
डोकेदुखी
1
Answer link
सारखे डोके दुखत असेल तर
डोके दुखीचा त्रास होतोय?, ‘हे’ घरगुती उपाय आहेत डोकेदुखीवर रामबाण इलाज
डोकेदुखी ही तशी सर्वांसाठी सामान्य समस्या आहे. प्रत्येकाला कधीनाकधी डोकेदुखीचा त्रास हा जाणवतच असतो. डोके दुखण्यामागे अनेक कारणे असतात. मात्र असे काही घरगुती उपाय आहोत, ज्यामुळे तुमची डोके दुखीपासून सुटका होऊ शकते.
डोकेदुखी ही तशी सर्वांसाठी सामान्य समस्या आहे. प्रत्येकाला कधीनाकधी डोकेदुखीचा त्रास हा जाणवतच असतो. डोके दुखण्यामागे अनेक कारणे असतात. अति तणावातून सुध्दा डोके दुखू शकते. तर कधी तुम्ही आजारी असल्यामुळे सुद्धा डोके दुखू शकते. डोके दुखीचा त्रास होत असेल तर तो थांबण्यासाठी काय करावे. त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी हेच आज आपण जाणून घेणार आहोत. अनेकांना अॅसिडिटीमुळे देखील डोकेदुखीचा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे असते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवा : डोकेदुखीचे एक महत्त्वाचे आणि कॉमन कारण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कमी झालेले पाणी हे असते. तुमचे जर डोके दुखत असेल तर भरपूरप्रमाणात पाणी प्या. शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवा. शरीरात पाणी योग्य प्रमाणात असेल तर शक्यतो डोकेदुखीचा त्रास होत नाही. पाण्यासोबतच विविध फळांचे ज्यूस तसेच नारळ पाणी देखील प्या. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
पुरेशा प्रमाणात झोप घ्या : बऱ्याचवेळा अपुरी झोप हे देखील डोके दुखीचे कारण असू शकते. तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला डोके दुखीचा त्रास जाणू शकतो. त्यामुळे दररोज कमीत कमी सात ते आठ घंटे झोप घ्या. पुरेशा प्रमाणात झोप झाल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहातात आणि डोकेदुखीचा त्रास देखील होत नाही.
डोक्याची मॉलिश करा: जर तुम्हाला वारंवार डोके दुखीचा त्रास होत असेल तर डोक्याची मॉलिश करणे देखील तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. कोकोनट ऑइलचा उपयोग तुम्ही मॉलिश करताना करू शकता. तुमचे जिथे डोके दुखत आहे, त्या भागावर अंगठा आणि कंरगळीच्या साह्याने हळूहळू प्रेस करावे. कमीत कमी दहा ते पंधार मिनेट मॉलिश केल्यास तुम्हाला काही प्रमाणात आराम जाणू शकतो.
गरम पाण्याने अंघोळ करा: हा देखील डोके दुखी थांबवण्याचा एक चांगला रामबाण इलाज आहे. तुमचे डोके दुखत असल्याने तुम्ही गरम पाण्याने डोके धुवा. असे केल्यास तुम्हाला आराम वाटू शकतो. मात्र खूपच तीव्र डोके दुखी होत असल्यास घरगुती उपाय न करता, डॉक्टरांचाच सल्ला घेणे गरजेचे असते.
2
Answer link
डोकेदुखीवर घरगुती उपाय
#डोकेदुखी#घरगुती उपचार
डोके दुखी हे एक कॉमन प्रॉब्लम आहे. याचे बरेच कारणं असू शकतात, जसे डोळ्यांची समस्या, अपच, ऊन लागणे, अनियमित मासिक धर्म, सायनास, ताप, रजोनिवृत्ती, निरंतर चिंता, मानसिक तणाव, उशीरा रात्रीपर्यंत जागणे, अनिद्रा, दुखी राहणे, कडक उन्हात फिरणे थकवा, दारू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन इत्यादी. अशात जास्त पेन किलरचे सेवन केल्याने रिऍक्शनची भिती सदैव राहते. म्हणून जर तुम्ही डोकेदुखीने परेशान असाल तर आम्ही तुम्हाला देत आहे डोकेदुखीपासून लगेचच आराम देण्यासाठी काही घरगुती उपाय ...
1. लवंगांत थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करून घ्यावे. या पावडरला एका बरणीत भरून ठेवावे, जेव्हा कधी डोकं दुखायला लागेल तर या पावडरमध्ये कच्चं दूध घालून पेस्ट तयार करून ती पेस्ट डोक्यावर लावावी. लगेचच डोके दुखीत आराम मिळतो.
2. एका ग्लासमध्ये गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायला पाहिजे. जर गॅसमुळे डोकं दुखत असेल तर लगेचच आराम मिळेल.
3. युकेलिप्टसच्या तेलाने डोक्याची मॉलिश करायला पाहिजे. याने डोकेदुखीत आराम मिळण्यास मदत होते.
4. जर तुम्ही वारंवार होणार्या डोकेदुखीमुळे परेशान असाल तर रोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. आराम मिळेल.
5. कलमी (दालचिनी)ची पूड तयार करून ठेवावी. जेव्हा डोकं दुखण्यास सुरू होईल तेव्हा कलमीच्या पावडरला पाण्यात मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी. या पेस्टला डोक्यावर लावावे, नक्कीच आराम मिळेल.
6. सर्दीमुळे होणार्या डोकेदुखीत धणेपूड आणि साखरेचा घोळ तयार करून त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.
7. गर्मीमुळे डोकं दुखत असेल तर चंदन पाउडरचे पेस्ट तयार करून कपाळावर लावल्याने डोकेदुखी दूर होईल.
8. नारळाच्या तेलाने 10-15 मिनिट डोक्यावर मसाज केल्याने देखील डोकं दुखीत आराम मिळतो.
9. लसणाची एका कळीचा रस बनवून प्यायल्याने देखील डोकेदुखीवर आराम मिळतो.
10. नेहमी डोकं दुखत असेल तर सफरचंदावर मीठ लावून खायला पाहिजे. त्यानंतर गरम पाणी किंवा दुधाचे सेवन केले पाहिजे. जर तुम्ही हा प्रयोग लागोपाठ 10 दिवसापर्यंत कराल तर डोकेदुखीची समस्या दूर होईल.
डोकेदुखी कमी करतील घरातील हे '5' पदार्थ
डोकेदुखी कमी करतील घरातील हे '5' पदार्थ
#डोकेदुखी#मायग्रेन
आजकाल तणावग्रस्त आयुष्यामुळे असो किंवा वातावरणात बदल झाल्यानंतर सर्दी, खोकला आणि यामधून डोकेदुखीचा त्रास बळावतो. अनेक लोकांना तणावग्रस्त जीवनशैलीतून मायग्रेनचा त्रासही जाणवतो. झोप पूर्ण झाली नसेल तरीही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. मग अशा कारणांमधून उद्भवणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी आयुर्वेदातील काही उपाय फायदेशीर ठरतात. एका मिनिटांत दूर होईल डोकेदुखी
आजकाल तणावग्रस्त आयुष्यामुळे असो किंवा वातावरणात बदल झाल्यानंतर सर्दी, खोकला आणि यामधून डोकेदुखीचा त्रास बळावतो. अनेक लोकांना तणावग्रस्त जीवनशैलीतून मायग्रेनचा त्रासही जाणवतो. झोप पूर्ण झाली नसेल तरीही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. मग अशा कारणांमधून उद्भवणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी आयुर्वेदातील काही उपाय फायदेशीर ठरतात. एका मिनिटांत दूर होईल डोकेदुखी
आलं -
डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी आलं फायदेशीर आहे. पाण्यामध्ये आल्याचा टाकून उकळा. या पाण्याची वाफ घेतल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. या लोकांंनी 'आलं' खाणं ठरू शकतं घातक
लिंबाचा रस -
डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी समप्रमाणात आल्याच्या रसासोबत लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण दिवसातून 1 किंवा 2 वेळेस प्यायल्यास डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
पुदीना -
डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी पुदीन्याच्या पानांचा रस डोक्यावर लावा. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी करण्यास मदत होते.
आईसपॅक -
मायग्रेनचा त्रास जाणवत असल्यास पाठीवर आईसपॅकने मसाज करावा. यामुळे त्रास कमी होण्यास मदत होते.
लवंग -
लवंगाला बारीक वाटून एका कापडामध्ये ठेवा. थोड्या थोड्या वेळाने हे सुंगत रहावे. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. रोज एक लवंग खा आणि 'या' समस्या दूर करा!
सफरचंद -
डोकेदुखीच्या त्रासामध्ये सफरचंद फायदेशीर ठरते.
योग्य आहारनं मायग्रेन टाळा
#मायग्रेन#डोकेदुखी
मायग्रेन म्हणजे अर्धशिशीचं प्रमुख लक्षण म्हणजे कपाळापासून सुरु होणारी तीव्र डोकेदुखी. मायग्रेनमध्ये कपाळ, डोक्याचा अर्धाभाग आणि डोळ्यांभोवती तीव्र वेदना होतात आणि या वेदना हळूहळू वाढत जातात. प्रखर प्रकाश आणि आवाजामुळे वेदना आणखी वाढू शकतात.
मायग्रेनची कारणं
चुकीचा आहार आणि जीवनशैली हे मायग्रेनचा त्रास होण्यामागील एक महत्त्वाचं कारण आहे.
आपल्या आहारामध्ये चुकीच्या पदार्थांचा समावेश केल्यामुळे या अन्नाचं पचन आतडे योग्यरितीने करु शकत नाहीत.
आपल्या आतड्यांच्या बाजूनं अन्न आंबवण्याची क्रिया होते आणि शरीरातही त्यामुळे हानिकारक घटकांची निर्मिती होते. अशा परिस्थितीमध्ये पचनसंस्था संवेदनशील असलेल्यांमध्ये मायग्रेनच्या वेदना सुरु होतात.
सेरोटोनिनची पातळी कमी होते तेव्हा मेंदूतील रक्तवाहिन्यांना सूज येते. ही सूज आल्यामुळेही डोकेदुखी तसंच मायग्रेनचा झटका आल्याचं म्हटलं जातं. सेरोटिन हा चेतना वाहक असल्यानं काही विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी, पचनमार्ग, मध्यवर्ती मज्जा संस्था आणि रक्तातील प्लेटलेटमध्ये त्याचा समावेश असतो. ट्रायप्टोथानप्रथिनांमार्फत हा घटक शरीरात तयार केला जातो.
मायग्रेन आणि आहार यांचा परस्परांशी काय संबंध आहे?
आहारातील पथ्ये हा मायग्रेनवरील उपचार नसला, तरी मायग्रेनच्या लक्षणांना कारणीभूत ठरणारे अन्नपदार्थ ओळखणं आणि ते टाळणं मायग्रेनच्या झटक्यांना प्रतिबंध करण्यात उपयुक्त ठरु शकतात.
खालील अन्नपदार्थांमुळे साधारणपणे मायग्रेनची लक्षणं दिसून येतात
चीझ
चॉकलेट
केळी
लिंबूवर्गीयफळे
हॉटडॉग
मोनोसोडियमग्लुटामेट
अॅस्पार्टेम
चरबीयुक्तअन्न
आइस्क्रिम
कॅफीनचं सातत्यानं केलं जाणारं सेवन
मद्ययुक्तपेये, विशेषत: रेडवाइन आणि बीअर
चायनीज रेस्टोरंट्समध्ये तयार होणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी मोनोसोडियमग्लुटामेट अर्थात एमएसजी वापरलं जातं. सुप्स, सोयासॉस, सॅलडड्रेसिंग्ज, फ्रोझन अन्नपदार्थ, सुपमिक्स, क्रुटॉन्सस्टफिंगर तसंच काही प्रकारच्या चिप्समध्ये हे एमएसजी घातलेलं असतं. अन्नपदार्थांवरील लेबल्सवर सोडियम कॅसीनेट, हायड्रोलाइझ्डप्रोटीन्स किंवा ऑटोलाइझ्डयीस्ट ही नावं वापरून एमएसजी वापरलं जातं.
आहारासाठी मार्गदर्शक तत्त्वं
मायग्रेनचा त्रास होणाऱ्यांनी योग्य अन्नपदार्थांचे सेवन करुन सेरोटोनिन पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
सहज पचणारी प्रथिने योग्य प्रमाणातील कर्बोदकांसह घ्यावीत. ट्रायप्टोथान प्रकारची प्रथिनं कर्बोदकांसोबत घेतली तर ती उत्तम काम करतात. (उदाहरणार्थ, शेंगवर्गीय भाज्या, हातसडीचा भात किंवा फळं आणि टणक कवच असलेले पदार्थ).
हार्मोन्सचं कार्य सुरळीत सुरु राहावं, यासाठी प्रत्येकानं चांगल्या मेदाचं सेवन योग्य प्रमाणात केलं पाहिजे. (जवस, शेंगदाणे, ऑलिव्हऑइल किंवा फिशऑइल).
तंतूमय पदार्थ आणि दही यांचा आहारात समावेश असावा.
यामुळे आतड्यातील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते आणि विषारी द्रव्य शरीराबाहेर टाकली जातात.
प्रसन्न वाटायला लावणारे हार्मोन्स तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यायाम. १५-२० मिनिटांचा व्यायामही सेरोटोनिन पातळी वाढवण्यास पुरेसा आहे.
जेवण टाळल्यामुळेही डोकेदुखीची समस्या वाढते.
चहा, कॉफी, साखरयुक्त पेये, चॉकलेटस यांसारखे उत्तेजक पदार्थ टाळा.
ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे काय आहेत ?
#ब्रेन ट्यूमर#डोकेदुखी
आज ब्रेन ट्युमर दिवस असून या दिवशी ब्रेन ट्युमरबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जाते. जर तुमंच सतत डोकं दुखत असेल. औषध घेतल्यावर आराम मिळत असेल आणि पुन्हा डोक्याचं दुखणं उमळून येत असेल तर सावध व्हा, कारण असं होणे ब्रेन ट्युमरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये येतं. ब्रेन ट्युमरबाबात तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल. हा एक भयंकर आजार असून याची वेळेवर माहिती मिळाली तर यावर उपचार होऊ शकतात. या आजारावर वेळेवर उपचार न झाल्यास जीवाला धोका होऊ शकतो. हा आजार होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. चला जाणून घेऊया ब्रेन ट्युमरची लक्षणे....
डोकं दुखणे
ब्रेन ट्युमरचं सर्वात पहिलं आणि सामान्य लक्षण म्हणजे डोकं दुखणे. या आजारात होणारी डोकेदुखी ही साधारण सकाळच्या वेळी अधिक होते. पुढे ती वाढते. या वेदना कधी कधी इतक्या जास्त असतात की, व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडतं. त्यामुळे तुम्हालाही अशाप्रकारची डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
उलटी आणि मळमळ
ब्रेन ट्युमरचं दुसरं लक्षण हे आहे की, डोकं दुखण्यासोबतच उलटी सुरु होते. कधी कधी डोकं दुखत असेल तर दिवसभर मळमळ व्हायला लागते. हे लक्षणही सकाळच्यावेळी अधिक बघायला मिळतं.
शारीरिक संतुलन
ब्रेन ट्युमर असेल तर सतत चक्कर येतात आणि कधी कधी चक्कर येऊन काही लोक पडतातही. जर ट्युमर सेरिबॅलम असेल तर त्याने शारीरिक संतुलन प्रभावित होतं. त्याचाच हा भाग आहे.
झटके येणे
ब्रेन ट्युमर असेल तर ज्या प्रभावित कोशिका जाळं तयार करतात. त्यामुळे आजूबाजूच्या कोशिकाही प्रभावित होतात. त्यामुळे त्या व्यक्तीला झटके येणे सुरु होते.
पॅरालिसीससारखे वाटणे
ब्रेन ट्युमरच्या स्थितीत अनेकदा व्यक्तीच्या मेंदुवरील कंट्रोल सुटतो. त्यामुळे शरीराची कोणतीही हालचाल जाणवत नाही. त्या व्यक्तीला पॅरालिसीस झाल्यासारखं वाटतं. अशा स्थितीत हात आणि पाय काम करणं बंद करतात.
बोलण्यात अडचण
ट्युमर जसजसा वाढत जातो त्यानुसार शरीरातील इतरही अंगांवर प्रभाव पडत जातो. हा ट्युमर पुढे सरकत सरकत टॅपोरल लोबमध्ये येतो आणि त्या व्यक्तीला बोलण्यात अडचण निर्माण होते. अशात त्या व्यक्तीचा आवाज जाण्यासोबतच तोंड एकीकडे वाकडं होतं.
चिडचिड आणि स्वभावात बदल
या आजारामुळे तुमच्या स्वभावावरही प्रभाव पडतो. त्या व्यक्तीची चिडचिड वाढते आणि स्वभावातही फरक पडतो.
अशक्तपणा वाढणे
ब्रेन ट्युमरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डोकं दुखण्यासोबतच अशक्तपणाही येतो. डोक्यात ट्युमर तयार होत असतो. त्यामुळे संपूर्ण शरीर कमजोर होऊ लागतं.
घरगुती उपचार करण्या पेक्षा डाॅक्टरा़ंचा सल्ला घेणे गरजेचे आहे तपासणी करून घेणे गरजेचे आहे अशा वेळी जास्त घरगुती उपचार करू नये
5
Answer link
लस घेतल्यावर डोकं दुखणं, मान दुःखी, हात दुखणे, ताप येणे, थंडी वाजणे ही सर्व लक्षणे आहेत... पण सर्वच लक्षणे अंगावर येतील असे नाही... प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता वेगवेगळी असते, त्यानुसार त्याला यांपैकी काही लक्षणे जाणवतील तर काहींना सर्वच लक्षणं जाणवतील..
काळजी घ्या, सुरक्षित रहा...!
7
Answer link
नेहमी हसत राहा.
कुठलीही काळजी फिकीर करू नका.
सकाळी लवकर उठा. प्राणायाम करा. थोडे फिरायला जा. निसर्गरम्य वातावरणात फिरायला जा.
थोडा वेळ Meditation करत चला.
दिनचर्या मध्ये बदल करा.
हास्यविनोदासाठी मी FIR episode बघत असतो.
खूप comedy serial आहे. 😂😅😄
Interesting पुस्तके वाचत चला.
महाभारत खूप intersting ग्रंथ आहे.
Gitapress Mahabharata खूप छान आहे. रंगीत चित्रांसोबत महाभारत आहे.






कुठलीही काळजी फिकीर करू नका.
सकाळी लवकर उठा. प्राणायाम करा. थोडे फिरायला जा. निसर्गरम्य वातावरणात फिरायला जा.
थोडा वेळ Meditation करत चला.
दिनचर्या मध्ये बदल करा.
हास्यविनोदासाठी मी FIR episode बघत असतो.
खूप comedy serial आहे. 😂😅😄
Interesting पुस्तके वाचत चला.
महाभारत खूप intersting ग्रंथ आहे.
Gitapress Mahabharata खूप छान आहे. रंगीत चित्रांसोबत महाभारत आहे.






0
Answer link
वारंवार डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. तुमच्या वडिलांच्या बाबतीत (वय ६९, कृश प्रकृती), खालील काही संभाव्य कारणे आणि त्या संबंधी माहिती दिली आहे:
तुम्ही तुमच्या वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन जा आणि त्यांची तपासणी करून घ्या. ते त्यांच्या डोकेदुखीचे नेमके कारण शोधून योग्य उपचार करू शकतील.
1. तणाव आणि जीवनशैली (Stress and Lifestyle):
- तणाव: मानसिक किंवा शारीरिक ताणामुळे डोकेदुखी होऊ शकते.
- झोप: अपुरी झोप किंवा झोपण्याच्या वेळेत बदल झाल्यास डोकेदुखी होऊ शकते.
- आहार: वेळेवर जेवण न करणे, जंक फूड जास्त खाणे, किंवा काही विशिष्ट पदार्थांमुळे डोकेदुखी होऊ शकते.
- डिहायड्रेशन: पुरेसे पाणी न पिल्याने डोकेदुखी होऊ शकते.
2. डोळ्यांची समस्या (Eye Problems):
- दृष्टी कमजोर होणे: वय वाढल्यामुळे दृष्टी कमजोर झाल्यास डोळ्यांवर ताण येतो आणि डोकेदुखी होऊ शकते.
3. सायनस इन्फेक्शन (Sinus Infection):
- सायनसमध्ये इन्फेक्शन झाल्यास डोकेदुखी होऊ शकते, विशेषतः डोळ्यांच्या आसपास आणि कपाळावर जास्त दाब जाणवतो.
4. उच्च रक्तदाब (High Blood Pressure):
- उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी होऊ शकते. रक्तदाब नियमितपणे तपासणे आवश्यक आहे.
5. औषधोपचार (Medications):
- काही औषधांच्या साइड इफेक्टमुळे डोकेदुखी होऊ शकते.
6. इतर गंभीर कारणे (Other Serious Causes):
- ब्रेन ट्यूमर (Brain Tumor): मेंदूमध्ये ट्यूमर असल्यास डोकेदुखी होऊ शकते.
- स्ट्रोक (Stroke): स्ट्रोकमुळे अचानक आणि severe डोकेदुखी होऊ शकते.
- टेम्पोरल आर्टरायटिस (Temporal Arteritis): या स्थितीत डोक्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज येते आणि डोकेदुखी होते.
उपाय (Remedies):
- पुरेशी झोप घ्या.
- वेळेवर जेवण करा आणि पौष्टिक आहार घ्या.
- दिवसभर पुरेसे पाणी प्या.
- नियमित व्यायाम करा.
- तणाव कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा.
डॉक्टरांना कधी भेटावे (When to See a Doctor):
- जर डोकेदुखी खूप severe असेल आणि वारंवार होत असेल.
- दृष्टीमध्ये बदल झाल्यास किंवा अंधुक दिसत असल्यास.
- बोलण्यात किंवा चालण्यात अडचण येत असल्यास.
- स्मरणशक्ती कमी झाल्यास.
- ताप, मान दुखणे, किंवा उलट्या होत असल्यास.
Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. वैद्यकीय सल्ल्यासाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
0
Answer link
येथे काही कारणे दिली आहेत जी कडक उष्णतेशिवाय डोकेदुखीस कारणीभूत ठरू शकतात:
* डिहायड्रेशन (Dehydration): पुरेसे पाणी न पिल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
* तणाव (Stress): कामाचा किंवा वैयक्तिक तणाव डोकेदुखीलाtrigger करू शकतो.
* झोप न लागणे (Lack of Sleep): अपुरी झोप किंवा झोपण्याच्या वेळापत्रकात बदल झाल्यास डोकेदुखी होऊ शकते.
* कॅफिन (Caffeine): जास्त प्रमाणात कॅफिन घेणे किंवा अचानक कॅफिन घेणे थांबवल्यास डोकेदुखी होऊ शकते.
* डोळ्यांवर ताण (Eye Strain): जास्त वेळ स्क्रीनवर काम केल्याने किंवा योग्य नंबरचा चष्मा न वापरल्याने डोकेदुखी होऊ शकते.
* सायनस इन्फेक्शन (Sinus Infection): सायनसमध्ये इन्फेक्शन झाल्यास डोकेदुखी होऊ शकते.
* दातांच्या समस्या (Dental Issues): दात दुखणे किंवा जबड्याच्या समस्यांमुळे डोकेदुखी होऊ शकते.
* हवामानातील बदल (Weather Changes): वातावरणातील बदलांमुळे काही लोकांना डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो.
* आहार (Diet): काही विशिष्ट खाद्यपदार्थ, जसे की प्रक्रिया केलेले अन्न किंवा चॉकलेट, डोकेदुखीला कारणीभूत ठरू शकतात.
* औषधे (Medications): काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे डोकेदुखी होऊ शकते.
* इतर वैद्यकीय कारणे (Other Medical Conditions): काही गंभीर वैद्यकीय परिस्थिती, जसे की ॲन्यूरिझम (aneurysm) किंवा ट्यूमर (tumor), डोकेदुखीस कारणीभूत ठरू शकतात.
जर डोकेदुखी वारंवार होत असेल किंवा असह्य होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.