डोकेदुखी आरोग्य

डोकेदुखी वर उपाय सांगा?

*_⭕ ड़ोकेदुखीवर हे उपाय  करून पहा  ⭕_*

सोपे उपाय करूनही ही डोकेदुखी थांबवता येते. त्यासाठी ही माहिती जरूर वाचा.१)डोके दुखणे- डोके दुखत असेल तर अमसुले पाण्यात भिजत घालून, कुस्करून साखर मीठ घातलेले सरबत अथवा कोकम सरबत घ्यावे.२) बरेच वेळा रात्री कांही कारणाने झोपायला उशीर होतो व जागरण होते.जागरणाने डोके दुखत असेल तर १५ निनिटे झोप अथवा विश्रांती हा चांगला उपाय आहे. डोक्यातील कलकलही या विश्रांतीमुळे कमी होते.

३)वेळी अवेळी खाणे. सततचे उपवास अथवा बराच काळ उपाशी राहणे याने पित्त वाढते व बरेचवेळा त्यामुळेडोकेदुखी होते.पित्ताने डोके दुखत असल्यास गार दूध प्यावे.३)अर्धशिशीचा त्रास होत असेल तर -सुंठ अधिक जायफळ यांचा लेप भुवईच्या वर लावावा. शिंक काढण्याच्या कोणत्याही उपायाने शिंक काढल्यासही अर्धशिशी कमी होते अथवा सकाळी उठल्या बरोबर पेढा खाल्ल्याने ती कमी होते. अर्धशिशी पित्त व सर्दीमुळे होते. पेढयाने पित्त कमी होते व शिंक काढण्याने सर्दी मोकळी होते. अर्धशिशी म्हणजे डोक्याचा अर्धा भाग दुखणे.हे दुखणे त्रासदायक असते व सूर्योदयापासून ते सुरू होते ते सूर्यास्तानंतर कमी होते.४)सर्दी अथवा बारीक ताप किवा अंग मोडून येणे यासारख्या आजारातही डोके दुखते. गरम पाण्याच्या पिशवीने डोके शेकून काढल्यास ही डोकेदुखी थांबते. अथवा अमृतांजन किवा तत्सम बाम डोक्यास चोळल्यासही आराम पडतो.५) बरेच वेळा जादा वाचन, टिव्ही पाहणे अथवा डोळ्यावर ताण आणणारी कामे झाल्यासही डोके दुखते. अशा वेळी डोळ्यांना चष्मा आला नाही ना याची खात्री करून घ्यावी. डोळ्याला नंबर आल्यानेही डोकेदुखी होते व योग्य नंबरचा चष्मा वापरायला सुरवात केली की ती बंद होते.

1 उत्तर
1 answers

डोकेदुखी वर उपाय सांगा?

0
Crocin घ्या फरक पडेल.
उत्तर लिहिले · 10/4/2021
कर्म · 730

Related Questions

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचराची कोणती कामे असतात?
Penis जास्त वेळ मजबूत राहण्यासाठी काय केले पाहिजे?
Vajan kse kmi krayche?
लहान मुलाचे केस वाढवण्यासाठी काय करावे?
निर्भरणीकरणाची कारणे स्पष्ट करा?
भारतातील औद्योगिक चिकित्सा करा भाषाची?
योग साधनेसाठी नैसर्गिक औषधी वनस्पतींचे महत्त्व?