4 उत्तरे
4
answers
रासायनिक खतांपासून शेतीवर होणारा दुष्परिणाम पर्यावरण प्रकल्प 12वी?
1
Answer link
रासायनिक खतांपासून शेतीवर होणारा दुष्परिणाम पर्याय प्रकल्प.
शेतीसाठी वापरली जाणारी रासायनिक खते व त्यांचे परिणाम पुढील प्रमाणे सांगता येतील.
१) मातीच्या उत्पादकतेत घट : जमीन सजीव असते. जमिनीच्या एक घनफूट मातीत कोट्यवधी जीवाणू, बुरशी आणि बॅक्टेरिया असतात. त्यामुळेच जमीन सजीव आणि सुपीक बनते. रासायनिक खतांनी जमीन सुपीक बनत नाही तर सुपीक जमिनीतील अन्नद्रव्ये उचलायला मदत करतात. अशा प्रकारे जमिनीतून अधिकची अन्नद्रव्ये उचलली जातात तेव्हा जमीन निकस आणि निर्जीव बनत जाते. भावनी रोडीनी गानी नितीन किंवा50%
जमान निकस आणि निजाव बनत जात आजची शेतीची समस्याही निर्जीव किंवा मृत जमिनीने उद्भवलेली समस्या आहे. रसायने आणि कीडनाशके मातीमधील सूक्ष्मजीवांचा नाश करून मातीची रचना आणि सुपीकतेवर परिणाम करतात.
२) तृणांच्या प्रमाणात वाढ :
पारंपरिक शेतीत गुरे, शेण, गोमूत्र, सेंद्रिय खत, नांगरट, जमीन उन्हात तापणे, बळी नांगराची पाळी, वखरणी, ढाळणी, पेरणी किंवा लागवड, मिश्र पिके, सापळा पिके, आंतरपिके, हिरवळीची खते, बेबड, कोळपणी, डवरणी, खुरपणी या सर्व वैज्ञानिक गोष्टी आहेत. त्यांना पूर्णपणे छेद देणाऱ्या रासायनिक शेतीने तृणांचे प्रमाण वाढत गेले हे ना शेतकऱ्यांनी तपासले, ना विद्यापीठांनी त्यावर संशोधन केले. अधिक उत्पादनाने दर कोसळून नुकसानच झाले
. ३. पाणी लवकर आटण्याच्या प्रमाण
वाढ :
आपण सजीव जमिनीबाबत विचार केलाच आहे. अशा सजीव जमिनीत सेंद्रिय कर्ब आणि जीव जीवाणूंमुळे पीक उत्तम येते.. अशी जमीन पाणी धरून ठेवण्याचे काम करते. दुर्दैवाने रासायनिक खतांच्यआ७०%
अशा जमान पाणी धरून ठेवण्याच काम करते. दुर्दैवाने रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली. दुसऱ्या बाजूला पाण्याचा वापर तीन पट झाला. पिकाला दिलेले पाणी थेट खडकांपर्यंत निघून जाते. त्यामुळे जमिनीत पाणीच थांबायला तयार नाही. चालू वर्षी चांगला पाऊस झाला. असे असूनही पाणलोट क्षेत्रात व धरणाच्या खालच्या क्षेत्रात पाणी लवकर आटल्याचे चित्र आहे.
४) आरोग्यावर घातक परिणाम : जागतिक आरोग्य संघटनेने 'ग्लायफोसेट' तणनाशकाचे वर्गीकरण 'संभाव्य कर्करोगकारक' असे केले. आहे. 'ग्लायफोसेट'च्या दीर्घकाळ संपर्कात आल्याने फक्त कर्करोगच नव्हे, तर वांझपण, नपुंसकता, गर्भपात, जन्मजात दोष, संप्रेरकाची (Hormone) तोडफोड, मूत्रपिंडाचे विकार असे अनेक आजार होण्याची शक्यता असते. शेतात फवारणी केल्यानंतर अगदी दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी तो शेतमाल बाजारात येतो. फवारणी केल्यावर किती काळ असा शेतमाल वापरू नये. याबाबत शेतकरी आणि ग्राहक दोघेहई७०% फल्यापर फिता फाळ असा रातमाल पापल नये. याबाबत शेतकरी आणि ग्राहक दोघेही अंधारात आहेत. त्याबाबतीतील नियम असतील, तर ते केवळ पुस्तकातच आहेत. कचरा व विष्ठेमध्ये असणाऱ्या रोगकारक जंतूमुळे माती दूषित होते व त्या मातीत पिकवलेल्या भाजीपाला व पिकामुळे मनुष्य व पाळीव जनावरांना रोग होतात. रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, डाळी यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, डाळी आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते.
५) जमिनीच्या सुपिकतेत घट :
विरघळणाऱ्या क्षारांचे वाढत जाणारे प्रमाण याला क्षारता म्हणतात. याचा मातीची गुणवत्ता व उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. जास्त सिंचनामुळे मातीच्या पृष्ठभागावर क्षार जमा होतात. क्षारयुक्त माती वनस्पतींच्या वाढीसाठी अयोग्य बनते. याचाच आर्थ जमिनीची सुपिकता घटते.
0
Answer link
भৌमितिक भ्रमाचे कोणतेही पाच प्रकार स्पष्ट करा:
* **पॉन्झो भ्रम:** या भ्रमामध्ये, दोन समान रेषा एका चित्रात वेगवेगळ्या लांबीच्या दिसतात. हे चित्र रेषांच्या पार्श्वभूमीमुळे तयार होते, ज्यामुळे दृष्टीकोनाचा भ्रम निर्माण होतो.
* **मुलर-लायर भ्रम:** या भ्रमामध्ये, समान लांबीच्या दोन रेषांच्या टोकाला असलेल्या बाणांच्या दिशेने त्यांची लांबी कमी-जास्त वाटते. आतून बाण असणारी रेषा लांब दिसते, तर बाहेरून बाण असणारी रेषा आखूड दिसते.
* **झोलनर भ्रम:** या भ्रमामध्ये, समांतर रेषा तिरप्या रेषांमुळे समांतर दिसत नाहीत. तिरप्या रेषांच्या दिशेमुळे रेषा एकमेकांकडे झुकलेल्या दिसतात.
* **हेरिंग भ्रम:** या भ्रमामध्ये, दोन समांतर रेषा एका मध्यवर्ती बिंदूतून बाहेर येणाऱ्या रेषांच्या पार्श्वभूमीवर वक्र दिसतात.
* **वर्टिकल-हॉरिजॉन्टल भ्रम:** या भ्रमामध्ये, समान लांबीची उभी रेषा आडव्या रेषेपेक्षा जास्त लांब दिसते.
0
Answer link
रासायनिक खतांच्या वापरामुळे शेती आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
रासायनिक खतांचा सतत वापर केल्याने जमिनीतील नैसर्गिक सूक्ष्मजीवां (bacteria)ची संख्या कमी होते.
जमिनीचा पोत बिघडतो आणि ती कडक होते, ज्यामुळे तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते.
रासायनिक खतांमध्ये असलेले नत्र (nitrogen) आणि फॉस्फरस (phosphorus) मातीतून झिरपून पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळतात.
यामुळे जल प्रदूषण होते आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता घटते.
नदी, तलाव आणि समुद्रातील जीवनावर याचा नकारात्मक परिणाम होतो.
रासायनिक खतांनी पिकवलेल्या अन्नधान्यामध्ये रासायनिक अंश (chemical residue) राहू शकतात.
असे अन्न खाल्ल्याने मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, जसे की कर्करोग (cancer) आणि इतर आजार.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे नायट्रस ऑक्साइड (nitrous oxide) नावाचा ग्रीनहाऊस वायू (greenhouse gas)उत्पन्न होतो, जो ग्लोबल वॉर्मिंगला (global warming)कारणीभूत ठरतो.
जैवविविधता (biodiversity) कमी होते, कारण रासायनिक खतांमुळे काही विशिष्ट वनस्पती आणि जीवजंतूंना धोका निर्माण होतो.
रासायनिक खतांच्या सततच्या वापरामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे जमीन क्षारपड (saline)होऊ शकते आणि तिची उत्पादन क्षमता कमी होते.
रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा (organic fertilizers) वापर करणे.
नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करणे.
पाण्याचा कार्यक्षम वापर करणे.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान http://nfsm.gov.in/Default.aspx
1. जमिनीची सुपीकता कमी होणे:
2. पाण्याची गुणवत्ता खालावणे:
3. मानवी आरोग्यावर परिणाम:
4. पर्यावरणावर नकारात्मक परिणाम:
5. जमिनीतील क्षार वाढणे:
उपाय:
संदर्भ: