गणित भूमिती भूमिती

8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचा कर्ण किती येईल?

2 उत्तरे
2 answers

8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचा कर्ण किती येईल?

3
इथे मी तुम्हाला कर्णाचे सूत्र कसे काढतात ते सांगतो पहिले. चौरस म्हणजे चारही बाजू अगदी सारखे असून एकमेकांना काटकोनात छेदतात.
ह्यामुळे कोणताही कर्ण आणि त्याच्या लगतच्या दोन बाजू 45-90-45 अंशाचा त्रिकोण बनवतात.
ह्या त्रिकोणावर आपण पायथागोरसचे प्रमेय सहज वापरू शकतो. काय म्हणतं प्रमेय??

"कर्णाचा वर्ग इतर दोन्ही बाजूचा वर्ग असतो"

कर्ण² = बाजू² + बाजू²

पण इथे चौरस असल्यामुळे दोन्ही बाजू सारख्या आहेत.

कर्ण² = 2 x बाजू²

वर्गमूळ घ्या..

कर्ण = √२ x बाजू

हे झालं कर्णाची लांबी मोजण्याचे सूत्र.. 😌😋

आता प्रश्नात विचारलेली बाजूची लांबी इथे ठेवा.

कर्ण = √२ x ८
कर्ण = 11.31 सेंटीमीटर

उत्तर आहे: ८ सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचा कर्ण ११.३१ सेंटीमीटर असेल. 😊
उत्तर लिहिले · 25/9/2022
कर्म · 75305
0

8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचा कर्ण 11.31 सेमी येईल.

स्पष्टीकरण:

चौरसाचा कर्ण काढण्यासाठी आपण पायथागोरस प्रमेय वापरू शकतो.

पायथागोरस प्रमेय नुसार: कर्ण² = बाजू² + बाजू²

या गणितामध्ये, बाजू = 8 सेमी

म्हणून, कर्ण² = 8² + 8² = 64 + 64 = 128

कर्ण = √128 = 11.31 सेमी (approx.)

गणित आणि विज्ञानाबद्दल अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5280

Related Questions

पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सिताला 12% गुण जास्त आहेत व गिताला 5% गुण कमी आहेत. दोघींच्या गुणामधील फरक 51 चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती?
A आणि B 100 मिटरच्या धावण्यात भाग घेतो चा वेग 5 कि.मी. प्रति तास आहे. A ने 13 च्या 8 मिटर मागे सुरू करून सुद्धा त्याला 8 सेकंदाने हरवतो तर B चा वेग किती कि.मी. प्रति तास असेल?
१ ते ३० पर्यंत पाढे PDF?
दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6.35 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
एक चाक 88 किमी अंतर कापायला 1000 चक्कर लावते, तर चाकाची त्रिज्या किती आहे?
एका शंकूचे पृष्ठफळ 616 चौसेमी आहे. त्याची तिरकस उंची ही तळाच्या त्रिजेच्या तिप्पट असल्यास तिरकस उंची काढा?
एक वस्तु 1470 रुपयांस विकल्याने खरेदी किंमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर खरेदी किंमत किती रु.असेल?