3 उत्तरे
3
answers
इतिहासाची भौतिक साधने?
2
Answer link
वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची “भौतिक साधने” असे म्हणतात. (उदा. किल्ले, ताम्रपट, नाणी, शिलालेख, लेणी, इमारती, स्मारके इत्यादीचा समावेश होतो.)
भौतिक साधने : इतिहासाच्या लिखित साधनांनंतर आपण आता भौतिक साधनांची माहिती घेऊ. नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्व साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो. या साधनांशिवाय स्तंभ, विहार, स्तूप, नगरे, कोरीव काम, लेणी यांचाही भौतिक साधनांमध्ये समावेश होतो.
1
Answer link
स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले ही मध्ययुगीन इतिहासाची भौतिक साधने आहेत.
0
Answer link
इतिहासाची भौतिक साधने खालीलप्रमाणे:
- पुरा वस्तू:
जुन्या वस्तू, भांडी, मूर्ती, नाणी, हत्यारे इत्यादींचा समावेश होतो.
- अवशेष:
इमारती, लेणी, स्तूप यांसारख्या वास्तू आणि वास्तूंचे अवशेष.
- उत्खननात सापडलेल्या वस्तू:
जमिनीमध्ये उत्खनन करताना सापडलेल्या वस्तू, ज्या त्या काळातील जीवनशैलीवर प्रकाश टाकतात.
भौतिक साधनांमुळे आपल्याला इतिहासातील जीवन, संस्कृती आणि तंत्रज्ञान यांबद्दल माहिती मिळते.