2 उत्तरे
2
answers
कुलाचार म्हणजे काय?
1
Answer link
खुप लोकांचा एकच प्रश्न आहे. आम्हला आमची कुलदेवी माहीत नाही. मुळ गाव माहीत नाही. मुळपुरुष माहीत नाही.. मी माझा लेखातून अनेक वेळा या गोष्टी समजवायचा प्रयत्न केला तरी सर्व त्याच गोष्टीकडे अडकून आहेत. सर्व लेख नीट वाचले तर सर्व प्रश्न ची उत्तरे त्यात दडलेली आहेत. पण याचा कोणीही बारकाईने विचार करत नाही. असो...
कुलाचार हरवतो आणि तो शोधावा लागतो हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. जर कुलदेवता माहीत नसेल किंवा कुलाचार च मूळ ठिकाण किंवा गाव माहीत नसेल तरी काळजी करु नका. जसा तुमच्या सोबत तुमचा पूर्वज असतो त्याच प्रमाणे त्याने मिळवलेला आकार म्हणजे कुलदेवी वैगरे त्याचा सोबतच असतात. भवानी म्हटली की तुळजापूरला जाऊन च कुलाचार करावा लागेल असे पण काही नसते.
कुलदेवता म्हणजे कुलातील सर्व देवतांचा संच. त्यात कुलदेवी आली,कुलपुरुष आला ,मुळपुरुष आला आणि इतर संबंधित जोड देवता सुद्धा आल्या. कूळ+ आचार याला कुलाचार म्हणतात. जिथे आपण तिथे कुळ आणि जिथे कूळ तिथे त्याच आचरण करायचं.
मी यापूर्वी च म्हटलेलं आहे की मुळ गाव सोडून ज्या गावात तुम्ही राहता. त्या गावात जर तुमची वास्तू असेल . वास्तू पुरुष असेल. त्याच घरात गणपती वैगरे पूजत असाल आणि त्या गावात तुमचा पूर्वज येऊन किंवा तुम्ही येऊन 12 वर्ष लोटली असतील तर त्या गावाची ग्राम देवता ला आपली देवी समजावी. ( मूळ माहीत नसेल तर) ज्या ज्या कुळातील मुळपुरुष ने ज्या देवी ची भक्ती केली ती त्या कुळाची कुलदेवता.. पण जर कुणाला आपली कुलदेवता माहीत नसेल तर त्यांनी मुळ माया ची आराधना करावी. मुळ माया म्हणजे ज्या मुळ तत्व पासून काली,लक्ष्मी,सरस्वती ची उत्पत्ती झाली ती स्वयंसाक्षात परमेश्वरी अंबिका. म्हणजेच महालक्ष्मी. या मूळ माया ची भक्ती केल्यावर तुमची कुलदेवी कोणीही असुदे तिच्या आशीर्वाद ची आणि केलेल्या कार्य ची फलप्राप्ती होते. आणि या मुळ मायेचं प्रतीक म्हणूनच तिचा नावाने मंगल कलश स्थापन करण्यास सुचवले होते. हा मंगल कलश मध्ये तुमच्या कुलातील सर्व देवतानाचा वास असतो. कलश मध्ये पाणी असते. आणि मुळ तत्व चा पाण्या मधेच वास असतो. पाषाण पेक्षाही उच्च तत्व च रूप हे कलश ला मानलं जाते. या कलश समोर केलेली भक्ती . कुलदेवी समोर बसून केलेल्या भक्ती समान आहे. या कलश वर केलेला अभिषेक साक्षात देवीवर अभिषेक केल्या समान आहे. या कलश समोर तुम्ही देवी चा नावाने ओटी चा मानपान केला तरी तो मान्य होतो. कुलदेवी च स्वरूप आणि मुळ पूर्वजांच ठिकाण समजे पर्यंत किंवा कायम तुळजापूर ला कोल्हापूर ला वणी ला जाण शक्य होत नसेल तरी या मंगलकलश मध्ये देवी तत्व जागृत असून मंदिरातील देवी तत्व एवढीच ऊर्जा या कलश च्या ठिकाणी असते. कुलदेवी च तत्व वास करत असते याची जाण असुद्या.
म्हणून मी जिकडे सोवळे पाळणे शक्य नाही तिथे हा कलश स्थापन करू नये असे सुचवले होते. शक्यतो गावी मूळ घरा मध्ये तिची या स्वरूपात स्थापना करावी.
कलश स्वरूपात जरी देवी ची स्थापना केली तरी सर्व प्राप्त झाले असे होत नाही. आपणास भक्ती करून आपला कुलाचार आणि घडी जोड करावी लागते. या साठी प्रथम जी देवता जी यात महत्वाची असते ती म्हणजे 'गणपती'
" प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा ।
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ||
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी |
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ||
गणपती ही विद्येची देवता. कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर प्रथम या देवतेकडे शरण यावे लागते. त्याची भक्ती करून मग हळू हळू कृपा प्रसाद होण्यास सुरू होते. . कारण गणपती ला सर्व देवताकडून तसा आशीर्वाद प्राप्त आहे. प्रथम गणपती ।।।।। तेव्हा मुळपुरुष सामील होऊन स्वतः पुढाकार घेऊन कुलदेवी ची छाया जोडून देण्यास आपली मदत करतो. जर कुलाचार पर्यंत पोहोचायचे असेल तर कुल तत्व कडे गणपती ची आराधना करणे गरजेचे. यासाठी 'अथर्वशीर्ष ' हे मुख्य साधन आहे. रोज एक वेळ आणि दर मंगळवारी 11 वेळा. असा नित्य नेम असेल तर उत्तम.. तोंडपाठ करा. घरातील लहान मुलाच्या ओठावर अलगत खेळले पाहिजे. . मी सुद्धा माझा कुलाचारच्या शोधात होतो. तेव्हा अथर्वशीर्ष वर विशेष लक्ष देऊन पुढे जात राहिलो. गणपती स्तोत्र, शिवलीलामृत ,11 वा अध्याय, बेचाळीस ओव्या,शिवस्तुती, कुंजीका स्तोत्र, या साध्या सोप्या नित्य साधनेने कुलाचार च्या जवळ पोहोचत गेलो. . तुम्हला सुद्धा हळू हळू तुम्हला तुमच्या वास्तू मध्ये काय दोष आहे किंवा तुमच्या चुका काय आहेत. पूर्वजीक काय दोष आहे या संबंधी अनुत्तरित उत्तरे तुम्हला मिळू शकतात. किंवा मूळ गाव,मूळ देवता तीच मूळ ठिकाण या संबंधी माहिती मिळू शकते. .
खूप लोक मोठं मोठ्या विद्या, साधना पैसे देऊन सिद्ध करून मिळणाऱ्या वस्तू च्या मागे धावतात. कधी पाहिले नाही असे मंत्र घेऊन त्याचा मागे धावत राहतात आणि वाट चुकतात. पण यांना शिवस्तुती म्हणजे काय ते माहीत नसतं. कधी अथर्वशीर्ष पण पाहिलेलं नसत. "ओम नमः शिवाय " हा मंत्र लहान वाटू लागतो. शेवटी मी एकच म्हणेन.
तुज आहे तुजपाशी। परी तू वाट चुकलासी।।
श्री स्वामी समर्थ
0
Answer link
कुलाचार म्हणजे एखाद्या कुटुंबाचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आचार, विचार, आणि पद्धती. कुलाचार हे त्या कुटुंबाच्या परंपरेचा भाग असतात आणि ते विशिष्ट कुटुंबाला ओळख मिळवून देतात.
कुलाचारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- देवता आणि त्यांची पूजा: प्रत्येक कुळाची एक विशिष्ट देवता असते, ज्याची ते परंपरेने पूजा करतात.
- सण आणि उत्सव: कुलात विशिष्ट सण आणि उत्सव साजरे करण्याची पद्धत असते.
- विधी आणि परंपरा: लग्न, मुंज, बारसे यांसारख्या विधींमध्ये कुळाचारांचे पालन केले जाते.
- खाण्याच्या पद्धती: काही कुळांमध्ये विशिष्ट प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि ते विशिष्ट पद्धतीने खाल्ले जातात.
- भाषा आणि वेशभूषा: काही कुळांची स्वतःची अशी भाषा आणि वेशभूषा असते.
कुलाचार हे कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे आणि त्यांच्यात एकजूट निर्माण करण्याचे काम करतात. ते पिढी दर पिढी ज्ञानाचे आणि संस्कृतीचे हस्तांतरण करण्यास मदत करतात.
अधिक माहितीसाठी, आपण खालील साइट्सला भेट देऊ शकता: