2 उत्तरे
2 answers

उंबरठा म्हणजे काय?

2
🌹 *उंबरठा* 🌹

उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे उंबराचा वृक्ष. म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे. या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे. उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे. घरात शिरताना शुभ वृक्षाच्या लाकडाला ओलांडून प्रवेश केल्यास घरातील उर्जा कायम सकारात्मक राहिल, या हेतूने उंबराच्या वृक्षाचा वापर होत असावा, असाही कयास करता येईल. 
काही लोक याच उंब-याला उंबरठा असेही म्हणतात. उंब-यापाशी उभं राहून आपण येणा-या व्यक्तीची वाट बघतो. उंबरा ओलांडून एखाद्या भिक्षेक-याच्या झोळीत भिक्षा टाकतो. नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेशते. उंब-याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंब-याच्या खूप सा-या भूमिका असल्या तरीही माझ्या मते उंबरा असते एक मर्यादा. उंबरा असते एक सीमारेषा. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट. 
बाहेरुन घरात येणा-यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशत असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंब-याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं. आणि, घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही, हे आपल्या लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा. उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान.
उंब-याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. उंबरठे झिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच. पण उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंब-याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं. अजून एक गोष्ट इथे नमूद करायलच हवी. ती म्हणजे - उंब-याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान. हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं.

उत्तर लिहिले · 8/8/2022
कर्म · 53715
0

उंबरठा म्हणजे घराच्या दरवाजाच्या चौकटीचा खालचा भाग. हे सहसा लाकडी किंवा दगडाचे बनलेले असते.

उंबरठ्याचे महत्त्व:

  • उंबरठा हा घराची सीमा दर्शवतो.
  • तो घरात सकारात्मक ऊर्जा आणि घरात शांती टिकवून ठेवतो, असे मानले जाते.
  • उंबरठा नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखतो.
  • भारतीय संस्कृतीत उंबरठ्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते.

उंबरठ्याबद्दल काही मान्यता:

  • स्त्रियांनी उंबरठ्यावर बसू नये.
  • रिकाम्या हाती उंबरठा ओलांडू नये.
  • उंबरठ्यावर पाय ठेवून उभे राहू नये.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

पंढरपूरला जाताना वारकरी पांढरे कपडे का घालतात?
वारकरी नेहमी पांढऱ्या रंगाचा पोशाख का घालतात?
महिलांसाठी उखाणे कोणते?
कुलाचार म्हणजे काय?
होळीतील ‘बोंब मारणे’ या कृतीमागील शास्त्र काय आहे?
आंब्याचे पान शुभ कार्यात का वापरले जाते?
प्रश्न क्रमांक 2 ):- एक देवी जिची वर्षातून एकदाच पूजा केली जाते, त्या देवीचे नाव सांगा?