथे आपला एक अंडे तयार करायचा खर्च 2 ते 3 रूपये एवढा होतो.
अंडीविक्रीतील उत्पन्नासोबतच उत्तम असे कोंबडी खत देखील मिळते. घरातील वाया गेलेले अन्न, भाजीपाला, धान्य किंवा आंतरपीक म्हणून घेतलेली मक्का यांचा वापर केल्यास उत्पादन खर्च आणखी कमी करता येऊ शकतो.
72 आठवड्यांपर्यंत उत्पादन घेऊन नंतर हे पक्षी कत्तल केले जावेत. यावेळी सर्वसाधारण 150 ते 200 रूपयाना विकले जातात. हे अतिरिक्त उत्पन्न आणि अतिरिक्त नफा ठरतो.
स्वछ पाणी, योग्य आहार आणि वेळापत्रकानुसार लसीकरण पुरवल्यास घरच्या घरी गावरान कुक्कुटपालन हा अतिशय उत्तम असा व्यवसाय होउ शकतो. आणि अनेक शेतकरी सध्या असे उत्पन्न मिळवत देखील आहेत. गावरान अंडी उत्पादन हे उद्दीष्ट ठेवून कुक्कुट पालन करने अत्यंत फायदेशीर ठरत आहे. गावठी अंडया ला नेहमी चांगला दर मिळत आलेला आहे.
कुक्कुटपालन विषयी माहिती मिळेल का? त्यासाठी गुंतवणूक किती करावी लागते?
कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry Farming Business) सुरू करण्याची माहिती:
कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:
-
व्यवसाय योजना (Business Plan):
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एक तपशीलवार योजना तयार करणे आवश्यक आहे. यात गुंतवणुक, जागेची निवड, पक्ष्यांची निवड, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन आणि विक्री योजना यांचा समावेश असावा.
-
जागेची निवड (Location):
कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी योग्य जागा निवडणे महत्त्वाचे आहे. जागा शहरापासून दूर असावी, जेणेकरून प्रदूषण आणि गोंगाट टाळता येईल. पाण्याची आणि विजेची सोय असावी.
-
पक्ष्यांची निवड (Selection of Birds):
आपण कोणत्या प्रकारचे कुक्कुटपालन करू इच्छिता, त्यानुसार पक्ष्यांची निवड करावी. मांस उत्पादनासाठी बॉयलर (Broiler) आणि अंडी उत्पादनासाठी लेअर (Layer) पक्षी उपलब्ध आहेत.
-
व्यवस्थापन (Management):
पक्ष्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यांना वेळेवर खाद्य आणि पाणी देणे, त्यांची नियमित तपासणी करणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
-
खाद्य व्यवस्थापन (Feed Management):
पक्ष्यांसाठी योग्य आणि पौष्टिक खाद्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. बाजारात विविध प्रकारचे खाद्य उपलब्ध आहेत, जे पक्ष्यांच्या गरजेनुसार वापरले जाऊ शकतात.
-
आरोग्य व्यवस्थापन (Health Management):
पक्ष्यांना नियमित लसीकरण (Vaccination) करणे आवश्यक आहे. त्यामुळे ते रोगांपासून सुरक्षित राहतात. वेळोवेळी पशुवैद्यकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
-
मार्केटिंग आणि विक्री (Marketing and Sales):
उत्पादित अंडी आणि मांस यांची विक्री करण्यासाठी योग्य बाजारपेठ निवडणे आवश्यक आहे. आपण थेट ग्राहक, हॉटेल, रेस्टॉरंट किंवा बाजारात विक्री करू शकता.
-
कर्ज आणि सरकारी योजना (Loan and Government Schemes):
कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकार विविध योजना पुरवते. राष्ट्रीय पशुधन अभियाना (National Livestock Mission) अंतर्गत कर्ज आणि अनुदान उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी, आपण आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग किंवा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी काही उपयुक्त संकेतस्थळे:
- कृषी विभाग, महाराष्ट्र शासन: krishi.maharashtra.gov.in
- राष्ट्रीय पशुधन अभियान: dahd.nic.in
हे काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्यांच्या आधारावर आपण कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करू शकता.