पाव घरच्या घरी बनवता येतो का?
पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दोन ते तीन कप मैदा, साखर दिड चमचा यीष्ट एक चमचा तेल कोमट पाणी
प्रथम कोमट पाण्यात यीष्ट आणि साखर मीक्स करुन ते १०ते१५मिनिट ठेवावे आणि नंतर पीठ घेऊन त्यात यीष्ट घालावे आणि त्यात तेल घालून चांगले मिक्स करावे आणि कोमट पाण्यात पीठ भिजवावे पीठ चांगले मळून घ्यावे आणि ही प्रक्रिया तीन वेळा करावे पीठ मात्र झाकून ठेवावे पीठ चांगले फुलनि येत . एक ट्रे तेल लावून त्यांच्यावर पीठ भुरभुरावे आणि ट्रे मध्ये हे गोळे लावावे आणि त्याच्यावर तेल लावावे
पाव तयार करण्यासाठी ओव्हन नसेल तर गॅस वर कुकर किंवा खोलगट अॅल्युमिनियची कढईत पण तयार करता येते तर कुकरमध्ये खाली तळाला जाळी ठेवावी गॅस मंद आचेवर पंधरा ते वीस मिनिटे ठेवावे आणि नंतर खाली उतरल्यावर थंड झाल्यावर पाव बाहेर काढणार तुम्हाला पाहिजे असलेले पाव तयार.
हो पाव घरच्या घरी बनवता येतो.
साहित्य:
३ कप सेल्फ राईजिंग फ्लोर किंवा मैदा (टीप १)
३ टिस्पून ड्राय यिस्ट
दिड टिस्पून साखर
१ टिस्पून मिठ (टीप)
४ टेस्पून तेल
दिड ते पावणेदोन कप कोमट पाणी
२ टेस्पून दूध
कृती:
१) एका लहान वाडग्यात १/२ कप कोमट पाणी घ्यावे. पाणी खुप गरम नसावे आणि अगदी गुळमूळीत कोमटही नको. या पाण्यात दिड टिस्पून साखर घालावी. थोडे ढवळून ड्राय यिस्ट घालून मिक्स करावे. यिस्ट activate होण्यासाठी ५ ते १० मिनीटे झाकून ठेवावे. १० मिनीटांनी जर मिश्रण फेसाळले असेल तर समजावे कि यिस्ट activate झालेय.
२) मोठ्या वाडग्यात ३ कप पिठ, यिस्टचे पाणी, मिठ आणि पाणी घालून एकदम मऊसर मळून घ्यावे. २ ते ३ मिनीटे थोडे कोरडे पिठ भुरभूरवून मळावे छान मळून घ्यावे. नंतर तेल घालून ५ मिनीटे मळावे. प्लेन सरफेसचा गोळा करून वाडग्यात ठेवावा. वरून झाकण ठेवून एक-दीड तास उबेला ठेवावे.
३) एक-दीड तासांनी पिठाचा गोळा दुप्पट आकाराचा होईल. थोडा तेलाचा हात लावून एकदा किंचित पंच करून घ्यावे.
४) बेकिंग ट्रेला थोडा तेलाचा हात लावावा आणि किंचीत कोरडे पिठ भुरभूरावे. १० एकसमान गोळे करावे आणि एकमेकांना चिकटून ठेवावे. वरून प्लास्टिकची पिशवी ठेवून पावाचे गोळे अजून फुलून येण्यासाठी १/२ तास झाकून ठेवावे.
५) १/२ तासाने ओव्हन ३७५ F (१८८ C) वर प्रिहीट करावे. ओव्हन प्रिहीट होईस्तोवर पावाच्या गोळ्यांवर दुधाने हलक्या हाताने ब्रशिंग करावे. ओव्हन प्रिहीट झाल्यावर पाव २० ते २२ मिनीटांसाठी बेक करावे. ओव्हन बंद करावा, ट्रे ३ ते ४ मिनीटांनी बाहेर काढावा. कोमट झाल्यावर पाव सर्व्ह करावा.
गरमगरम पाव मिसळ, पावभाजी, बटाटा वडा, छोले, पिंडी छोले या पदार्थांबरोबर छान लागतो.
टीप:
१) ब्रेड बनवण्यासाठी सेल्फ राईजिंग फ्लोर वापरले . सेल्फ राईजिंग फ्लोर म्हणजेच ऑल पर्पज फ्लोर, मिठ आणि बेकिंग पावडर यांचे मिश्रण. म्हणून सेल्फ राईजिंग फ्लोरसुद्धा ब्रेड बनवण्यासाठी वापरता येते फक्त यामध्ये मिठ आधीपासूनच असते म्हणून मिठ अगदी थोडेच घालावे. जर मैदा (ऑल पर्पज फ्लोर) वापरणार असाल तर मिठ दिलेल्या प्रमाणात घालावे.
२) पिठ तेल घालून जितके जास्त मळाल तितका जास्त पाव मऊ आणि हलका होईल.
साहित्य:
- २ कप मैदा
- १ टीस्पून इन्स्टंट यीस्ट
- १ टीस्पून साखर
- १ टीस्पून मीठ
- १ कप कोमट पाणी
- २ टेबलस्पून तेल
कृती:
- एका मोठ्या भांड्यात मैदा, यीस्ट, साखर आणि मीठ मिसळा.
- त्यात कोमट पाणी आणि तेल घालून मऊ पीठ मळून घ्या.
- पीठ चांगले मळून झाल्यावर त्याला तेलाने ग्रीस करा आणि एका तासासाठी उबदार जागी ठेवा.
- एक तासानंतर पीठ फुगून दुप्पट होईल. त्याला पुन्हा एकदा मळून घ्या.
- पिठाचे छोटे गोळे तयार करा आणि त्यांना पावाचा आकार द्या.
- एका बेकिंग ट्रेला तेल लावा आणि त्यावर हे पाव ठेवा.
- पावांना 15-20 मिनिटे तसेच ठेवा, त्यामुळे ते आणखी थोडे फुगतील.
- ओव्हनला १८०°C वर गरम करा आणि पावांना 15-20 मिनिटे बेक करा.
- पाव गोल्डन ब्राऊन झाल्यावर ओव्हनमधून बाहेर काढा आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.
टीप:
- पाव अधिक मऊ होण्यासाठी, पिठात थोडे बटर किंवा दूध पावडर घाला.
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठात लसूण किंवा इतर मसाले देखील घालू शकता.
तुम्ही युट्युब वर सुद्धा अनेक रेसिपी पाहू शकता.
पाव रेसिपी (YouTube)