3 उत्तरे
3
answers
करदोरा (करगोटा) बांधावा का? उत्तर हो असल्यास त्याचे कारण काय?
8
Answer link
करगोटा म्हणजेच करदोरा बांधावा कि नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. महाराष्ट्रात कमरेला करदोरा बांधण्याची प्रथा आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला करदोरा देते. करगोटा हा काळ्या रंगाचा असतो. हा का बांधतात याचे ठोस कारण सांगता नाही येणार. पण माझ्या तर्कानुसार याची २-३ करणे असू शकतात. पुरुष करगोटा बांधतात. शरीरावर काळ्या रंगाचे काही असेल तर त्याकडे पाहणार्यांची पहिली नजर जाते आणि नजर लागत नाही असा एक प्रचलित समज आहे. म्हणूनच पुरुषाला नजर लागू नये म्हणून करगोटा बांधत असतील. पहिलवानाचे शरीर पिळदार आणि आकर्षक असते म्हणून नजर लागू नये म्हणून हि प्रथा पडली असावी.

तसेच लहान बाळ गोंडस असते म्हणून नजर लागू नये म्हणून करदोरा बांधत असतील.

तसेच पूर्वी राजे महाराजे कमरपट्टा दागिना वापरायचे. हे हि करदोरा वापरसाम्गचे एक कारण असू शकते.
दुसरी गमतीशीर बाजू म्हणजे सैल पॅन्ट असेल तर बेल्ट नसेल तर करगोट्याचा बेल्ट सारखा वापरही खेड्यात केला जातो. तसेच खेड्यात विहिरीत पोहायला शिकवताना लहान मुलाला करगोट्याला धरून पोहायला शिकवतात. थोडक्यात करदोरा का बांधावा हे नक्की सांगू शकत नाही पण त्याचा उपयोग अनेक प्रकारे केला जाऊ शकतो.
3
Answer link
करगोटा म्हणजेच करदोरा बांधावा कि नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. महाराष्ट्रातकमरेला करदोरा बांधण्याची प्रथा आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला करदोरा देते. करगोटा हा काळ्या किंवा लाल रंगाचा असतो. हा का बांधतात याचे ठोस कारण सांगता नाही येणार. तर्कानुसार याची 2-3 करणे असू शकतात. पुरुष करगोटा बांधतात. शरीरावर काळ्या रंगाचे काही असेल तर त्याकडे पाहणाऱ्यांची पहिली नजर जाते आणि नजर लागत नाही असा एक प्रचलित समज आहे. म्हणूनच पुरुषाला नजर लागू नये म्हणून करगोटा बांधत असतील.
पहिलवानाचे शरीर पिळदार आणि आकर्षक असते म्हणून नजर लागू नये म्हणून ही प्रथा पडली असावी. तसेच लहान बाळ गोंडस असते म्हणून नजर लागू नये म्हणून करदोरा बांधत असतील. तसेच पूर्वी राजे महाराजे कमरपट्टा दागिना वापरायचे. हे ही करदोरा वापरण्यामागचे एक कारण असू शकते. तसेच खेड्यात विहिरीतपोहायला शिकवताना लहान मुलाला करगोट्याला धरून पोहायला शिकवतात. थोडक्यात करदोरा का बांधावा हे नक्की सांगू शकत नाही पण त्याचा उपयोग अनेक प्रकारे केला जाऊ शकतो.
काही वैद्यकीय कारणं पण सापडली आहेत. पुरुषांना हर्निया होण्याचा धोका जास्त असतो. काही संशोधना नुसार असे समोर आले आहे की जे व्यक्ती कमरेला कारदोरा बांधतात त्यांच्यात हर्निया होण्याचे प्रमाण न बांधणाऱ्या व्यक्तिपेक्षा कमी आढळून आला. नवजात शिशुची वाढ फार पटकन होत असते, ज्यामुळे त्यांच्या हृदयापासून पाया पर्यंतच्या रक्त पुरवठ्यावर फरक होऊ शकतो. हा धागा बांधून, रक्त परिसंचरण योग्यरित्या नियंत्रित होतो असा काही शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. दुसरी गमतीशीर बाजू म्हणजे सैल पॅन्ट असेल तर बेल्ट नसेल तर करगोट्याचा बेल्ट सारखा वापरही केला जातो.
0
Answer link
करदोरा (करगोटा) बांधावा का?
उत्तर होय आहे. करदोरा बांधणे हे अनेक दृष्टीने फायदेशीर आहे.
करदोरा बांधण्याची कारणे:
- आरोग्य: करदोरा कमरेला आधार देतो. ज्यामुळे कंबरदुखीचा त्रास कमी होतो. तसेच पोटावर दाब निर्माण झाल्याने पोटाचे आरोग्य सुधारते.
- सुरक्षा: लहान मुलांना करदोरा घातल्याने ते हरवल्यास ओळखायला सोपे जाते.
- संस्कृती: करदोरा हे भारतीय संस्कृतीत शुभ मानले जाते.
- आभूषण: काही लोक करदोऱ्याला आभूषण म्हणूनही वापरतात.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.