Topic icon

प्रथा व परंपरा

1





कन्या पूजनात का आवश्यक आहे एक मुलगा?


नवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा सामील नसेल.
 
बटुक म्हणून याची पूजा करावी. प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिले आहे. देवींचे शक्तिपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वत: पृथ्वीवर आले होते. जिथे जिथे सतीचे अंग पडले तेथे शक्तिपीठांची स्थापना झाली. तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले. भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी राहते.
 
या कारणामुळेच कन्याभोज आयोजित करताना 9 कुमारिकांसह एक मुंजा मुलगा असणे शुभ मानले गेले आहे. याचा एक अर्थ असा ही लावता येईल की आपण केलेल्या पूजेचं फल सुरक्षित आहे. आपलं पुण्य इतर कोणाच्या पदरी न पडता आपल्यालाच प्राप्त होईल. म्हणून देवीच्या पूजेचं फल वाईट नजरेपासून वाचावे अशी इच्छा असल्यास कुमारिकांसोबत मुंज्यालाही भोजनास निमंत्रण द्यावे आणि यथाशक्ती पूजन करावे.


उत्तर लिहिले · 17/12/2022
कर्म · 53710
0
एकादशीला पितर जेऊ घालतात का, याबद्दल मला नक्की माहिती नाही. श्राद्ध, तर्पण, पिंडदान यांसारख्या विधी पितरांसाठी असतात. एकादशीचे व्रत विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या जातात का, हे तपासणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

  • धार्मिक ग्रंथांचे वाचन: धर्मशास्त्र आणि पुराणांमध्ये याबद्दल काही माहिती दिलेली आहे का ते पहा.
  • पुरोहितांचा सल्ला: तुमच्या घरातील पुरोहितांना किंवा जाणकार व्यक्तींना विचारून खात्री करा.
  • मंदिरातील माहिती: एखाद्या प्रसिद्ध मंदिरातील व्यक्तींकडून याबद्दल माहिती मिळवा.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040
3
हनुमान बाल ब्रम्हचारी आहेत असे मानतात. म्हणून स्रीयांनी त्यांचे मंदीरात जाउ नये असे सांगतात. पण ह्याला कुठलाही शास्त्राधार नाही.

एखादी स्री हनुमाना समोर गेल्याने त्याचे विचारात व वर्तणुकीत बदल होउन चारित्र्य हनन होईल असे समजणे हा तद्दन मुर्खपणा आहे. आपणच आपल्या आराध्याची किंमत कमी करण्या सारखे आहे.

खर तर हनुमानजी विवाहित आहेत. सुर्य कन्या सुवरचला व हनुमानजींचा लौकिक विवाह झाला आहे. सुर्यदेव हे हनुमानजींचे गुरु आहेत. त्यांचे कडून सर्व शास्त्र, वेद, पुराण ह्यांचे शिक्षण घेत असतांना श्री विद्येचे शिक्षण गरजेचे होते.

मात्र श्री विद्याची उपासना नियमा प्रमाणे फक्त विवाहिता साठींच आहे. सुवरचला साध्वी होत्या. त्यामुळे त्यांची विवाह करण्याची मानसिकता नव्हती. पण श्री विंद्येच्या उपासनेस विवाहीत असण गरजेचे होते.

या कारणास्तव हनुमानजी व सुवरचलाह्यांचा विवाह करण्यात आला. तदनंतर त्यांना सुर्यदेवाने श्री विद्येची दिक्षा दिली.

तेलंगणातील खम्मम ह्या गावी हनुमानजींचे सपत्नीक मंदीर आहे. हे गांव हैद्रबादहून २२० किमी अंतरावर आहे. ज्यांचे दांपत्य जीवनात अडीअडचणी असतात ते ह्या मंदीरात दर्शन घेतात.
उत्तर लिहिले · 17/9/2022
कर्म · 53710
2
जर आपण सगळ्यांच्या बरोबर जेवणाचा स्वाद घेतं असलो तर आपला उजवा हात अन्न पदार्थाच्या आपल्या मुखात घालण्याने स्वतःच्या मुखातील स्पर्शाने दुशीत होतो तो दुसऱ्यासं घातक ठरतो कारण माणूस असलो तरी आपल्या लाळेत विष आहे ते फक्त आपले आपल्याला चं पचते दुसऱ्याला बाधीत करते म्हणून अन्न डाव्या हाताने वाढावे व साहित्य म्हणजे चमचा , पळी वगैरे ह्याला ही उष्ठा हात लावू नये असे माझे स्व मत आहे बाकी कारण माहीत नाही ,

पण जर पंगतीला, घरात सर्वांना जेवणं वाढतं असलो तर मात्र डावा हात लावू नये उजव्या हातानेच जेवणं वाढावे , दुसऱ्यासं धर्म करताना उजव्या हाताने करावा हे ही पूर्वी पासून आचरणात आहे म्हणजे आई आजी ची शिकवण " अन्न हे पूर्णब्रम्ह आहे त्याचा अनादर होतो असे ही सांगितले आहे " म्हणून उजवा हात वापरावा 
उत्तर लिहिले · 18/4/2022
कर्म · 121765
1
पूजेमध्ये नारळ फोडण्याचे काम पुरुषच करतात, स्त्रियांसाठी हे काम वर्ज्य आहे. यामागे असे कारण आहे की, नारळाला बीजरूप मानले जाते आणि याला उत्पादन (प्रजनन) क्षमतेशी जोडले गेलेले आहे. स्त्रिया प्रजनन क्रिये (आपत्य उत्पन्न करणे) कारक आहेत. आणखी एका मान्यतेनुसार नारळ बळीचे प्रतीक आहे. बळी पुरुषांनी देण्याचीच परंपरा आहे. याच कारणामुळे महिलांनी नारळ फोडणे वर्ज्य आहे. ही एक प्राचीन प्रथा आहे.
उत्तर लिहिले · 12/4/2022
कर्म · 121765
3
होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य कि अयोग्य ?
होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्यांवरून चालण्याची किंवा धावण्याची प्रथा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यांत आहे. या वर्षी कर्नाटकमधील तुमकूर गावात होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्यांवरून चालत असतांना तीन जणांचा भाजल्याने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर या प्रथेवर बंदी आणण्यासाठी कर्नाटकमधील प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात तरतूद करणार असल्याची घोषणा तेथील एका मंत्र्यांनी केली आहे. याविषयीचा सनातन दृष्टीकोन पुढे दिला आहे.

१. होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्यांवरून चालण्याच्या प्रथेचा धर्मशास्त्रात कुठेही उल्लेख नाही. असे असले, तरी हिंदु धर्म हा स्वतःची उपासनापद्धत निर्माण करण्याचे आणि त्याद्वारे ईश्वरप्राप्तीसाठी साधना करण्याचे स्वातंत्र्य देतो. यानुसार तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता असलेल्यांनी तेजतत्त्वाची उपासना म्हणून प्रज्वलित निखार्यांवरून चालत गेल्यास त्यांना त्याचा त्रास होत नाही. उदाहरणार्थ यज्ञ प्रज्वलित असतांना त्या वेळी यज्ञकुंडावर पहुडण्याविषयी कुठेही धर्मशास्त्रात म्हटलेले नाही. असे असले, तरी तंजावूर (तमिळनाडू) येथील अग्नीयोगी प.पू. रामभाऊस्वामी तेजतत्त्वाची उपासना म्हणून यज्ञ प्रज्वलित असतांना त्या वेळी यज्ञकुंडावर १०-१५ मिनिटे पहूडतात. त्या वेळी यज्ञाग्नीमुळे त्यांचे शरीर जळत नाही, हे अनेकांनी पाहिले आहे.

२. साधना न करणार्या सर्वसामान्य व्यक्तींनी मात्र साहसी कृत्य म्हणून होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्यांवरून चालू नये. उदाहरणार्थ तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता असलेली व्यक्ती सूर्याकडे पाहून त्राटक लावू शकते; मात्र सामान्य व्यक्ती क्षणभरही सूर्याकडे पाहू शकत नाही; कारण सूर्याचे तेज धारण करण्याची क्षमता तिच्यात नसते.

३. एखाद्यामध्ये तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता आहे कि नाही, हे लक्षात न घेता होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्यांवरून चालण्याच्या प्रथेवर कायद्याद्वारे बंदी घालणे म्हणजे तेजतत्त्वाची उपासना करू इच्छिणार्यांना त्या साधनेपासून वंचित करण्यासारखे आहे.

४. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या २००९ या वर्षीच्या अहवालानुसार व्यक्तीच्या शरिरातील अवयव जाळणार्या सिगारेटमुळे भारतात प्रतिवर्षी ९ लक्ष म्हणजेच प्रतिदिन २४६६ व्यक्ती मृत्यूमुखी पडतात. तरीही सिगारेटवर बंदी आणण्यासाठी काहीही न करणारे मंत्रीमहोदय केवळ ३ व्यक्तींचा मृत्यू झाला; म्हणून निखार्यांवरून चालण्याच्या प्रथेवर कायद्याद्वारे बंदी घालण्याचा विचार करतात, हे आश्चर्यकारक, तसेच धर्मद्रोहीही आहे.

५. होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्यांवरून चालत असतांना तीन युवकांच्या कपड्यांना आग लागून त्यांचा मृत्यू होणे, हा केवळ अपघात आहे. प्रतिदिन रस्त्यांवर शेकडो अपघात घडत असतात; म्हणून शासन काही रस्त्यांवरून वाहन चालवण्यास बंदी घालणारा कायदा करत नाही; मग या अपघातासाठी थेट कायदा करण्याची भाषा करणे, हे हास्यास्पद ठरते.

६. गेल्या वर्षी हज यात्रेला चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या ७०० हून अधिक मुसलमानांपैकी १०० हून अधिक मुसलमान भारतीय होते; मग शासन हज यात्रेला जाण्यास बंदी घालेल का ?

७. हिंदूंनी धर्मशिक्षित होण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच साधना न करणार्या सर्वसामान्य व्यक्तींनी अशा प्रकारच्या कृती करू नयेत, यासाठी प्रबोधन करणे, हेच या घटनेवरील खरे उपाय आहेत. शासनाने हे लक्षात घेऊन त्यानुसार कार्य केले पाहिजे.


उत्तर लिहिले · 17/3/2022
कर्म · 121765
0
चुलत भावाला चुलत बहिणीचे सुतक असते की नाही, हेDepend गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुमची जात आणि तुम्ही कोणत्या परंपरेचे पालन करता.
सामान्य नियम:
  • एकाच कुटुंबातील सदस्यांना सुतक असते. याचा अर्थ असा आहे की चुलत भाऊ आणि बहीण एकाच वंशाचे असले, तरी ते एकाच कुटुंबाचे भाग मानले जात नाहीत. त्यामुळे, चुलत भावाला चुलत बहिणीच्या मृत्यूचे सुतक नसावे.
  • काही जाती आणि समुदायांमध्ये, चुलत भाऊ आणि बहीण यांच्यात जास्त जवळीक असते आणि त्यांना एकाच कुटुंबाचा भाग मानले जाते. अशा परिस्थितीत, चुलत भावाला चुलत बहिणीचे सुतक असू शकते.
अधिक माहितीसाठी: तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून किंवा तुमच्या जातीच्या धर्मगुरूंकडून याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. ते तुम्हाला तुमच्या परंपरेनुसार योग्य मार्गदर्शन करू शकतील.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040