2 उत्तरे
2 answers

जनानखाना म्हणजे काय?

6
'जना' म्हणजे स्त्री. तेंव्हा 'जनाना' किंवा 'जनानखाना' म्हणजे जिथे स्त्रिया राहतात ती जागा. यालाच 'हरम' असे सुद्धा म्हणतात. विवाहितांचे किंवा उपस्त्रीयांचे परपुरुषांशी आणि अविवाहितांचे खालच्या हुद्द्याच्या अधिकाऱ्यांशी संबंध होऊ नयेत म्हणून पातशाहाच्या महालात स्त्रियांना पुरुषांपासून वेगळ्या अशा ठिकाणी ठेवले जात असे. त्यालाच जनानखाना असे म्हणतात. जनानखाना म्हणजे केवळ युद्धात पळवून उपभोगण्यासाठी आणलेल्या गुलाम स्त्रियांना ठेवायची जागा नव्हे, जरी का प्रायः त्यांना सुद्धा जनानखान्यातच ठेवण्यात येत असे. म्हणजे पातशाहच्या आई-बहिणींपासून ते गुलाम उपस्त्रीपर्यंत आहेत नाहीत त्या सगळ्या बायका या जनानखान्यात असत. अर्थातच त्यांच्या पातळीनुसार त्यांना वागणूक ही वेगळीच मिळत असणार. या जनानखान्यांनात पातशाह आणि त्याच्या कुटुंबातील पुरुषांव्यतिरिक्त इतर पुरुषांना मुक्त प्रवेश नसे. म्हणून तिथे कारभारासाठी तृतीयपंथीय म्हणजेच खच्ची केलेले पुरुष असत. सिनेमांत वगैरे मोगल बायकांसोबत नेहमी एक "मावशी" दाखवली जाते ती त्या कारणासाठी.

धन्यवाद...!!
उत्तर लिहिले · 6/9/2022
कर्म · 19610
0

जनानखाना म्हणजे भारतीय उपखंडात वापरला जाणारा शब्द आहे. याचा अर्थ असा होतो:

  • घरातील तो भाग जिथे स्त्रिया आणि लहान मुले राहतात.
  • मुस्लिम किंवा हिंदू घरातील स्त्रियांचा समुदाय.

हे शब्द फारसी भाषेतून आले आहेत, जिथे 'जनान' म्हणजे 'स्त्रिया' आणि 'खाना' म्हणजे 'घर'.

ऐतिहासिक संदर्भ:

  • मुघल काळात, जनानखाना शाही कुटुंबातील स्त्रियांचे निवासस्थान होते.
  • राजघराण्यातील स्त्रिया, रखेल्या आणि दासी येथे राहत असत.
  • जनानखान्याची स्वतःची अशी व्यवस्था होती आणि तिथे महिलांचे वर्चस्व होते.

आधुनिक संदर्भ:

  • आता हा शब्द क्वचितच वापरला जातो.
  • काहीवेळा याचा उपयोग स्त्रियांच्या खासगी जागेसाठी केला जातो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1420

Related Questions

सामाजिक सांस्कृतिक इतिहास लेखन पद्धत सविस्तर लिहा?
सामाजिक व सांस्कृतिक इतिहास लेखन पद्धत सविस्तर लिहा?
बलुतेदार पद्धतीची अपकार्ये थोडक्यात लिहा?
ब्रिटिश काळात शेतमजूर वर्ग का उदयास आला?
ब्रिटिश काळात शेतमजूर वर्ग का उदयाला आला?
दळवी जमीनधारकांच्या लढ्याबद्दल माहिती द्या?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?