भूगोल पर्यावरण नैसर्गिक संसाधने

नैसर्गिक साधनसामग्रीचे वैशिष्ट्य कोणते आहे?

2 उत्तरे
2 answers

नैसर्गिक साधनसामग्रीचे वैशिष्ट्य कोणते आहे?

0
नैसर्गिक साधनसंपत्तीचे पुनःपुन्हा उत्पन्न होऊ शकणारी (उदा., वनस्पती, पाणी, वायू) आणि पुन्हा उत्पन्न न होऊ शकणारी (उदा., खनिजे) असेही प्रकार होऊ शकतात. पुन्हा उत्पन्न न होणारी साधनसंपत्ती ही संचयित असून ती वापराने संपून जाते. उदा., दगडी कोळसा, खनिज तेल इत्यादी. पुष्कळ धातू अशा तऱ्हेने पूर्णपणे संपून जात नाहीत.

नैसर्गिक साधनसंपत्तीची काही वैशिष्ट्ये आहेत.

९. नैसर्गिक साधनसंपत्ती ही स्वतंत्र असते व ती मानवाच्या आधी पृथ्वीवर निर्माण झालेली साधनसंपत्ती आहे.

२. नैसर्गिक साधनसंपत्तीचे पृथ्वीतलावरील वितरण हे विषम स्वरूपाचे असून साधनसंपत्तीच्या वितरणावर भौगोलिक घटकांचा परिणाम झालेला आहे.

३. सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती मूलत: सुप्त अवस्थेत असतात. तिचे गुणधर्म व तिचा उपयोग करण्याचे ज्ञान मानवाजवळ असले पाहिजे. वाऱ्याचा उपयोग करण्यासाठी पवनचक्की बसवून त्यापासून विज मिळविता येते. वनस्पतींच्या मऊ लाकडापासून कागद निर्माण होतो. ऊसाच्या रसापासून साखर बनते. तसेच त्याचे अनेक उपपदार्थ निर्माण होतात. खनिज तेल शक्तिसाधन म्हणून उपयोगी पडते. अशा प्रकारे निसर्गातील सुप्त घटकांचा मानवी जीवनात उपयोग करून घेता येतो.
उत्तर लिहिले · 17/3/2023
कर्म · 9415
0

नैसर्गिक साधनसामग्रीची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

  1. उपलब्धता: नैसर्गिक साधनसामग्री निसर्गात मुक्तपणे उपलब्ध असते. ती तयार करण्यासाठी मानवी हस्तक्षेप आवश्यक नाही.
  2. अमर्यादित साठा: काही नैसर्गिक साधनसामग्री जसे की हवा, सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे ती अमर्यादित आहेत.
  3. साधनसंपत्तीचे वितरण: नैसर्गिक साधनसामग्रीचे वितरण असमान आहे. काही प्रदेशात विशिष्ट साधनसामग्री विपुल प्रमाणात आढळते, तर काही प्रदेशात ती दुर्मिळ असते.
  4. गुणवत्ता: नैसर्गिक साधनसामग्रीची गुणवत्ता भौगोलिक स्थानानुसार बदलते.
  5. उपयोगिता: नैसर्गिक साधनसामग्री मानवासाठी अत्यंत उपयोगी आहे. ती अनेक गरजा पूर्ण करते.
  6. पर्यावरणावर परिणाम: नैसर्गिक साधनसामग्रीच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

वंशाच्या उत्पत्ती कारणांनुसार माशांचे वर्गीकरण स्पष्ट करा?
प्रदूषणाची कारणे स्पष्ट करा?
जलसंवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा?
प्रदूषण नियंत्रणाचे उपाय कोणते?
प्रदूषण नियंत्रणाचे प्रकार कोणते?
चिपको आदोलनाबाबत माहीती द्या?
जैविक विविधतेबाबत विकसित आणि विकसनशील देशांची भूमिका स्पष्ट करा?