2 उत्तरे
2
answers
सारखे डोके दुखत असेल तर काय करावे?
1
Answer link
सारखे डोके दुखत असेल तर
डोके दुखीचा त्रास होतोय?, ‘हे’ घरगुती उपाय आहेत डोकेदुखीवर रामबाण इलाज
डोकेदुखी ही तशी सर्वांसाठी सामान्य समस्या आहे. प्रत्येकाला कधीनाकधी डोकेदुखीचा त्रास हा जाणवतच असतो. डोके दुखण्यामागे अनेक कारणे असतात. मात्र असे काही घरगुती उपाय आहोत, ज्यामुळे तुमची डोके दुखीपासून सुटका होऊ शकते.
डोकेदुखी ही तशी सर्वांसाठी सामान्य समस्या आहे. प्रत्येकाला कधीनाकधी डोकेदुखीचा त्रास हा जाणवतच असतो. डोके दुखण्यामागे अनेक कारणे असतात. अति तणावातून सुध्दा डोके दुखू शकते. तर कधी तुम्ही आजारी असल्यामुळे सुद्धा डोके दुखू शकते. डोके दुखीचा त्रास होत असेल तर तो थांबण्यासाठी काय करावे. त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी हेच आज आपण जाणून घेणार आहोत. अनेकांना अॅसिडिटीमुळे देखील डोकेदुखीचा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे असते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवा : डोकेदुखीचे एक महत्त्वाचे आणि कॉमन कारण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कमी झालेले पाणी हे असते. तुमचे जर डोके दुखत असेल तर भरपूरप्रमाणात पाणी प्या. शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवा. शरीरात पाणी योग्य प्रमाणात असेल तर शक्यतो डोकेदुखीचा त्रास होत नाही. पाण्यासोबतच विविध फळांचे ज्यूस तसेच नारळ पाणी देखील प्या. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
पुरेशा प्रमाणात झोप घ्या : बऱ्याचवेळा अपुरी झोप हे देखील डोके दुखीचे कारण असू शकते. तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला डोके दुखीचा त्रास जाणू शकतो. त्यामुळे दररोज कमीत कमी सात ते आठ घंटे झोप घ्या. पुरेशा प्रमाणात झोप झाल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहातात आणि डोकेदुखीचा त्रास देखील होत नाही.
डोक्याची मॉलिश करा: जर तुम्हाला वारंवार डोके दुखीचा त्रास होत असेल तर डोक्याची मॉलिश करणे देखील तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. कोकोनट ऑइलचा उपयोग तुम्ही मॉलिश करताना करू शकता. तुमचे जिथे डोके दुखत आहे, त्या भागावर अंगठा आणि कंरगळीच्या साह्याने हळूहळू प्रेस करावे. कमीत कमी दहा ते पंधार मिनेट मॉलिश केल्यास तुम्हाला काही प्रमाणात आराम जाणू शकतो.
गरम पाण्याने अंघोळ करा: हा देखील डोके दुखी थांबवण्याचा एक चांगला रामबाण इलाज आहे. तुमचे डोके दुखत असल्याने तुम्ही गरम पाण्याने डोके धुवा. असे केल्यास तुम्हाला आराम वाटू शकतो. मात्र खूपच तीव्र डोके दुखी होत असल्यास घरगुती उपाय न करता, डॉक्टरांचाच सल्ला घेणे गरजेचे असते.
0
Answer link
डोकेदुखी एक सामान्य समस्या आहे आणि त्याचे अनेक संभाव्य कारणे असू शकतात. खाली काही उपाय दिले आहेत जे तुम्हाला वारंवार डोकेदुखीपासून आराम मिळवण्यास मदत करू शकतात:
हे काही सामान्य उपाय आहेत जे तुम्हाला वारंवार डोकेदुखीपासून आराम मिळवण्यास मदत करू शकतात. परंतु, तुमच्या डोकेदुखीचे कारण जाणून घेण्यासाठी आणि योग्य उपचार घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
टीप: हा लेख केवळ माहितीसाठी आहे आणि वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही.
1. डॉक्टरांचा सल्ला घ्या:
जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. ते तुमच्या डोकेदुखीचे कारण ओळखू शकतील आणि योग्य उपचार देऊ शकतील.
2. जीवनशैलीत बदल करा:
- पुरेशी झोप घ्या (दररोज ७-८ तास).
- तणाव कमी करा.
- नियमित व्यायाम करा.
- आहार नियमित ठेवा आणि वेळेवर जेवण करा.
- धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
3. घरगुती उपाय:
- डोक्याला थंड किंवा गरम पाण्याची पट्टी लावा.
- लवेंडर तेल किंवा पेपरमिंट तेल डोक्याला लावा आणि मसाज करा.
- आल्याचा चहा प्या.
4. औषधोपचार:
जर डोकेदुखी गंभीर असेल, तर डॉक्टर तुम्हाला औषधे लिहून देऊ शकतात. ही औषधे वेदना कमी करण्यास आणि डोकेदुखी थांबवण्यास मदत करू शकतात.
5. प्रतिबंधात्मक उपाय:
- तुमच्या डोकेदुखीला कारणीभूत ठरू शकणाऱ्या गोष्टी टाळा.
- नियमितपणे डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा.