3 उत्तरे
3 answers

डोकेदुखीवर उपाय काय?

1
*_⭕ ड़ोकेदुखीवर हे उपाय  करून पहा  ⭕_*

सोपे उपाय करूनही ही डोकेदुखी थांबवता येते. त्यासाठी ही माहिती जरूर वाचा.१)डोके दुखणे- डोके दुखत असेल तर अमसुले पाण्यात भिजत घालून, कुस्करून साखर मीठ घातलेले सरबत अथवा कोकम सरबत घ्यावे.२) बरेच वेळा रात्री कांही कारणाने झोपायला उशीर होतो व जागरण होते.जागरणाने डोके दुखत असेल तर १५ निनिटे झोप अथवा विश्रांती हा चांगला उपाय आहे. डोक्यातील कलकलही या विश्रांतीमुळे कमी होते.

३)वेळी अवेळी खाणे. सततचे उपवास अथवा बराच काळ उपाशी राहणे याने पित्त वाढते व बरेचवेळा त्यामुळेडोकेदुखी होते.पित्ताने डोके दुखत असल्यास गार दूध प्यावे.३)अर्धशिशीचा त्रास होत असेल तर -सुंठ अधिक जायफळ यांचा लेप भुवईच्या वर लावावा. शिंक काढण्याच्या कोणत्याही उपायाने शिंक काढल्यासही अर्धशिशी कमी होते अथवा सकाळी उठल्या बरोबर पेढा खाल्ल्याने ती कमी होते. अर्धशिशी पित्त व सर्दीमुळे होते. पेढयाने पित्त कमी होते व शिंक काढण्याने सर्दी मोकळी होते. अर्धशिशी म्हणजे डोक्याचा अर्धा भाग दुखणे.हे दुखणे त्रासदायक असते व सूर्योदयापासून ते सुरू होते ते सूर्यास्तानंतर कमी होते.४)सर्दी अथवा बारीक ताप किवा अंग मोडून येणे यासारख्या आजारातही डोके दुखते. गरम पाण्याच्या पिशवीने डोके शेकून काढल्यास ही डोकेदुखी थांबते. अथवा अमृतांजन किवा तत्सम बाम डोक्यास चोळल्यासही आराम पडतो.५) बरेच वेळा जादा वाचन, टिव्ही पाहणे अथवा डोळ्यावर ताण आणणारी कामे झाल्यासही डोके दुखते. अशा वेळी डोळ्यांना चष्मा आला नाही ना याची खात्री करून घ्यावी. डोळ्याला नंबर आल्यानेही डोकेदुखी होते व योग्य नंबरचा चष्मा वापरायला सुरवात केली की ती बंद होते.

0
अशा प्रश्नाचे उत्तर आधी दिलेले आहे खालील लिंकवर क्लिक करून उत्तर वाचा.


डोकेदुखी वर झटपट इलाज काय आहे ?
उत्तर लिहिले · 24/3/2017
कर्म · 20855
0

डोकेदुखी एक सामान्य समस्या आहे आणि त्यावर अनेक उपाय आहेत. येथे काही उपाय दिले आहेत:

घरगुती उपाय:

  • पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
  • पुरेसे पाणी प्या: दिवसभर पुरेसे पाणी प्या. dehydration (डिहायड्रेशन)मुळे डोकेदुखी होऊ शकते.
  • आहार: नियमित आणि संतुलित आहार घ्या.
  • ताण कमी करा: योगा, ध्यान आणि श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा.
  • गरम किंवा थंड शेक: डोक्याला गरम किंवा थंड पाण्याचा शेक द्या.
  • लवंग: लवंगाचे तेल कपाळावर चोळा.
  • आले: आल्याचा चहा प्या किंवा आल्याचा छोटा तुकडा चघळा.

औषधोपचार:

  • वेदना शामक (Painkillers): डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ॲस्पिरिन (Aspirin), पॅरासिटामॉल (Paracetamol) किंवा आयबुप्रोफेन (Ibuprofen) घ्या.
  • मायग्रेनची औषधे: जर डोकेदुखी मायग्रेनमुळे असेल, तर डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

  • जर डोकेदुखी खूप जास्त असेल आणि वारंवार होत असेल.
  • जर डोकेदुखीसोबत ताप, मान दुखणे, दृष्टी समस्या किंवा इतर गंभीर लक्षणे असतील.
  • जर डोकेदुखी औषधोपचारांनी कमी होत नसेल.

टीप: कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मेयो क्लिनिक - डोकेदुखी उपचार (इंग्रजी)

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1200

Related Questions

सारखे डोके दुखत असेल तर काय करावे?
माझे खूप डोके दुखते. चार-पाच दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास होतो. मला डोळ्यांच्या मध्ये एकाच बाजूने दुखते आणि एका नाकातून पाणी गळायला लागते, काय कारण असावे?
मी कोविड लस घेतली पण मला फक्त डोकेदुखीचाच त्रास झाला, दुसरा कोणताही त्रास झाला नाही, जसे की हात पाय जड पडणे, थंडी वाजणे हा त्रास झालाच नाही. म्हणतात की लस घेतल्यावर त्रास होतो, मला तर नाही झाला, याचे काय कारण असू शकते?
डोक्यावरचा ताण कसा कमी करायचा? उपाय सांगा.
वारंवार डोके दुखण्याचे कारण काय असू शकते? पुरुष, वय ६९, प्रकृती कृश.
कडक उष्णतेखेरीज डोके दुखण्याचे दुसरे कारण काय असू शकते?
डोकेदुखी वर उपाय सांगा?