श्वास
0
Answer link
दम लागण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
- ॲनिमिया (Anemia): रक्तातील लाल पेशी कमी झाल्यास ऑक्सिजनची पातळी घटते आणि दम लागतो.
अधिक माहितीसाठी: मेयो क्लिनिक - ॲनिमिया
- अस्थमा (Asthma): श्वासवाहिन्यांमध्ये सूज आल्याने श्वास घेण्यास त्रास होतो.
अधिक माहितीसाठी: मेयो क्लिनिक - अस्थमा
- हृदयविकार (Heart Disease): हृदय व्यवस्थित काम न केल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि दम लागतो.
अधिक माहितीसाठी: मेयो क्लिनिक - हृदयविकार
- फुफ्फुसांचे आजार (Lung Diseases): सीओपीडी (COPD) किंवा न्यूमोनियासारख्या आजारांमुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
अधिक माहितीसाठी: मेयो क्लिनिक - सीओपीडी
- तणाव आणि चिंता (Stress and Anxiety): जास्त तणाव आणि উদ্বেगामुळे श्वासोच्छ्वास जलद होतो आणि दम लागतो.
- लठ्ठपणा (Obesity): जास्त वजन वाढल्याने शरीराला जास्त ऑक्सिजनची गरज भासते आणि दम लागतो.
उपाय:
- डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करा.
- नियमित व्यायाम करा.
- पौष्टिक आहार घ्या.
- पुरेशी झोप घ्या.
- धूम्रपान टाळा.
0
Answer link
प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवून विशिष्ट तंत्रांनी श्वास घेणे आणि सोडणे.
प्राणायाम' हा शब्द दोन संस्कृत शब्दांनी बनलेला आहे:
- प्राण: म्हणजे जीवनशक्ती किंवा श्वास.
- आयाम: म्हणजे नियंत्रण, विस्तार किंवा लांबी.
प्राणायामाचे फायदे:
- तणाव कमी होतो.
- एकाग्रता वाढते.
- शरीरातील ऊर्जा वाढते.
- रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
- श्वासोच्छवासाच्या समस्या कमी होतात.
प्राणायामाचे प्रकार:
- भस्त्रिका
- कपालभाती
- अनुलोम विलोम
- उज्जायी
- भ्रामरी
प्राणायाम करताना योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी:
0
Answer link
श्वास कमी पडत असल्यास, तातडीने आराम मिळवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- शांत बसा: घाबरल्यामुळे श्वास आणखीनच जास्त कमी होऊ शकतो. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा.
- मोकळ्या हवेत जा: ताजी हवा श्वासोच्छ्वास सुधारण्यास मदत करते.
- खोलीतील हवा खेळती ठेवा: पंखा चालू करा किंवा खिडकी उघडा.
- शरीराची स्थिती बदला:
- उभे राहा आणि पुढे झुका, टेबल किंवा खुर्चीला आधार घ्या.
- basun पाठीला आधार द्या.
- श्वासोच्छ्वास व्यायाम:
- ओठांनी श्वास घेणे (Pursed-lip breathing): नाकाने श्वास घ्या आणि ओठ गोल करून हळू हळू श्वास सोडा. NHLBI
- पोटाने श्वास घेणे (Diaphragmatic breathing): एका हाताने छातीवर आणि दुसर्या हाताने पोटावर ठेवा. नाकाने हळूवारपणे श्वास घ्या, ज्यामुळे पोट फुगेल आणि छाती कमी प्रमाणात फुलेल. हळू हळू श्वास सोडा. Cleveland Clinic
- गरम पेय: गरम पाणी किंवा चहा प्यायल्याने श्वासोच्छ्वास सुधारतो.
- डॉक्टरांना संपर्क साधा: जर श्वास घेण्यास जास्त त्रास होत असेल, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
2
Answer link
श्वास घेताना धाप लागतेय ? मग हे वाचा ⭕*_
. *धाप लागण्याच्या व्याधीचा त्रास अनेकांना होतो. ही व्याधी हृदय विकाराचे लक्षणसुद्धा असू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. या व्याधीवर आपल्या आहार शैलीत आणि जीवनशैलीत बदल करून मात करता येते. अशा रुग्णांनी आणखी कोणत्या उपायांद्वारे या व्याधीला दूर ठेवावे, याविषयीचे मार्गदर्शन.*
*अनेकांना जिने चढताना, पळताना, वेगाने चालताना धाप लागल्याचा अनुभव येतो. धाप लागणे ही व्याधी श्वसनाशी संबंधित आहे. अनेकांकडून धाप लागली जात असल्याची तक्रार केली जात असते. वैद्यकीय परिभाषेत या व्याधीला ‘शॉर्टनेस ऑफ ब्रिद’ असे म्हटले जाते.*
धाप लागण्याची तीव्रता किरकोळ, मध्यम आणि तीव्र अशा तिन्ही प्रमाणात असते. अनेकांना धाप लागल्यानंतर मनात भीतीची भावना उत्पन्न होते. काहींना धाप लागल्यानंतर शरीरावर आणि मनावर ताण आल्याचे जाणवू लागते. ही व्याधी अतिशय गंभीर आहे. याचे कारण धाप लागणे हे हृदय विकाराचेही लक्षण असू शकते. त्यामुळे अशी लक्षणे जाणवणार्या रुग्णांनी डॉक्टरांकडून विनाविलंब आपल्या प्रकृतीची तपासणी करून घ्यावी. यात हलगर्जी पणा केल्यास तो महाग पडू शकतो. धाप लागण्याची व्याधी अनेक कारणांमुळे निर्माण होते. अॅनिमिया, ब्राँकायटीस, अस्थमा, वेगवेगळ्या अॅलर्जी, श्वासमार्गाला पोहोचलेली इजा, अशा कारणांमुळे आपल्याला धाप लागू शकते.
फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णांचे धाप लागणे हे प्रमुख लक्षण सांगितले जाते. कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला धाप लागू लागली तर डॉक्टरांकडून प्रकृती तपासून घेण्याशिवाय पर्याय नाही. काही वेळा धाप लागल्यामुळे अनेकांना रात्र रात्र झोप येत नाही. छाती भरून आल्यामुळे दिनक्रमातील अनेक कामे करताना अडचणी येतात. एकूणच आपल्या दैनंदिन आयुष्यावर या व्याधीचे अनेक अनिष्ट परिणाम होतात. या व्याधीवर आहारशैलीत बदल करून मात करता येते. या व्याधीवर मात करण्याचे काही उपाय पाहू या..!
पाठीवर आडवे होऊन झोपा. या स्थितीत आपले हात पोटावर ठेवा. असे केल्यानंतर संपूर्ण शरीराचे स्नायू सैल सोडा. आता नाकाने दीर्घ श्वास घेणे सुरू करा. श्वास घेताना पोट फुगवा. असे केल्याने आपली फुफ्फुसे हवेने भरून जातील. काही क्षणांकरिता श्वास रोखून धरा. आता हळूहळू तोंडाने श्वास सोडून देण्याची क्रिया तोंडाद्वारे सुरू करा. ही क्रिया पाच ते दहा मिनिटे करा.
मांडी घालून आरामात बसा. आपल्या मानेचे आणि खांद्याचे स्नायू पूर्णपणे सैल सोडा. आपले ओठ घट्ट बंद करा. मात्र, ओठांचा मधला भाग किंचितसा उघडा ठेवा. काही सेकंद नाकाने श्वास घेणे सुरू करा. नाकाने श्वास घेतल्यानंतर ओठाच्या मधल्या भागातून अत्यंत संथगतीने श्वास सोडणे सुरू करा. अशा पद्धतीने श्वास घेणे आणि श्वास सोडण्याची क्रिया चालू ठेवा. जेव्हा केव्हा तुम्हाला धाप लागल्यासारखी वाटेल तेव्हा या पद्धतीने श्वास घ्या आणि सोडा. या क्रियेनंतर काही मिनिटांतच तुम्हाला आपल्यातील फरक जाणवून येईल.
धाप लागल्यानंतर कपभरून ब्लॅक कॉफी घेतल्यास रुग्णाला फरक जाणवू शकतो. कॉफीमधील कॅफिन हा घटक आपल्या श्वसनात अडथळा निर्माण करणार्या घटकांना रोखण्याचे काम करतो. अस्थमाच्या रुग्णांना जो त्रास होतो तो ब्लॅक कॉफी घेतल्याने दूर होऊ शकतो. त्यामुळे धाप लागते आहे, असे दिल्यावर एक-दोन कप स्ट्राँग ब्लॅक कॉफी घ्या.
धाप लागल्यास वाफ घेण्याचा पर्यायही रुग्णाला उपयुक्त ठरतो. त्याकरिता एक भांडेभरून अति गरम पाणी घ्या. आपला चेहरा या भांड्यावर न्या आणि चेहरा टॉवेलच्या सहाय्याने झाकून टाका. गरम पाण्यातून येणारी वाफ दीर्घ श्वास घेऊन आपल्या शरीरात साठवा. यामुळे आपल्या नाकात निर्माण झालेले अडथळे दूर होतात.
दररोज दोन ते तीन कप आल्याचा चहा घ्या. दोन कप गरम पाणी घेऊन, त्यात ताज्या आल्याचा तुकडा चेचून घाला. हे पाणी पाच ते दहा मिनिटांकरिता झाकून ठेवा. थोड्या वेळाने हे पाणी ढवळा आणि त्यात थोडा मध घाला. हे मिश्रण हळूहळू प्या. दिवसभरात आले चाऊन चाऊन खाण्यानेही या व्याधीच्या रुग्णांना फरक पडतो, असे दिसून आले आहे.
ज्यांना अॅनिमियामुळे धाप लागते आहे, अशांनी नियमित बीट खाणे उपयुक्त ठरते. बीट कच्चे खाण्याबरोबरच त्याचा रस काढून पिणेही उपयुक्त ठरते. बीट, गाजर, पालक आणि रताळी यांचा ज्यूस तयार करा. हा ज्यूस दिवसांतून एक वेळा घ्या. याचबरोबर आपल्या आहारात लोहयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवा.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, बडिशेपमध्ये श्वसनाचे आजार दूर करण्याची क्षमता असल्याचे आयुर्वेद सांगते. याकरिता गरम पाण्यात एक चमचा बडिशेप टाकावी. पाच ते दहा मिनिटांकरिता हे भांडे झाकून ठेवावे. दहा मिनिटांनी हे मिश्रण ढवळावे त्यात नैसर्गिक मध मिसळावा. हे मिश्रण दिवसांतून दोन ते तीन वेळा प्यावे.
धाप लागण्याचा त्रास होणार्या रुग्णांनी धूम्रपानाचा त्याग करावा. धूम्रपानामुळे श्वसनाचे अनेक त्रास सुरू होतात. धूम्रपानाचा थेट परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होत असतो. त्यामुळे धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करा. त्याकरिता डॉक्टरांचीही मदत घ्या.
चालण्याच्या व्यायामाने धाप लागण्याच्या व्याधीवर मात करता येऊ शकते. नियमित चालण्याने आपल्या शरीराची ताकद वाढते. त्याचबरोबर आपले वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. मध्यम गतीने दिवसभरात अर्धा ते एक तास चाला.
योगासने, प्राणायाम या माध्यमातूनही या व्याधीवर उपचार करता येतात. प्राणायामामुळे शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरावर, मनावर आलेला ताण दूर होण्यास मदत होते. मोकळ्या हवेत प्राणायाम केल्यास त्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात. प्राणायाम आणि योगासने तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच करा. नियमित प्राणायाम केल्यास त्याचे फायदे हळूहळू दिसू लागतात.
अशा व्यक्तींनी डोक्याखाली दोन-तीन उशा घेऊन झोपावे. तसेच गरम वातावरण असलेल्या खोलीत झोपू नये. अशा वातावरणात श्वास घेण्यास त्रास होतो. आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करण्याकडे लक्ष द्या. अस्थमा असलेल्या रुग्णांनी व्यायाम करण्यापूर्वी इन्हेलरचा वापर करावा. ज्यावेळी धाप लागते आहे, असे दिसेल त्यावेळी आपल्या हातातील काम बाजूला ठेवा आणि चक्क विश्रांती घ्या.
दै. पुढारी वरून साभार

1
Answer link
अनुभवाचे घ्यायचे असेल, तर प्रयोग करून बघावा किंवा दुसर्याने कसे केले याबाबत माहिती घ्यावी.
2
Answer link
तुम्ही जर आता आता धावायला सुरवात केली असेल त्यामुळे असे होत असेल म्हणून जास्त काळजी न करता तुम्ही प्रयत्न करत राहा
दररोज अनुलोम विलोम कपालभाती करा
अर्धा तास योगा साठी द्या नक्की फरक जनवेल