व्यवसाय व्यावसाईक डावपेच व्यवसाय मार्गदर्शन दूध व्यवसाय उद्योग

स्वतःचा business करायचा आहे, काय करावा? कृपया एखाद्या चांगल्या business ची idea द्या आणि तो कसा सुरू करावा?

3 उत्तरे
3 answers

स्वतःचा business करायचा आहे, काय करावा? कृपया एखाद्या चांगल्या business ची idea द्या आणि तो कसा सुरू करावा?

0
.
               "मराठी तरुणांनो विचार तर करा"
"महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्यांना काम नाही, बाहेरचे येऊन काम घेतात!" हे तर पळाले, आता प्लॅनिंग करायला घ्या हे यायच्या आत की आपण आता

- टॅक्सी चालवू शकता,

- कपड्यांना इस्त्री करू शकता,

- रंग काम, POP काम, फर्निचर करू शकता (खूप पैसा आहे यात, साईट वरचे कॉन्ट्रॅक्टर तर मस्त हाय एन्ड कार ने फिरतात, त्यांच्या कामगारांना 500 - 1500 रोज पगार आहे, ते आपापल्या स्किल वर अवलंबून असते...फक्त खूप मेहनत करावी लागते "घड्याळ घरी ठेवून", कमिटमेंट पाळाव्या लागतात, आणि सर्वात महत्वाचे, फोन उचलावे लागतात)

- पाणी पुरी विकू शकता (भरपूर पैसा आहे यात)

- कच्छि दाबेली, वडापाव विकू शकता, सॅन्डविच विकू शकता (एक हातगाडी वाला - रोज किमान 100 प्लेट विकतो x रू.15 = 1500, किमान 50% मार्जिन आहे = 750 x 30 = 22500 रु. महिना खिशात)
हे किमान आहे बरं का लक्षात ठेवा.... किमान.... तसे तर काहीजण 500-500 प्लेट विकतात रोज.... किमान
वडापाव विकणे म्हणजे काय साधे काम नाही, पुण्यातल्या वडापाव च्या गाड्यावर इन्कमटेक्सच्या रेड पडलेला पुण्याचा इतिहास आहे... माहिती आहे ना?

फळं, भाज्या विकू शकता.
पान विकू शकता, केवढं मार्जिन आहे यात...

करायचं म्हटलं तर कसाही पैसा कमवू शकतात,

आता आपला पुण्यातील कल्याण भेळ वाला, रस्त्यावर भेळ ची गाडी होती म्हणतात पूर्वी, पण क्वालिटी देऊन देऊन आज कितीतरी AC फ्रांचायजीज आहेत भेळेच्या... विचार तरी केला होता का की किमान 400 sqft AC भेळ रेस्टॉरंट???

मानकर डोसा वाले... ठिक ठिकाणी,

येवले चहा,

चितळे - यांच्या फ्रांचायजी बद्दल काय बोलणे!

बेडेकर मिसळ, श्रीकृष्ण मिसळ, काटाकीर मिसळ वाले
ज्याला ज्या पद्धतीची चव आवडते तिकडे तो मिसळ खायला जातो.

देसाई आंबेवाले, म्हणजे फळवलेच ना?
दरवर्षी फक्त...  बरं का फक्त 11000 आंबे दगडूशेठ गणपतीच्या चरणी दान करतात... 11000 आंबे दान कशाला म्हणतात??

अजून काय काय उदाहरणे देऊ???

दुर्गा कॉफी, किती फ्रांचायजी आहे यांच्या???? किती मोठे झाले???

हि सर्वच्या सर्व मराठी माणसे आहेत ना? छोट्यातुनच मोठे झाले आहेत हे सगळेच्या सगळे, आयते काही नाही मिळाले यांना, हातावर हात धरून कोणीतरी मदतीला येईल म्हणून नाही बसले... स्वतः उठले, ध्येय ठेवले, मेहनत केली, योग्य प्रकारे पैशांचे व्यवहार ठेवले, व्यवस्थित व्यवसायात इन्व्हेस्ट करून पैशाने पैसा जोडला...
फक्त तीनच नियम पाळले यांनी... #क्वालिटी #साफसफाई #वर्षानुवर्षे_तीच_चव आणि माऊथ पब्लिसिटी...

यश लगेच मिळत नाही, वेळ लागतो...
एका रात्रीत मिळालेले यश लगेच ढेपते, पण वेळ लागून मिळालेले यश कायम टिकते...

तर,
कारणं सांगत बसू नका... आणि रडत तर अजिबात बसू नका, कमी येणार नाही मदतीला...
आपल्या लोकांचा सर्वात मोठा ड्रॉ बॅक म्हणजे नेत्यांच्या मागे दादा, ताई साहेब, भाऊ, अण्णा करत वेळ घालवणे,
अरे काय सेल्फ रिस्पेक्ट प्रकार आहे की नाही???

लोकं बाहेरून येऊन आपल्याकडे काम करून पैसे कमवतात तर आपणच कुठेतरी कमी पडतोय का?
मेहनत सोडून एकमेकांचे पाय खेचण्यात वेळ घालवतोय का?
आणि रुबाब काय संपत नाही आपला...?

मी हे मी ते... आपल्याशी वाकडं नदीवर लाकडं यातच आपण  रुबाब मानतो... व्यवहार नीट ठेवत नाही, फोन बंद असतात, कमिटमेंट नसतात...

टॅक्स नाही भरणार तुम्ही , पुन्हा पुन्हा सांगतोय टॅक्स नाही भरला तर तुम्ही मोठेच होणार नाही कारण बँक वाले उभे पण नाही करत बिजनेस लोन लागले तर... फाईल स्ट्रॉंग करा आपली...जास्त सेविंग करा... मी माझे छोटे छोटे खर्च दाखवून टॅक्स न वाचवता उलट जास्त टॅक्स भरायचा प्रयत्न करतो कारण मला माहिती आहे मला हे ऑफिस पूरत नाहीये  आणि अजून 5 वर्षात मला किमान 4000 Sqft चे ऑफिस घ्यायचे आहे आणि माझी फाईल स्ट्रॉंग केली तर बँक उभं करेल....

दर महिन्याला 80-20 फॉर्म्युला वापरा खर्चाचा...
महिन्याचे इन्कम पैकी 20% सेविंग झालेच पाहिजे,
म्हणजे 20,000 इन्कम असेल तर किमान 4000 सेविंग झालेच पाहिजे आणि 80% म्हणजे 16000 यातच काय घराचा खर्च, लाईट फोन बिल आणि कर्ज वगैरे पाहिजे,
नाहीतर पगार 20000 आणि फोन 80000 चा...
फालतूचा रुबाब मिरवण्यापेक्षा थोडे सदाशिवपेठी बना,
फालतू खर्च नाही करत ते... लाजयचं नाही पैसे साठवताना...

हे बदलले तर काहीतरी होईल... हात पसरवायची वेळ येणार नाही...

आता चान्स आहे काम मिळवायचा परत...
उगाच मंदी बिंदी तसले काहीच नसते,
किती ही मंदी मंदी केले तरी लोकं जेवायचे , जिभेचे चोचले पुरवायचे थांबवत नाहीत... गरजेच्या वस्तू घेण्याचे थांबवत नाहीत...

आपल्या अपयशाला आपणच जबाबदार हे जेव्हा माहिती होईल तेव्हा सक्सेस मिळेल, कायमच आपल्या अपयशाचे खापर कायम दुसऱ्यांवर फोडू नका, ही काय शाळा नाहीये आजारी होतो म्हणून मार्क कमी पडले...

एकमेकांचे पाय खेचणे वृत्ती बंद करून स्वतःची रेषा मोठी करायचा प्रयत्न कराल, स्वतःची एक स्पेशालिटी बनवा, आपल्या शिवाय ऑप्शनच नको कोणाला असे, काहीतरी स्वतःला बोंडरी आखाल तर श्रीमंत व्हाल नाहीतर काय खरं नाही... रडतच बसाल काम नाही पैसे नाही करत....

आणि जरा सौजन्याने आणि गोड बोलयला शिका,
आणि खोटे बोलून लोकांना तात्पुरते खूष करण्यापेक्षा किंवा तात्पुरता खिसा भरण्यापेक्ष्या स्पष्ट बोलायला शिका, ग्राहकांना स्पष्ट बोलणारे दुकानदार जास्त आवडतात...

एक माझेच उदाहरण सांगतो...
टच वुड🙏 माझ्या स्पष्ट आणि फ्रिली बोलण्यामुळे, आणि माझ्या सर्व्हिस आणि कमिटमेंट मुळे जिथे इतर आर्किटेक्चरल डिझायनर कन्सल्टंट 5%, 8%, मॅक्स 10% फी घेतात तिथे मी 15% फिक्स फी घेतो, पुण्याचा बाहेरचे प्रोजेक्ट 20% फी... यांच्या डबल, कारण निस्वार्थी व्यवहार, लोकांचे घर करताना लाखो रुपये त्यांचे असतात आपल्याकडे, त्यात इमानदारी ठेवा, नको तिथे हात मारू नका ..माझ्या क्लाएंटला माहिती आहे माझी फी मी त्यांना वसुल करून देऊ शकतो ...टच वूड...🙏

थोडक्यात  काय? तर लोकं तुम्हाला दुप्पट पे करतात जर तुमचे व्यवहार आणि बोलणे स्पष्ट असेल आणि सर्वात महत्वाचे... कमिटमेंट आणि क्वालिटी... या सारखी मोठी इन्व्हेस्टमेंट नाही कुठली लक्षात ठेवा... आणि लोकांनी तुमच्यावर पैशांसाठी विश्वास ठेवायला खूप वर्षचा कालावधी जातो, तात्पुरता विचार कराल तर सक्सेस विसरा...

तर सांगायचा उद्देश असा,
लोहा गरम है मार दो हाथ...

मराठी तरुणांनो,

जरा प्लान करा. येणाऱ्या मे जून मधे नविन व कमी भांडवलात कमाईची संधी आहे. आणि तीही वर्षभर. फक्त आतातरी प्रेस्टीज इशू करू नका. शहरातील प्रत्येक विभागात जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या गाड्या लावण्यासाठी काय करावं लागेल याची माहिती मिळवा. यापुढच्या काळात हेच रोखीचे (रोकड ) उद्योग
सामान्य मराठी माणसांना तारणार आहेत.

आतापर्यंत हे व्यवसाय ताब्यात ठेवणारे UP, बिहारी सगळे त्यांच्या घरी -गावी पळाले आहेत!
आपल्या मुलांना विनंती आहे की , घरीच आहात तर वडा, समोसा, डोसा, सांभर,इडली-चटणी, पोहे, शिरा, उपमा, उपीट असले नाष्ट्याचे पदार्थ बनवायचे घरी शिका. पाणीपुरी बद्दल पण माहिती घ्या. आई, बहीण, आज्जी यांच्या सारख्या कडून शिकून घ्या.
तुम्ही महाराष्ट्रामधल्या विविध जिल्ह्यामधले आहात. तिथे पिकणारी फळे, भाज्या, धान्य अशा वस्तू तिथल्या शेतकऱ्यांशी
(ते तुमचेच भाऊ, काका, मामा, आजोबा आहेत )संपर्क करून या वस्तूंचा नियमित पुरवठा मिळविण्याचा प्रयत्न सुरू करा. त्यांना विश्वास द्या की व्यवहारात तुम्ही तुमचा  शब्द नेहेमी पाळाल.

पुढे येणाऱ्या पावसाळ्यानंतर UP,बिहारी परत इथे यायच्या आत आपल्या तरुणांच्या
हात गाड्या लागल्या पाहिजेत. चांगली संधी चालून आली आहे. परत बोंबलू नका काम - धंदा मिळत नाही म्हणून.

दादा,आण्णा,भाऊ,भाई,
असे तुमचे काळीज असलेले  पुढारी नेते, याना सांगून त्यांच्या राजकीय ताकदीचा वापर करून मराठी तरुणांनो, खाद्यपदार्थांची, भाजीपाला -फळांची, चहा ची गाडी ,  लावायची परवानगी घ्या  महापालिकेकडून.

तरुणांनो यापुढे नोकरीच्या संधी खूप कमी होणार आहेत, ज्यांना नोकऱ्या आहेत  त्यांच्याच नोकऱ्यांची शाश्वती असणार नाहीये.
तुम्हाला उद्योग व्यवसाय करण्यावाचून गत्यंतर उरणार नाहीये. जागतिक
आर्थिक मंदी आणि कोरोना व्हायरस मुळे निर्माण झालेली आर्थिक टाळेबंदी आणि त्याचा तुमच्या मासिक उत्पन्नावर भविष्यकाळात होऊ घातलेला अनिष्ट परिणाम याचा गंभीरपणे विचार करा.
कोरोनाच्या आपत्तीचे संधीत रूपांतर करा आणि थोडंस स्वार्थी व्हा!इतके दिवस काम केलेत  ना नेत्यांचे - पक्षांचे ?आता हक्काने जागा मागा वडापावची , चहाची, भाजीपाल्याची-फळांची , हातगाडी लावायला!!
अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही
चला तर मग, उठा आणि कामाला लागा...

एक हजार ते पंचवीस  हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय_.*
..
१ 】चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा.
२】 कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा.
३ 】मासे विकणे. दिडपट नफा.
४ 】आंबे होलसेल आणून रिटेल विकणे.
५ 】तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात
६ 】पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात
७】 कच्छी दाबेली. हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. दाबेलीचे वेगळे पाव मिळतात.
८ 】वडापावची गाडी लावा. स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा.
९ 】मूग भजी ची विक्री करा. घराबाहेरच स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो. तिप्पट नफा.
१०】 ढोकळा विक्री. घरी ढोकळा बनवा. चटणी बनवा. मोठ्या स्टीलच्या डब्यात भरुन घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका.
११ 】चाळीस रुपये किलोच्या डोश्याच्या पीठाचे वीस डोसा तयार होतात. एक डोसा वीस रुपयांना विका. सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भाजी द्या. याच पीठाचे वडेसुध्दा विकता येतात.
१२】 घरीच पोळी भाजी बनवुन कस्टमरला ऑफिस पोच डबा पोहोचवा.
१३】 फळ विक्री करा.
१४ 】शहाळे आणून विका. रोज तेच ते ग्राहक मिळेल. बावीस रुपयांचे चाळीस रुपये होतात.
१५ 】कापडाचे तुकडे पोत्याने विकत मिळतात. घरी शिलाई मशीन असेल व कोणाले शिलाई करता येत असेल तर झबले टोपडे व दुपटे करून विका. टाकाऊतुन टिकाऊ बनवा.
१६】 फ्लेक्स बोर्ड तयार करुन, आणून, चिटकवून, लावून द्या. दोनशे ते पाचशे रुपये प्रती मिळतात.
१७ 】सातारा येथे राजवाड्याजवळ सुट्ट्या उदबत्त्या वजनावर विकतात तशा आपल्या स्वतःच्या गावातही विकता येईल.
१८】मुंबई येथे होलसेल मार्केट मध्ये कपड्यांचा लाॅट विकत आणून घरी सुध्दा बिझिनेस सुरु करु शकता. दादर रेल्वे स्टेशन शेजारीच होलसेल मार्केट आहे.
१९】 मंदिराजवळ नारळ विक्री करा
२० फुलांच्या मार्केटमधुन फुलं आणा व त्याचे हार करुन विका. यात खुप फायदा आहे.
२१】 हाॅटेलला कडधान्ये पुरवणे.
२२】 हाॅटेलला बटाटे खुप लागतात. सप्लाय करा.
२३ 】घरी चटणीचे चार पाच प्रकार तयार करुन थेट फूड मार्ट ला विका किंवा स्वतः रिटेल करा.
२४】 लेदर शिलाईची जुनी मशीन घ्या व सिटकव्हर तयार करुन विका. चांगले मार्जिन मिळते.
२५】 मार्केटला लसणाच्या पाकळ्या होलसेलमध्ये मिळतात. घरी आणून गरम पाण्यात मीठ टाकून लसणाच्या पाकळ्या टाकल्या की लगेच हाताने चोळुनही साले निघतात. हाॅटेल, भाजीवाले यांना छोटी मोठी पाकिटे करुन विका.
२६】 एलईडी बल्ब स्टाॅल लावून विका. आपल्या ग्रुपवर त्याचे होलसेलर आहेत
२७】 ज्यांना योगासने येतात त्यांनी त्याचे क्लास सुरु करावेत.
२८】 महिलांसाठी घरगुती बिझिनेस, पाळणाघर सर्वात बेस्ट बिझिनेस करु शकता. भांडवल लागतेच. खेळणी, दूध, इ. ठेवावे लागते
२९】 प्लॅस्टीक बंदी होणार असल्यामुळे कागदी व कापडी पिशव्यांची मागणी वाढत आहे. घरी तयार करा. दुकानदारांना थेट विका. खुप स्कोप आहे.
३०】 पेस्टकंट्रोल कसे करतात शिकून घ्या. हा धंदा उन्हाळ्यात खुप चालतो. रुमनुसार रेट असतात.
३१】 प्लंबिंग काम शिकून घ्या. दररोज हजार रुपये 'सहज कमवा'.
३२】 विको दंतमंजनच्या मागे लिहिलेले साहित्य काष्टौषधीच्या दुकानातुन आणून त्याचे घरी दंतमंजन तयार करा. खुप परवडते.
३३】 काही औषधी जंगलात जाऊन गोळा करुन आणून आयुर्वेद डाॅक्टरांना विका.
३४】 गोमुत्र गोळा करुन बाटलीत पॅक करुन विका.
३५】 खेडेगावात असाल तर दुध गोळा करुन शहरात जाऊन विका. देशी गायीचे दूध शहरात सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रतिलीटर विकले जाते.
३६】 गावाकडे उन्हाळ्यात कडबा कुट्टी खुप चालते. ज्याच्याकडे यंत्र आहे त्याच्याकडे जाऊन पोती भरुन घरपोच करता येतील.
३७】 फाईल तयार करायचा पुष्ठा मिळतो. पट्ट्याही मिळतात. फक्त कटिंग मशीनने कटींग करुन ऑफिसला सप्लाय करु शकता. प्रिंटिंग करुन पाहिजे असल्यास प्रेसमधून करुन घेऊ शकता.
३८】 स्टेपलर, त्याच्या पिना, पंच मशीन ऑफिसला सप्लाय करुन वीस ते पंचवीस टक्के फायदा मिळतोच. फक्त तुम्हाला बरेच ऑफिस शोधावे लागतील.
३९】 आता लगीनसराई सुरु झाली आहे. नवरदेवाचे फेटे विका. ज्यांचे टेलरींगचे दुकान आहे त्यांना हा जोडधंदा म्हणून चांगला आहे
४०】 भगव्या फेट्यांची फॅशन जोरात चालू आहे. फेटा बांधायला शिका. चार महीने भरपूर कमवा. सोबत भगव्या फेट्याचे कापडही भाड्याने द्या.
४१】 उन्हाळ्यात चिंच फोडून चिंच वेगळी करुन विकू शकता.  शिरे व टरफले यांची पुड बनवुन त्यात मीठ मिसळुन तांबे पितळेची भांडी घासायला पावडर तयार करु शकता. चिंचोक्याचे भट्टीतुन लाह्याही बनवतात.
४२】 उन्हाळ्यात होलसेल दही आणून त्याचे घुसळुन लोणी व ताक काढले जाते. मसाला ताक करुन विकणे हा खुप फायदेशीर बिझिनेस आहे. फक्त त्यात बर्फ टाकू नये. त्याऐवजी माठात साठवून ठेवता येते. तसे विका
४३】देवदेवतांचे साचे विकत मिळतात. त्यात POP टाकून मुर्ती बनवता येतील व रंगवून विकता येतील परंतु याला प्रशिक्षणाची व कौशल्याची खुप गरज आहे. कलेतुन पैसे जास्त मिळतात.
४४】रद्दी खरेदी करणे गठ्ठे बांधून होलसेल विकणे हा सर्वात कमी भांडवलाचा सुंदर व्यवसाय आहे. अनुभवातुन हा व्यवसाय मोठा करता येईल
४५】जिमचा अनुभव असेल तर शहरामध्ये जाम कोच म्हणून सेलिब्रेटीजना गाईडंस करुन भरपूर फी मिळते.
४६】शेवचिवडा होलसेल आणायचा. चुरमुरे पोत्याने आणायचे. चुरमुरे चाळण मारुन साफ करून घ्यायचे. चिंचपाणी घरीच तयार करुन ओली व सुकी भेळ विकता येईल. अगदी हातगाडीसुध्दा चालेल. नाट्यगृह, समुद्र बीच, गजबजलेल्या रस्त्यावर किंवा बागेबाहेर अशी छोटी दुकाने थाटली जातात.
४७】धोबी अर्थात लाँड्रीवाले कामगार ठेवतात. धुवायचे कपडे, ड्रायक्लिन कपडे बाहेरच्या माणसाकडुन घेतले जाते. हल्ली हा बिझिनेस कोणीही करत आहे. शहरात जाऊन टाकला तर मी खात्रीने सांगतो तुम्ही हा बिझिनेसमध्ये यशच मिळवणार. कारण शहरात महिला नोकरीचे प्रमाण खुप आहे.
४८】रेडियम चा बिझनेसही खुप चांगला आहे पण मशीनरी आवश्यक आहे. सध्या सर्वात जास्त चालणारा बिझिनेस आहे. नंबर प्लेट ते गाडीचे डेकोरेशन सर्वात रेडियम वापरतात. रोल होलसेल मिळतात. अगदी घरीही ब्लेडने कटिंग करुन विकता येते.
४९】रिचार्ज चा बिझनेसही खुप चांगला आहे. एक हजारपासून सुरु करता येतो. विशिष्ठ टारगेट पुर्ण केले तर स्कीमनुसार अनेक जादाचे फायदेही मिळतात.
५०】 सर्वात सुंदर व लेटेस्ट बिझिनेस म्हणजे मोबाईल अॅक्सेसरीज विकणे....

कृपया सर्वांनीच उपरोक्त माहिती इतर ग्रुपवर शेअर करायला हरकत नाही....

‼️🙏‼️
उत्तर लिहिले · 20/4/2020
कर्म · 360
0

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तुमची इच्छा आहे हे खूपच छान आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी काही उपयोगी कल्पना आणि तो सुरू करण्याची पद्धत:

व्यवसायाच्या काही कल्पना:

  • ऑनलाइन व्यवसाय: आजकाल ऑनलाइन व्यवसायाला खूप मागणी आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा ई-कॉमर्स स्टोअर सुरू करू शकता. जसे की, कपडे, एक्सेसरीज, किंवा हस्तकला वस्तू विकणे.
  • ब्लॉगिंग किंवा YouTube चॅनेल: जर तुम्हाला लेखन किंवा व्हिडिओ बनवण्याची आवड असेल, तर तुम्ही ब्लॉगिंग किंवा YouTube चॅनेल सुरू करू शकता.
    • विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख लिहा किंवा व्हिडिओ तयार करा.
    • Google AdSense (https://support.google.com/adsense/answer/10160401?hl=en) द्वारे जाहिराती लावून पैसे कमवा.
  • फूड ट्रक किंवा क्लाउड किचन: तुम्ही स्वतःचा फूड ट्रक सुरू करू शकता किंवा क्लाउड किचन उघडू शकता.
    • तुम्ही विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून ते ऑनलाइन किंवाevent मध्ये विकू शकता.
    • Zomato (https://www.zomato.com/) आणि Swiggy (https://www.swiggy.com/) सारख्या ॲप्सवर नोंदणी करा.
  • इव्हेंट मॅनेजमेंट: तुम्हाला इव्हेंट आयोजित करण्याचा अनुभव असल्यास, तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करू शकता.

व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया:

  1. व्यवसाय योजना तयार करा: प्रथम तुमच्या व्यवसायाची एक चांगली योजना तयार करा. त्यात तुमच्या व्यवसायाचा उद्देश, लक्ष्यित ग्राहक, आर्थिक अंदाज आणि विपणन धोरण (marketing strategy) असावे.
  2. गुंतवणूक: व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही स्वतःचे पैसे वापरू शकता किंवा बँकेकडून कर्ज घेऊ शकता.
  3. नोंदणी आणि परवाने: तुमचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. आवश्यक परवाने मिळवा.
  4. विपणन (Marketing): तुमच्या व्यवसायाची जाहिरात करणे खूप महत्त्वाचे आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता.

व्यवसाय सुरू करणे हे एक मोठे आव्हान आहे, पण योग्य नियोजन आणि मेहनतीने तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. All the best!

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2220

Related Questions

एमआयडीसीसाठी जमिनीचे व्यवहार कोण पाहते?
MIDC सातारा शिरवळचे अधिकृत ऑफिस कोठे असेल?
flange म्हणजे काय आणि ते कुठे युज करतात?
गृह उद्योग उत्पादन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
आधुनिक भारतातील उद्योग यावर माहिती लिहा?
उद्योग व्यवस्थापनातील कार्याधिकाऱ्यांचे महत्त्व स्पष्ट करा?
उद्योग व्यवस्थापनातील अधिकार्याचे महत्त्व स्पष्ट करा?