3 उत्तरे
3 answers

हक्क म्हणजे काय?

1
प्रा. एच. के. लास्की यांच्या मते, "हक्क म्हणजे सामाजिक जीवनाची अशी परिस्थिती होय की ज्याच्याशिवाय व्यक्तीला सामान्यतः स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेणे शक्य होत नाही.
उत्तर लिहिले · 2/11/2016
कर्म · 3070
1
मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ अंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगास या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान केले गेले आहेत. राष्ट्रीय वा राज्य मानवी आयोग स्वत:देखील मानवाधिकार उल्लंघनाची दखल घेऊन कारवाई करु शकतात. याबाबतच्या विविध तक्रारीचे निवारण करणे, गुन्हेगारास इतर कायद्यांतर्गत न्यायालयाद्वारे शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे काम आयोग करीत असते.मानवी हक्क म्हणजे काय, त्यांचे स्वरूप, त्यांचे उल्लंघन झाल्यास तक्रार करण्याची पध्दत, मानवी हक्क आयोगाचे अधिकार या सार्‍यांबाबत या कायद्यात विवेचन करण्यात आले आहे.
तक्रार कुठे करता येईल?
१) मानवी हक्कांच्या हननांविरुध्द तक्रारी पीडित व्यक्ती स्वत:, तिचे नातेवाईक वा सामाजिक संस्था राष्ट्रीय वा राज्य मानवी आयोगाकडे लेखी वा तोंडी करु शकतात.
२) राष्ट्रीय वा राज्य मानवी आयोग स्वत:देखील मानवाधिकार हननाची दखल घेऊन कारवाई करु शकतात.
३) अशा तक्रारीचे निवारण करणे, गुन्हेगारास इतर कायद्यांतर्गत न्यायालयाद्वारे शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे काम आयोग करीत असते.
४) आयोगाकडे साध्या पोस्टकार्डावर देखील तक्रार करता येते.
५) तसेच भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मानवी हक्कांच्या संरक्षणासाठीचे सल्ले व उपाययोजना शासनास सुचविण्याचे काम पण आयोग करीत असते.
६) महाराष्ट्रात मुंबई येथे राज्य मानवी हक्क आयोगाचे कार्यालय आहे.



महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग
9, हजारीमल सोमाणी मार्ग, सी.एस.टी स्टेशन समोर, मुंबई- 400 001.
उत्तर लिहिले · 1/10/2017
कर्म · 4640
0
हक्क म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी, आपण विविध पैलू विचारात घेऊया:
हक्क (Rights):

हक्क म्हणजे असा दावा जो समाजाला मान्य आहे आणि कायद्याने संरक्षित आहे. हे ते फायदे आहेत जे प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवेत आणि ज्यामुळे ते त्यांचे जीवन व्यवस्थित जगू शकतील.

हक्कांचे प्रकार (Types of Rights):
  • नैसर्गिक हक्क (Natural Rights): हे हक्क जन्मतःच मिळतात, जसे जगण्याचा हक्क.
  • कायदेशीर हक्क (Legal Rights): हे हक्क कायद्याने दिले जातात, जसे मतदानाचा हक्क.
  • सामाजिक हक्क (Social Rights): हे हक्क समाजाच्या हितासाठी असतात, जसे शिक्षणाचा हक्क.
हक्कांचे महत्त्व (Importance of Rights):

हक्कामुळे व्यक्तीला स्वातंत्र्य मिळते आणि ते आपले विचार व्यक्त करू शकतात. यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळतात आणि कोणावरही अन्याय होत नाही.

उदाहरण (Example):

भारतीय संविधानाने नागरिकांना अनेक मूलभूत हक्क दिले आहेत, जसे समानता, स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा हक्क.

अधिक माहितीसाठी (For More Information):

तुम्ही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: NHRC Official Website

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5220

Related Questions

मूलभूत मानवी हक्क आणि नागरी स्वातंत्र्य या संकल्पना स्पष्ट करा?
मूलभूत हक्कांच्या संरक्षणाच्या दृष्टीने न्यायदान मंडळाचे कार्य स्पष्ट करा?
Hakk mhnje kay?
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणते आहेत?
व्यक्ती आणि समाजाच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आधारित हक्क?
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क स्पष्ट करा?
भारतीय राज्य घटनेतील मूलभूत हक्क स्पष्ट करा?