राजकारण भारत भारतीय राजकारण

भारतातील वीस कलमी कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली?

2 उत्तरे
2 answers

भारतातील वीस कलमी कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली?

2
इंदिरा गांधी 

गरीबी हटाओ योजनेच्या अंतर्गत इंदिरा गांधी सरकार द्वारे २० कलमी कार्यक्रम (Twenty Point Program TPP) ची १९७५ मध्ये घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर वर्ष १९८२, १९८६ तसेच २००६ मध्ये या योजनेत बदल करण्यात आले आहेत. सध्या बीस कलमी कार्यक्रम २००६ लागू आहे. या कार्यक्रमाचा मूल उद्देश्य मागास व निर्धन नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे.

१९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी 'गरिबी हटाव' चा नारा दिला होता. त्यावेळी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गरिबीचा दर ५७ टक्के होता. ही गरिबी हटवण्यासाठी इंदिरा गांधींनी अनेक योजना जाहीर केल्या. या योजनांचा भर शेतकरी आणि मजूरांवर होता. भारतातला सगळ्यात गरिब असलेल्या ओडिशामधल्या कालाहंडी जिल्ह्यातून इंदिरा गांधींनी 'गरिबी हटाव' चा नारा दिला.

अल्पभूधारक शेतकरी, मजूर यांचं जीवनमान उंचावण्यासाठी या योजनांची मदत झाली. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी गरिबी निर्मूलनासाठी २० कलमी कार्यक्रमच जाहीर केला.

 २० कलमी कार्यक्रम बाबी

1 - गरीबी हटाओ
२   जन शक्ति

3 - किसान मित्र
4 - श्रमिक कल्‍याण

5    खाद्य सुरक्षा
6 – सर्वांसाठी शिक्षण

7 - शुद्ध पेयजल

8 – सर्वांसाठी आरोग्य

9 – सर्वांसाठी शिक्षण
10 -अनुसूचित जाति, जमाती, अल्‍पसंख्‍याक व अन्‍य मागास वर्ग कल्‍याण

11 - महिला कल्‍याण
12 - बाल विकास

13 - युवा कल्‍याण
14 -वस्‍ती सुधार

15 - पर्यावरण सुरक्षा व वन वृध्‍दी
16 - सामाजिक सुरक्षा

17 - ग्रामीण सड़क
18 - ग्रामीण उर्जा
19 - मागास प्रादेशिक विकास
20 - ई—शासन
उत्तर लिहिले · 8/10/2022
कर्म · 7460
0

भारतातील वीस कलमी कार्यक्रमाची सुरुवात इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये केली.

हा कार्यक्रम देशातील गरीब आणि दुर्बळ घटकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आला होता.

या कार्यक्रमात खालील प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले गेले:

  • गरीबी निर्मूलन
  • रोजगार वाढवणे
  • शिक्षण
  • गृहनिर्माण
  • आरोग्य
  • कृषी उत्पादन वाढवणे
  • पर्यावरण संरक्षण
  • सामाजिक न्याय

हा कार्यक्रम अनेक वेळा सुधारित करण्यात आला आहे आणि आजही तो केंद्र सरकारद्वारे चालवला जात आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1660

Related Questions

भारताचे मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ यांच्यातील परस्परसंबंधाची चर्चा करा.
भारतीय लोकशाहीचे स्वरूप कायदे मंडळ, साहित्य, कार्यकारी मंडळ आहे का?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे घेण्यात आले?
भारतात वीस कलमी कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली?
संविधान सभेच्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीगची बदललेली भूमिका स्पष्ट करा?
भारताने कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे?
भारताचे पंतप्रधान ?