आयुर्वेद आरोग्य

निरोगी पाचन तंत्रासाठी कोणत्या आयुर्वेदिक टिप्सचे अवलंब करावे?

2 उत्तरे
2 answers

निरोगी पाचन तंत्रासाठी कोणत्या आयुर्वेदिक टिप्सचे अवलंब करावे?

0

निरोगी पाचन तंत्रासाठी या आयुर्वेदिक टिप्सचे अवलंब करा



अनेक वेळा अपचन, बद्धकोष्ठता, गॅस इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण या आयुर्वेदिक टिप्स देखील अवलंबवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.

 
1 भूक लागेल तेव्हाच खा. आधीचे जेवण पचल्यावरच खा. कधीकधी आपल्याला असे जाणवते की आपण भुकेले आहोत, हे निर्जलीकरणामुळे देखील होऊ शकते. त्यामुळे आपण आपल्या शरीराशी सुसंगत रहा आणि भूक लागल्यावरच खा.
 
2 जेवण आरामात बसून खा. जेवताना फक्त जेवणावर लक्ष केंद्रित करा. या काळात टीव्ही, पुस्तक, फोन आणि लॅपटॉप पाहू नका.

 
3 गरम आणि ताजे शिजवलेले अन्न खा. फ्रीज मधील थंडगार अन्न खाणे टाळा.गरम आणि ताजे अन्न खाल्ल्याने आपली पचनशक्ती टिकून राहते. हे आपल्या पाचन एंजाइमला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते.
 
4 विसंगत अन्न एकत्र खाणे टाळा. यामुळे पोटात बिघाड होऊ शकतो. विसंगत अन्नामध्ये फळे आणि दूध, मासे आणि दूध इ.खाणे टाळा.
 
5 घाई घाई ने खाऊ नका. अन्न फक्त गिळू नका तर चावून खा. चावून चावून अन्न खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते.
 
 

उत्तर लिहिले · 29/6/2022
कर्म · 53715
0

निरोगी पाचन तंत्रासाठी काही आयुर्वेदिक टिप्स खालीलप्रमाणे आहेत:

  • जेवणाची वेळ: दररोज ठराविक वेळेवर जेवण करा.
  • आहार:
    • ताजे आणि पौष्टिक अन्न खा.
    • जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा.
    • आपल्या आहारात फळे, भाज्या, धान्ये आणि प्रथिने यांचा समावेश करा.
  • पाणी: पुरेसे पाणी प्या. जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळा.
  • योगा: नियमित योगा केल्याने पचनक्रिया सुधारते. योगासनांचे फायदे
  • त्रिफळा चूर्ण: त्रिफळा चूर्ण हे पचनक्रिया सुधारण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.
  • आले: आल्यामध्ये पाचक एंजाइम असतात, जे अन्न पचनास मदत करतात.
  • धणे: धणे अपचन आणि पोट फुगणे यावर गुणकारी आहे.
  • पुदिना: पुदिना पाचन तंत्रासाठी खूप फायदेशीर आहे.

या टिप्सचे पालन करून तुम्ही तुमचे पाचन तंत्र निरोगी ठेवू शकता.

टीप: येथे दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे?
शारंगधर संहिता कोणत्या विषयावर आधारित आहे?
प्रख्यात बौद्ध पंडित नागार्जुन यांनी नागार्जुन रस रत्नाकर बंगालमध्ये देवीच्या रोगावर काय उपाय सांगितले?
फायब्राईडवर आयुर्वेदिक हमखास उपचार आहेत काय? असल्यास पत्ता पाठवा.
Fibromyalgia वर आयुर्वेदिक उपचार कोणते आहे?
गुडघेदुखीवर शेवग्याच्या शेंगेची किंवा बाभळीच्या शेंगेची पावडर यापैकी कोणती पावडर खायची असते? कशी व कशाबरोबर आणि किती दिवस खायची असते?
वैद्यकीय सुभाषितांचे संस्कृत साहित्यातील महत्त्व कसे स्पष्ट कराल?