मंदिर इतिहास

परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला?

2 उत्तरे
2 answers

परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला?

2
परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. 

हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. तर पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.


पुण्य श्लोक अहिल्याबाई यांनी भारतात कोणकोणत्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला?
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर - (३१ मे १७२५–१३ ऑगस्ट १७९५ ) एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, यांचे सर्वात नावाजलेले कार्य म्हणजे आज सुद्धा, आपण उत्तरेत काशीला जा अथवा दक्षिणेतील रामेश्वरम. प्रत्येक मंदिरात आज सुद्धा तुम्हाला मराठी पुजारी हमखास आढळतील. याचे मुख्य कारण म्हणजे या सर्व मंदिराच्या जीर्णोद्धाराच काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलंय.
उत्तर लिहिले · 31/5/2023
कर्म · 7460
0

परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला. अहिल्याबाई होळकर यांनी भारतातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, त्यापैकी परळी वैजनाथ मंदिर एक आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 3000

Related Questions

बापू कुणाला कळला आहे का?
वंशावळ तज्ञ कोठे मिळतील?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड किती वेळेस आणि कुणी जाळला?
अरुण गवळीला डॅडी हे नाव कसे पडले?
महात्मा फुले माहिती?
Hadappa Sanskriti Harappa Sanskriti konatya Kala til hoti?
हडप्पा संस्कृती कोणत्या काळातील होती?