
खाद्यपदार्थ
0
Answer link
शेगावच्या कचोरीचा नेमका इतिहासdocumented स्वरूपात उपलब्ध नाही, परंतु त्याबद्दल काही प्रचलित कथा आणि माहिती खालीलप्रमाणे आहे:
- सुरुवात: शेगाव हे संत गजानन महाराजांच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपूर्वी, मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अल्पोपहार म्हणून कचोरी बनवण्यास सुरुवात झाली.
- लोकप्रियता: हळूहळू या कचोरीची चव भाविकांना आवडली आणि ती प्रसिद्ध झाली.
- वैशिष्ट्य: शेगावच्या कचोरीची चव इतर ठिकाणच्या कचोरीपेक्षा वेगळी असते. ती चवीला चटपटीत आणि मसालेदार असते.
- आजची स्थिती: आज शेगावात अनेक ठिकाणी कचोरी उपलब्ध आहे आणि ती शेगावची ओळख बनली आहे.
टीप: जरी अचूक माहिती उपलब्ध नसली तरी, स्थानिक लोकांकडून आणि दुकानांमध्ये याबद्दल अधिक माहिती मिळू शकते.
0
Answer link
🍲•🍛•🍲•🍛•🍲•

घुगऱ्या
🍛पंचपक्वान्नाला मागे सारणारी चव असलेल्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत का?
सविस्तर वाचा⤵️

ᘛᘛᘛᘛᘛᘛᘛᘛᘛᘛ
1
Answer link
पाणीपुरी ची पुरी नरम पडते त्याच कारण तुम्ही पिठ भिजवताना तुमची चुक होत असावी
तुमचं जे पिठ भिजवताना चुक म्हणजे तुम्ही पिठ भिजवल्यावर लगेच करत असणार आणि तेल हि बरोबर गरम होत नसावं म्हणून पुरी नरम पडते
तुम्ही कोणत्याही पिठाची पुरी करा मैदा किंवा गव्हाच्या पिठाच्या करा पण त्यात बारीक रवा घाला जाडा रवा असेल तर ते मिक्सर ला बारीक करा.आणि कोमट पाण्याने पिठ भिजवावे पण पिठ भिजवताना सावकाशीने पिठ भिजवावे आणि ते पिठ घट्ट भिजवावे आणि पिठ भिजवून किमान 20ते30मिनिट झाकून ठेवावे नंतर सर्व गोलि पुऱ्या लाटून घ्याव्यात, आणि तेल चांगले गरम करून घ्यावे आणि पुऱ्या जळणार नाहीत याची काळजी घ्यावी.पुऱ्या लाटताना पातळ हि जास्त लाटू नये थोडी जाडसर च लाटावी त्या तेलात टाकल्यावर त्या आपणच फुगतिल पण पुरीचा कलरि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या या सर्व टिप्स च्या याने करा आणि बघा पुऱ्या तुमच्या कडक होतील.
0
Answer link
पाणीपुरी घरी बनवण्यासाठी खालील गोष्टी करा:
पुरी बनवण्यासाठी:
-
साहित्य:
- १ कप बारीक रवा
- २ चमचे मैदा
- चिमूटभर सोडा
- मीठ चवीनुसार
- तेल तळण्यासाठी
-
कृती:
- रवा, मैदा, सोडा आणि मीठ एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्या.
- पीठ १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
- नंतर पिठाचे छोटे गोळे तयार करा.
- प्रत्येक गोळा पातळ लाटून घ्या आणि पुरीच्या आकारात कापा.
- तेल गरम करून पुऱ्या golden brown रंगावर तळून घ्या.
पाणी बनवण्यासाठी:
-
हिरवे पाणी:
-
साहित्य:
- १ कप पुदिना
- १/२ कप कोथिंबीर
- २-३ हिरव्या मिरच्या
- १ इंच आले
- लिंबाचा रस
- मीठ आणि पाणी चवीनुसार
-
कृती:
- पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि आले मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- त्यात लिंबाचा रस, मीठ आणि पाणी घालून मिक्स करा.
-
-
Dates आणि इमलीचे पाणी:
-
साहित्य:
- १/२ कप Dates (खजूर)
- १/४ कप चिंच (इमली)
- गुळ (आवश्यकतेनुसार)
- लाल तिखट, जिरे पावडर, काळे मीठ चवीनुसार
-
कृती:
- खजूर आणि चिंच पाण्यात भिजवून ठेवा.
- नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- गरम पाण्यात मिश्रण उकळून घ्या, त्यात गुळ, लाल तिखट, जिरे पावडर आणि काळे मीठ टाका.
-
स्टफिंग (stuffing) बनवण्यासाठी:
-
साहित्य:
- उकडलेले बटाटे
- काळा चना (उकडलेला)
- बारीक चिरलेला कांदा
- धणे-जिरे पूड, लाल तिखट, मीठ चवीनुसार
-
कृती:
- बटाटे कुस्करून घ्या, त्यात चणा, कांदा आणि मसाले मिक्स करा.
पाणीपुरी सर्व्ह (serve) करण्यासाठी:
- पुरीला मधोमध hole करून त्यात बटाट्याचे स्टफिंग भरा.
- नंतर तयार केलेले दोन्ही प्रकारचे पाणी पुरीत टाका आणि serve करा.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणीपुरीच्या पाण्यात बदल करू शकता.
1
Answer link
पाणीपुरी कशी तयार करावी त्या पिठामध्ये काय टाकले जाते.
पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
बारीक रवा , मैदा मिठ , क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा) , तेल
कृती:
१) रवा, मैदा आणि मिठ एकत्र करून त्यात सोडा पाणी घालून घट्ट भिजवून घ्यावे .
२) एक सुती स्वच्ष कपडा पाण्याने भिजवून पिळून घ्या व पिठाचा गोळा या कपड्याने अर्धा तासासाठी झाकून ठेवावा .
३) नंतर पिठाचे छोटे गोळे करा, दुसरी कडे तेल मध्यम आचेवर तापवा
४) तेल खुप गरम किंवा खुप कोमट नसावे. गोळे लाटून पुर्या तळाव्यात.
तिखट पाणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
पाणीपुरी मसाला , कोथिंबीर , पुदीना पाने , हिरव्या मिरच्या , मिठ चवीनुसार
कृती:
१) कोथिंबीर, पुदीना पाने, आणि हिरव्या मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या.
२) थंड पाणी एका पातेल्यात घालून त्यामध्ये हि पेस्ट टाकावी .
३) याच पाण्यात पाणीपूरी मसाला, आमचूर पावडर, थोडे काळं मिठ आणि लागल्यास थोडे साधे मिठ घालून व्यवस्थित ढवळावे.
3
Answer link
समोसा व कचोरी बनविण्यासाठी काय साहित्य लागते, आणि त्याची पद्धत कशी असते, याची पूर्ण माहिती मिळेल का?
समोसा व कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (मटेरियल)
कचोरी कवर
२५० ग्रॅम मैदा
1 टीस्पून ओवा
1 टीस्पून मीठ
4 टीस्पून तेल
आतले मिश्रण
5-6 बटाटे
1 कप वाटणे
2 टीस्पून धना पावडर
1 टीस्पून गरम मसाला पावडर
1 पिंच हिंग
2 टीस्पून मीठ
1 टीस्पून जीरा पावडर
1 टीस्पून लाल तिखट
1/2 टीस्पून चाट मसाला
1/4 कप कोथिंबीर
4 हिरवी मिरची
तळण्यासाठी तेल
1 टेबलस्पून अद्रक पेस्ट
पायर्या
मैदा, ओवा, मीठ मिक्स करून घ्यावे मग त्यात तेल टाकून तेही चांगले मिक्स करावे व थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर गोळा तयार करावा. बटाटे उकडून मॅश करुन घ्यावेत.
समोसा कचोरी
कढईत थोडे तेल टाकून त्यात हिरवी मिरची व आलं पेस्ट परतून घ्यावी. मग त्या धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला पावडर, लाल तिखट परतून घ्यावे मग त्यात उकडलेले बटाटा व फ्रोजन मटार (ताजा मटार ही चालेल माझ्याकडे फ्रोझन मटार होता) घालून भाजी चांगली मिक्स करून घ्यावी.
समोसा कचोरी
तोपर्यंत पीठ आपले चांगले भिजले असेल. त्याचा एक गोळा घेऊन लाटावा. मग तो मध्ये कापून त्याला हवा तसा आकार देऊन, त्यामध्ये भाजी भरून पाण्याने त्याचे तोंड बंद करून, तळून घ्यावे. मंद आचेवर तळावेत.
2
Answer link
साताराच्या कंदी पेड्यांची एक मजेदार गोष्ट आहे. आपल्याकडे गोऱ्या साहेबांनी जवळ जवळ १५० वर्षें राज्य केले. या लोकांमध्ये स्थानिक बोली भाषा, चालीरीती , राहणीमान तसेच खाद्य पदार्थ यात समरस होण्याची प्रचंड इच्छा शक्ती होती. त्यांच्या या इच्छा शक्तीतूनच "साताऱ्याच्या कंदी पेढे " यांचे नामकरण झाले.
गोष्ट सातारी कंदी पे़ढ्यांची ….
ही गोष्ट आहे तब्बल दीडशे वर्षापूर्वीची…!
भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश प्रतिनिधी बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.
सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीचं प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेचं साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हैशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. हे दुध जवळच मोठं शहर म्हणून सातारला पाठवून दिलं जायचं.
चित्रस्रोत : गुगल.
काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली.
यातूनच जन्म झाला कंदी पेढ्याचा … !
तर तो कसा ? हा प्रश्न आपोआप मान वर काढतो.
तर पुढील कथा अशी आहे की, त्यांना "करंडी" म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला "कँडी" म्हणायला सुरवात केली. पुढे याच कँडीचं आपल्या सातारकरांनी "कंदी" केलं.
.
पुढची कथा पण रोचक आहे.
साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर अस ओळखलं जाऊ लागलं.
कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी….!
त्यांनी सत्तर वर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहचला. आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो. म्हणूनच गेली १५० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.
भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूर राम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखलं जात.
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे, राजूर खावा पेढे (अहमदनगर), चांदवड औषधी पेढे ( नाशिक ) व खूप काही असे पेढ्यांचे नामकरण झालेले आहे. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.
सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हैशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या पेढ्यांमध्ये सातारच्या माणसांचा "प्रेम" मिक्स झालाय.
या सगळ्या मुळे सातारच्या कंदी पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झालाय.
तर अशी आहे, गोष्ट सातारी कंदी पे़ढ्यांची ….