2 उत्तरे
2
answers
समाजशास्त्र म्हणजे काय? समाजशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करा.
0
Answer link
समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.
समाजशास्त्राचे स्वरुप
* समाजशास्त्र हे एक शास्त्र आहे का ?
समाजशास्त्र हे सामाजिक विज्ञान आहे. ‘विज्ञान’ मध्ये ज्यापद्धतीने शास्त्रीय पद्धतीद्वारे प्रयोग व निरीक्षण करून मिळवलेले ज्ञान असते. तसेच समाजशास्त्रात शास्त्रीय कसोट्याचा पद्धतशीर वापर करून ज्ञान मिळवले जाते. समाजशास्त्रातील ज्ञान हे वस्तुनिष्ठ, अनुभवजन्य, तार्किक, मूल्य-तटस्थ आणि पारदर्शक असते. त्यात विज्ञानाची इतर वैशिष्ट्ये देखील आहेत जसे की पडताळणी क्षमता, विश्वासार्हता, अचूकता, अंदाज आणि सामान्यीकरणाची शक्ती देखील आहे. तसेच समाजशास्त्र विज्ञानाच्या सर्व गरजा पूर्ण करते. म्हणून समाजशास्त्र हे सामाजिक विज्ञान आहे.
अँथनी गिडन्स (2000) यांच्या मते, “विज्ञान म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलचे ज्ञान विकसित करण्यासाठी प्रायोगिक तपासणीच्या पद्धतशीर पद्धतींचा वापर करून डेटाचे विश्लेषण, सैद्धांतिक विचार आणि तर्कांचे तार्किक मूल्यमापन होय’ या व्याख्येनुसार, समाजशास्त्र हे सुद्धा एक वैज्ञानिक प्रयत्न आहे.”
रॉबर्ट बियरस्टेड (द सोशल ऑर्डर, 1957) त्यांच्या या पुस्तकात त्यांनी विज्ञान म्हणून समाजशास्त्राच्या खालील वैशिष्ट्यांवर चर्चा केली आहे:
समाजशास्त्र असे असते समाजशास्त्र असे असत नाही
१. समाजशास्त्र हे सामाजिक नैसर्गिक शास्त्र नाही.
शास्त्र आहे.
२. सामान्यीकरण विशेषीकरण नाही.
३. समाजशास्त्र हे एक अमूर्त ठोस नाही.
शास्त्र आहे.
४. तथ्यसंगत मानक /आदर्श नाही.
५. शुद्ध उपयोजित नाही.
६. सामान्य विशेष नाही.
इतर हि काही समाजशास्त्राचे स्वरूप आपणास सांगता येतील जसे यात समाजाबदलचे संघटीत ज्ञान असते. अभ्यासासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर केला जातो निरीक्षणक्षम असा अभ्यासविषय आहे. नैतिक तटस्थता असते.
* समाजशास्त्राचे स्वरूप
1. समाजशास्त्र हे एक सामाजिक विज्ञान आहे .
सामान्यतः नैसर्गिक आणि सामाजिक विज्ञानांमध्ये विभागले जाते. नैसर्गिक विज्ञानमध्ये नैसर्गिक घटनांचा अभ्यास केला जातो. (सजीव आणि निर्जीव दोन्ही). उदा. खगोलशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि भूविज्ञान ही सर्व नैसर्गिक विज्ञाने आहेत.
सामाजिक विज्ञान म्हणजे मानवी समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास होय. सामाजिक शास्त्रांमध्ये समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादींचा समावेश होतो. समाजशास्त्र हे मानवी वर्तन, समाजातील मानव, मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाची रचना आणि समग्र समाज यांचा व्यापकपणे अभ्यास करते. म्हणून समाजशास्त्र एक सामाजिक विज्ञान आहे.
2. समाजशास्त्र हे सामान्यीकरणाचे विज्ञान आहे.
समाजशास्त्र हे सामान्यीकरणाचे विज्ञान आहे. हे समाजशास्त्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे जे त्याला इतिहासापासून वेगळे करते, इतिहास हे विशिष्टीकरण (आयडिओग्राफिक) असते. उदाहरणार्थ, समाजशास्त्राला एखाद्या विशिष्ट युद्धात (उदा. महाभारताचे युद्ध) रस नाही तर वारंवार घडणाऱ्या सामाजिक घटना म्हणून युद्ध किंवा क्रांतीच्या अभ्यासात रस आहे. समाजशास्त्र हे मानवी वर्तन आणि सहवास किंवा संबंध यातील सामान्य नियम किंवा तत्त्वे शोधते. त्याला सामान्य वैधतेचे सामान्यीकरण तयार करण्यात त्याला स्वारस्य आहे.
3. समाजशास्त्र हे एक अमूर्त शास्त्र आहे.
समाजशास्त्र हे एक अमूर्त आहे, असे नाही. उदा. समाजशास्त्राला विशिष्ट कुटुंबाची माहिती घेण्यास त्याला रस नाही, तर कुटुंब एक सामाजिक संस्था म्हणून अभ्यासण्यास त्यास स्वारस्य आहे. कुटुंब हि सामाजिक संस्था सर्व समाजांमध्ये अस्तित्वात आहे जसे कि आधुनिक किंवा पूर्वशिक्षित आदिम व पशुपालक समाज आणि शेती कारणारा समाज,
4. समाजशास्त्र हे स्पष्ट (Categorical) विज्ञान आहे.
समाजशास्त्र हे काय?, केव्हा?, कसे? किंवा का? आणि कोठे? या मनुष्य आणि समाजाशी संबंधित प्रश्नांशी आहे. आणि समजा कसा असावा अथवा समाजात काय असले पाहिजे. (Not what ought to be? ) असे विचार करीत नाही. थोडक्यात काय आहे हे जाणून घेते काय असावे यावर मत देत नाही. हे आदर्श असण्यास ऐवजी स्पष्ट निर्णय देते. ते नीतिशास्त्र किंवा नैतिक आणि राजकीय तत्त्वज्ञानापासून वेगळे करते. हे हि आपल्याला समाजशास्त्राचे हे वैशिष्ट्य सांगता येईल.
5. समाजशास्त्र हे एक शुद्ध विज्ञान आहे.
समाजशास्त्र हे ज्ञान संपादन करण्यात गुंतलेले आहे. आणि मात्र त्यास ज्ञानाच्या उपायोजनात किंवा वापरात रस नाही. म्हणून समाजशास्त्रावर कधी कधी टीका केली जाते. सैद्धांतिक ज्ञान मिळविण्यात समाजशास्त्राला रस आहे, मात्र त्यांच्या वापरण्यात बाबत नाही. त्यामुळे ते इतर शास्त्रांनापेक्षा वेगळे आहे. ते रसायनशास्त्र आणि फार्मसी, भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकी किंवा जीवशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या सारखा नाही आहे.
6. समाजशास्त्र हे दोन्ही तर्कसंगत आणि अनुभवजन्य विज्ञान आहे.
समाजशास्त्र हे दोन्ही स्वरूपाचे म्हणजेच अनुभववादी आणि तार्किक स्वरूपाचे आहे. अस्तित्वात असणाऱ्या आणि अनुभवास आणि निरीक्षणास येणाऱ्या मूर्त आणि अमूर्त अश्या गोष्टींची समाजशास्त्रज्ञ तथ्ये गोळा करून त्यांची मांडणी करतात.
7. समाजशास्त्र हे एक सामान्य विज्ञान आहे.
समाजशास्त्राचे स्वरूप संश्लेषणात्मक आणि सामान्यीकरण आहे. हे अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्रासारखे विशेष शास्त्र नाही. समाजशास्त्राचा फोकस हा एखाद्या घटकावरील अभ्यास कारीतानाचा विशेष असू शकतो, जसे की इतर प्रत्येक विज्ञानाचा केंद्रबिंदू आहे, परंतु त्याचे अभ्यासाचे क्षेत्र सामान्य आहे.सामान्य नियम शोधण्याकडे लक्ष्य केंद्रित करतो. जे सर्वाना लागू होईल असे आहे.
0
Answer link
समाजशास्त्र:
समाजशास्त्र म्हणजे समाज, सामाजिक संबंध आणि मानवी सामाजिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. हे सामाजिक जीवनातील विविध पैलूंचे विश्लेषण करते.
समाजशास्त्राचे स्वरूप:
- वैज्ञानिक दृष्टिकोन: समाजशास्त्र सामाजिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करते.
- समग्र दृष्टी: हे शास्त्र समाजाला एका समग्र एकक म्हणून पाहते आणि त्यातील विविध घटकांचा संबंध शोधते.
- तुलनात्मक अभ्यास: समाजशास्त्र विविध समाजांचा आणि सामाजिक गटांचा तुलनात्मक अभ्यास करते.
- मूल्य-तटस्थता: समाजशास्त्रज्ञ वस्तुनिष्ठपणे सामाजिक घटनांचे विश्लेषण करतात आणि त्यांच्या वैयक्तिक मूल्यांचा प्रभाव टाळण्याचा प्रयत्न करतात.
- सिद्धांत आणि संशोधन: समाजशास्त्र सामाजिक सिद्धांतावर आधारित आहे आणि संशोधनाच्या माध्यमातून नवीन ज्ञान प्राप्त करते.