प्रथा व परंपरा धर्म

कन्या पूजनात मुलगा असणे आवश्यक आहे का?

2 उत्तरे
2 answers

कन्या पूजनात मुलगा असणे आवश्यक आहे का?

1





कन्या पूजनात का आवश्यक आहे एक मुलगा?


नवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा सामील नसेल.
 
बटुक म्हणून याची पूजा करावी. प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिले आहे. देवींचे शक्तिपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वत: पृथ्वीवर आले होते. जिथे जिथे सतीचे अंग पडले तेथे शक्तिपीठांची स्थापना झाली. तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले. भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी राहते.
 
या कारणामुळेच कन्याभोज आयोजित करताना 9 कुमारिकांसह एक मुंजा मुलगा असणे शुभ मानले गेले आहे. याचा एक अर्थ असा ही लावता येईल की आपण केलेल्या पूजेचं फल सुरक्षित आहे. आपलं पुण्य इतर कोणाच्या पदरी न पडता आपल्यालाच प्राप्त होईल. म्हणून देवीच्या पूजेचं फल वाईट नजरेपासून वाचावे अशी इच्छा असल्यास कुमारिकांसोबत मुंज्यालाही भोजनास निमंत्रण द्यावे आणि यथाशक्ती पूजन करावे.


उत्तर लिहिले · 17/12/2022
कर्म · 53750
0
कन्या पूजनामध्ये मुलगा असणे आवश्यक नाही. कन्या पूजन हे कुमारी मुलींचा आदर करण्यासाठी केले जाते, ज्या देवी दुर्गेचे रूप मानल्या जातात.
  • कन्या पूजन: कन्या पूजन हे नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी केले जाते.

  • मुलींची निवड: दोन ते दहा वर्षांच्या मुलींना कुमारिका मानून त्यांची पूजा केली जाते.

  • पूजेची पद्धत: मुलींचे पाय धुतले जातात, त्यांना नवीन वस्त्रे दिली जातात, आणि त्यांची आरती करून त्यांना भोजन दिले जाते.

  • महत्व: कन्या पूजन हे स्त्री शक्तीचा आदर करण्याचे प्रतीक आहे आणि यामुळे घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2040

Related Questions

आदिनाथ देवा बद्दल माहिती द्या?
श्री देव वाघोबा, सुकाई, चनकाई, इनाई, खामजाई, झोलाई, मानाई, काळकाई देवांची माहिती द्या?
पूर्वजांनी इष्टलिंग धारण केले होते, मराठा असून सुद्धा परंतु नंतर त्यांनी ते काढून ठेवले, तर तसे चालते का? रोटी बेटी व्यवहारासाठी आणि मांस मच्छी चालू करण्यासाठी काढले होते का?
पूर्वजांनी इष्टलिंग धारण केले होते, मराठा असून सुद्धा परंतु नंतर त्यांनी ते काढून ठेवले, तर तसे चालते का?
आई महाकाली सुकाई वरदायनी देवी मंदिर कोठे आहे?
जाधवांचे देवाक कोणते आहे?
जाधवांचे दैवत कोणते आहे?