2 उत्तरे
2
answers
आंब्याचे पान शुभ कार्यात का वापरले जाते?
3
Answer link
हिंदू धर्मात शुभकार्याप्रसंगी आंब्याच्या पानाला खूप महत्त्व असते. त्यावेळी सजावटीसाठी आंब्याची पाने घराच्या दरवाज्याला लावतात. यामागे धार्मिक कारण असल्याचे सांगितले जाते.
हिंदू धर्मात वृक्षांचा खूप सन्मान केला जातो. काही वृक्षांची पूजा ही केले जाते. तर काही वृक्षांना अन्नदेवतेचाही दर्जा दिला जातो. त्यात आंब्यांच्या पाने देखील पूजेदरम्यान वापरली जातात. फक्त दरवाज्यावरच आंब्याची पाने लावत नसून पूजेदरम्यान कलशाच्या बाजूने पाने लावली जातात. एवढच नाही तर, लग्नाच्या वेळी मंडप देखील आंब्याच्या पानाने सजवतात. नवजात बालकाच्या पाळण्याला ही आंब्याच्या पानाने सजवतात. काही धार्मिक कार्यात पानाचे वापर मोठ्या प्रमाणात करतात.सर्व शुभकार्यात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. प्रवेशव्दाराजवळ लावलेल्या पानामुळे सर्व शुभकार्य कोणत्याही विघ्नेशिवाय पार पडते. या पानामध्ये काय खास महत्त्व आहे की, सर्व शुभकार्यात आंब्यांची पाने गरजेची असतात.धार्मिक मान्यतेनुसार, आंबा हा हनुमान यांचे आवडते फळ आहे. त्यामुळे जिथेही आंबा आणि आंब्याची पान असतात तिथे हनुमानची कृपा असते असे मानले जाते. आंब्याच्या झाडाचे लाकूड हे हवन सामुग्रीमध्येही वापरतात. या लाकडाचा वापर हवन करताना केल्यास वातावरणाता सकारत्मकता वाढते. जेव्हाही बाहेरून येणारी हवा जेव्हाही पानांना स्पर्श करते तेव्हा सकारत्मकता घरात प्रवेश करते असे म्हटले जाते.
0
Answer link
आंब्याच्या पानांचा शुभ कार्यांमध्ये वापर करण्याचे कारण खालीलप्रमाणे आहे:
- धार्मिक महत्त्व: हिंदू धर्मात, आंबा आणि आंब्याच्या पानांना खूप महत्त्व आहे. आंबा हा समृद्धी आणि शुभता यांचे प्रतीक मानला जातो. यूट्यूब व्हिडिओ (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- सकारात्मकता: आंब्याची पाने सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात, असे मानले जाते.
- शुद्धता: पाने शुद्ध आणि पवित्र मानली जातात आणि त्यामुळे ते वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करतात.
- उत्सव: कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना, आंब्याच्या पानांचे तोरण दारावर लावण्याची प्रथा आहे. यामुळे घरात सकारात्मकता येते.
- आरोग्य: आंब्याच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात.
त्यामुळे, आंबा आणि आंब्याची पाने शुभ आणि मंगलमय मानली जातात आणि म्हणूनच ती शुभ कार्यांमध्ये वापरली जातात.