ग्रंथ आणि ग्रंथालय व्यक्तिमत्व लिखाण इतिहास

कौटिल्य बद्दल माहिती मिळेल का आणि त्यांचे ग्रंथ कोणकोणते आहेत?

2 उत्तरे
2 answers

कौटिल्य बद्दल माहिती मिळेल का आणि त्यांचे ग्रंथ कोणकोणते आहेत?

6
चाणक्य (अंदाजे ईसापूर्व 375 - ईसापूर्व 283) चन्द्रगुप्त मौर्य चे महामंत्री होते, ते 'कौटिल्य' नावाने देखील विख्यात आहेत. त्यांनी नंदवशाचा नाश करून चन्द्रगुप्त मौर्य ला राजा बनवला.

ग्रंथ:-

दोन पुस्तकांचे श्रेय चाणक्य यांना जाते: अर्थशास्त्र आणि चाणक्य नीती, याला चाणक्य नीतीशास्त्र असेही म्हणतात.

चाणक्य यांनी प्राचीन भारतीय राजकीय ग्रंथ, अर्थशास्त्र लिहिला.  म्हणूनच, त्यांना भारतातील राजकीय विज्ञान आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील अग्रगण्य समजले जाते आणि त्याचे काम शास्त्रीय अर्थशास्त्राचे महत्त्वपूर्ण पुरावे म्हणून मानले जाते.

अर्थशास्त्र: आर्थिक आणि आर्थिक धोरणे, कल्याण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि युद्ध धोरण तपशील . हा मजकूर शासकांच्या कर्तव्याची रूपरेषा देतो.

सर्वसाधारण परिचय:

निवास: पालिपुत्र

दुसरी नावे:  कौटिल्य, विष्णुगुप्त

शिक्षण : तक्षशिला येथे

पदवी :  चंद्रगुप्त मौर्य चे महामंत्री

धर्म: हिंदू

चंद्रगुप्त यांच्या बरोबर चाणक्य ची मैत्रीची कथा अशी आहे-

पालिपुत्राचे राजा नंद यांनी त्याच्या राज्यात यज्ञ केला होता. त्यामध्ये चाणक्यही गेले आणि एका खुर्चीवर जाऊन बसले. महाराज नंदने त्यांच्या काळ्या रंगाकडे बघून खुर्चीवरून उठवले. या गोष्टींमुळे त्यांनी प्रतिज्ञा केली की जोपर्यंत नंदवशाचा नाश करणार नाही तोपर्यंत केसांची शेंडी बांधणार नाही आणि नंतर चांद्रगुप्तला बरोबर घेऊन त्यांनी नंद साम्राज्यविरुद्ध युद्ध केले, ज्यात नंद राजाचा पराभव करून नंद वंशाचा नाश केला.

Income tax department ने 150 वर्षे पूर्ण झाल्यावर चाणक्य यांच्यावर 150 रुपयांचे नाणे काढले होते.
यावरूनच चाणक्य यांच्या अर्थनीतीचे महत्व लक्षात येऊ शकते.

http://m.hindustantimes.com/delhi-news/rs-150-commemorative-coin-released/story-YPZfIlIgeNwPu4yVwpQxVL.html

उत्तर लिहिले · 8/10/2017
कर्म · 13530
0
कौटिल्य हे एक प्राचीन भारतीय अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि राजकारणी होते. ते चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार आणि मंत्री होते, ज्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली. कौटिल्य यांना चाणक्य आणि विष्णुगुप्त या नावांनी देखील ओळखले जाते.

कौटिल्याबद्दल माहिती:

  • जन्म: इ.स. पूर्व ३७५ (अंदाजे)
  • मृत्यू: इ.स. पूर्व २८३ (अंदाजे)
  • शिक्षण: तक्षशिला विद्यापीठ
  • व्यवसाय: शिक्षक, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी
  • महत्वपूर्ण योगदान: मौर्य साम्राज्याची स्थापना, अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखन

कौटिल्यांचे ग्रंथ:

  1. अर्थशास्त्र: हा कौटिल्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे. यात राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा आणि लष्करी धोरणे यांसारख्या विषयांवर विस्तृत माहिती दिलेली आहे. हे पुस्तक मौर्यकालीन भारताच्या प्रशासकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवनावर प्रकाश टाकते. britannica.com

कौटिल्यांचे विचार आजही उपयुक्त आहेत आणि अनेक क्षेत्रांमध्ये मार्गदर्शक ठरतात.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5400

Related Questions

भारतीय आकाशवाणीची वाटचाल थोडक्यात लिहा?
बलुतेदारी व्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
भाऊसाहेबांच्या बखरीचे स्वरूप स्पष्ट करा?
संत नामदेवांचा जीवन परिचय लिहा?
यादवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक परीस्थितीचे वर्णन करा?
यादवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णन करा?
औद्योगिक क्रांती काळातील यंत्रशोधांवर टिपा लिहा?