2 उत्तरे
2 answers

मतिमंद म्हणजे काय?

4

अपूर्ण बौध्दिक वाढ ही एक मोठया प्रमाणावर आढळणारी समस्या आहे. मतिमंद म्हणजे 70 पेक्षा कमी बुद्ध्यांक . बुद्ध्यांक म्हणजे शारीरिक वय आणि मानसिक वय यांची तुलना. मानसिक वय भागिले शारीरिक वय, गुणिले 100म्हणजे बुद्ध्यांक. शारीरिक वय आपल्याला माहीत असते किंवा जन्मतारखेपासून काढता येते. मानसिक वय काढण्यासाठी चाचण्या असतात. पण या बुद्ध्यांक चाचणीशिवायही अंदाजाने मुलाची मानसिक वाढ पुरेशी आहे की कमी आहे हे सांगता येते. आपल्या समाजात सुमारे तीन टक्के व्यक्ती मतिमंद असतात असे आढळून आले आहे. मतिमंदत्वाचे साधारण, मध्यम व अतिमतिमंदत्व असे तीन प्रकार पाडता येतील. अपेक्षित मानसिक वाढीचा पाऊण हिस्सा, अर्धा हिस्सा, पाव हिस्साच मानसिक वाढ असेल तर अनुक्रमे साधारण, मध्यम व अतिमतिमंदत्व आहे असे म्हणता येईल. या गटवारीचा उपयोग त्याच्या उपचाराचा व शिक्षणाचा विचार करताना होतो. मानसिक अथवा बौध्दिक वाढ पडताळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आईवडिलांना माहिती विचारणे
उत्तर लिहिले · 26/9/2017
कर्म · 9760
0

मतिमंदता, ज्याला बौद्धिक अक्षमता देखील म्हणतात, ही एक विकासात्मक अक्षमता आहे जी बुद्ध्यांक (IQ) पातळी आणि अनुकूली वर्तणूक या दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण मर्यादा दर्शवते.

व्याख्या:

  • बुद्ध्यांक (IQ) पातळी: सरासरी बुद्ध्यांक 100 असतो. मतिमंद व्यक्तींचा बुद्ध्यांक साधारणपणे 70 पेक्षा कमी असतो.
  • अनुकूली वर्तणूक: यामध्ये सामाजिक आणि व्यावहारिक कौशल्ये कमी असणे, जसे की संवाद साधण्यात, स्वतःची काळजी घेण्यात आणि सामाजिक परिस्थितीत जुळवून घेण्यात अडचण येणे.

कारणे:

  • आनुवंशिक घटक
  • गर्भावस्थेदरम्यान समस्या
  • बाळंतपणानंतर उद्भवणाऱ्या समस्या
  • आजारपण किंवा अपघात

प्रकार:

  1. सौम्य मतिमंदता (Mild)
  2. मध्यम मतिमंदता (Moderate)
  3. तीव्र मतिमंदता (Severe)
  4. अति तीव्र मतिमंदता (Profound)

मतिमंदता एक जटिल स्थिती आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये तिची तीव्रता आणि लक्षणे वेगवेगळी असू शकतात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1040

Related Questions

माझी आत्महत्या करण्याची इच्छा आहे, तुम्ही मला मदत करू शकता का?
मला आत्महत्या करायची आहे?
आत्महत्या कशी करावी बर?
मी खूप स्वतःच्या वागण्याला कंटाळलो आहे, आत्महत्या करून जीवन संपवायचे आहे, काय करू?
मी आज आत्महत्या करणार आहे, काय करू?
मी आज रात्री ठीक ४ वाजता आत्महत्या करणार आहे?
मन शांत कसे करायचं?