सामाजिक_सुधारणा इतिहास

सर्वोदय चळवळ कोणी सुरु केली?

2 उत्तरे
2 answers

सर्वोदय चळवळ कोणी सुरु केली?

1
महात्मा गांधी

परंपरागत भारतीय समाजव्यवस्थेची नैतिक तत्त्वांच्या आधारे आमूलाग्र पुनर्बांधणी करण्याची एक विचारप्रणाली. सर्वांचे कल्याण, सर्वांचा उदय असा सर्वोदय शब्दाचा भावार्थ आहे. 
भगवद्‌गीते तील सर्वभूतहिताची कल्पना यात अनुस्यूत आहे. या विचारसरणीचा महात्मा गांधींनी व्याख्याने व प्रासंगिक स्फुटलेखनातून पुरस्कार केला होता.
 त्यांनी १८ जानेवारी १९४८ च्या हरिजन वृत्तपत्र - अंकात सर्वोदयाचा आशय आणि वैशिष्टये यांची सुस्पष्ट रूपरेषा मांडली आहे. जैन दर्शनातील विचार आणि रस्किनच्या अंटू धिस लास्ट या पुस्तकावरून गांधीजींना हा विचार सुचला; कारण गांधीजींनी रस्किनच्या या पुस्तकाचे गुजरातीत भाषांतर करून त्याला ‘ सर्वोदय ’ हे शीर्षक दिले होते.
उत्तर लिहिले · 8/10/2022
कर्म · 7460
0

सर्वोदय चळवळ महात्मा गांधी यांनी सुरू केली.

सर्वोदय या शब्दाचा अर्थ 'सर्वांसाठी उदय' किंवा 'सर्वांचे कल्याण' असा होतो. गांधीजींनी हे तत्त्वज्ञान समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मांडले.

या चळवळीचा उद्देश:

  • सर्वांसाठी समान संधी
  • सर्वांचे कल्याण
  • अहिंसक मार्गांनी सामाजिक बदल घडवणे

गांधीजींच्या पश्चात, आचार्य विनोबा भावे यांनी या चळवळीला पुढे नेले.

अधिक माहितीसाठी:

एम. के. गांधी संस्थळ
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2220

Related Questions

दामोदर धर्मानंद कोसंबी, रामायण शर्मा, कॉम्रेड शरद पाटिल, महात्मा फुले?
पुरातत्व, अभिलेखागार, भूगोल, हस्तलिखितांचा अभ्यास यात वेगळा घटक ओळखा?
भारतावर सर्वात जास्त राज्य कोणी केले?
भारतातील सर्वात मोठा योद्धा कोण होता?
महाराष्ट्राचा सर्वात मोठा योद्धा कोण होता?
माझगाव विषयी माहिती लिहा. तुम्हाला माहीत असलेल्या गुरु-शिष्यांच्या जोड्या लिहा.
जाधवांच्या अनेक शाखा आहेत, त्या कोणत्या कोणत्या आहेत?