प्रक्रिया पाककला बेकिंग

केक कसा तयार करायचा?

2 उत्तरे
2 answers

केक कसा तयार करायचा?

7
चॉकलेट केक-

सर्व्हिंग: ४ ते ६ माणसांसाठी

साहित्य:

२ कप मैदा

३/४ कप कोको पावडर

१ १/२ कप साखर

३/४ कप घट्ट लोणी

२ टीस्पून  बेकिंग पावडर

४ अंडी

१ टीस्पून व्हॅनीला इसेन्स  

१/२ कप गार दुध 

२ टेबलस्पून रेड वाईन + २ टेबलस्पून साखर-पाणी (optional)


कृती:

१. मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर एका मोठ्या पातेल्यात बारीक चाळणीतून चाळून एकत्र करून  घ्या.
२. साखर दळून बारीक करून घ्या. लोणी आणि साखर एकत्र करून छान फेटून घ्या. साखर पूर्ण विरघळून एकदम स्मूथ टेक्स्चर आले पाहिजे. अंडी वेगळी फेटून घ्या
३. फेटलेल्या अंड्यात फेटलेलं लोणी-साखर घालून सगळे पुन्हा एकत्र फेटून घ्या. फेटताना एकाच दिशेने फेटा. सगळे मिश्रण एकजीव होऊन स्मूथ टेक्स्चर आले पाहिजे.
४. हे सगळे मिश्रण चाळून घेतलेल्या मैदा,कोको पावडर आणि बेकिंग पावडर मध्ये मिक्स करा. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. सगळे मिश्रण एकाच दिशेने फिरवत छान फेटून घ्या.
५. मिश्रण छान एकजीव झाले कि, त्यात दुध घालून पुन्हा फेटा.
६. व्हॅनीला इसेन्स  घालून मिक्स करा.
७. बेकिंग भांड्याला लोण्याचा हात लावून घ्या आणि वरती चिमटीने थोडासा मैदा भुरभुरा. मैदा भांड्याला चिकटला पाहिजे.जास्तीचा मैदा फुंकर मारून काढून टाका.
८. अलगदपणे तयार केलेले केकचे मिश्रण भांड्यात ओता. हाताने पसरून सपाट करून घ्या.
९. ओव्हन ३५० F तापमानाला प्रीहीट करा आणि ३० मिनिटे बेक करा. केक भांड्याच्या कडा सोडायला लागला याचा अर्थ केक पूर्ण बेक झाला. केकमध्ये टूथ पिक टोचून बघा. टूथ पिक स्वच्छ काहीही न चिकटता बाहेर आली याचा अर्थ केक झाला.
१०. केक पूर्ण थंड झाला कि, अलगद बाहेर कडा आणि केकला बरोबर मधून आडवी चीर द्या. कापलेल्या भागावर वाईन आणि साखरेचे पाणी स्प्रे करा किंवा शिंपडा.
११. कापलेले भाग पुन्हा एकमेकांवर ठेवून केकचे तुकडे करा आणि सर्व्ह करा.
उत्तर लिहिले · 21/10/2018
कर्म · 13485
0

केक बनवण्यासाठी अनेक पद्धती आहेत आणि ते बनवण्यासाठी अनेक गोष्टी लागतात. मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो:


साहित्य:

  • मैदा - २ कप
  • साखर - १ कप
  • तेल - १/२ कप
  • दही - १ कप
  • दूध - १/२ कप
  • बेकिंग सोडा - १ चमचा
  • बेकिंग पावडर - १ चमचा
  • व्हॅनिला इसेन्स - १ चमचा

कृती:

  1. सर्वप्रथम, ओव्हन १८०°C (३५०°F) वर गरम करा.

  2. एका भांड्यात मैदा, साखर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करा.

  3. आता त्यात तेल, दही, दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा.

  4. हे मिश्रण एका ग्रीस केलेल्या केकच्या भांड्यात टाका.

  5. आता हे भांडे ओव्हनमध्ये ३०-३५ मिनिटे बेक करा.

  6. केक थंड झाल्यावर सर्व्ह करा.


टीप: आपण आपल्या आवडीनुसार केक मध्ये बदल करू शकता. जसे की ड्राय फ्रुट्स (Dry Fruits) टाकू शकता किंवा चॉकलेट इसेन्स (Chocolate essence) वापरू शकता.


उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5040

Related Questions

पाव तयार करताना तो फुगतो का बरं?
बेकरीत एगलेस स्पंज कसा बनवतात? बेकरकडून उत्तर अपेक्षित आहे.
100 माणसांसाठी किती किलोचा केक लागेल?
मला केक बनवायला शिकायचे आहे का?
पाव घरच्या घरी बनवता येतो का?