दिनचर्या आरोग्य विज्ञान

आरोग्य विज्ञानाच्या दृष्टीने दिनचर्या म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

आरोग्य विज्ञानाच्या दृष्टीने दिनचर्या म्हणजे काय?

1

‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे’, अशी शिकवण पूर्वी मुलांना दिली जाई. आज मुले उशिरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात. पूर्वी ऋषीमुनींचा दिवस ब्राह्ममुहुर्ताच्या वेळी चालू होत असे, तर आज यंत्रयुगामुळे ‘रात्रपाळीत काम आणि दिवसा झोप’, असे करावे लागते. पूर्वीची दिनचर्या निसर्गाला धरून होती, तर सध्याची तशी नाही. दिनचर्या जितकी निसर्गाला धरून असेल, तितकी ती आरोग्याला पूरक असते. आज तशी ती नसल्यानेच पोटाच्या, घशाच्या, हृदयाच्या अशा नाना व्याधींनी मनुष्य त्रस्त झाला आहे.

पूर्वीच्या काळी स्नानानंतर तुळशीला पाणी घालून तिला वंदन केले जाई, तर आज कित्येकांकडे तुळशीवृंदावनही नसते. पूर्वी दिवेलागणीच्या वेळी ‘शुभं करोति…’ म्हटले जाई, तर आज दिवेलागणीच्या वेळी मुले दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहाण्यात मग्न असतात. हिंदु धर्माने सांगितलेल्या आचारपालनापासून हिंदू फार दूर जात आहेत. आचारांचे पालन करणे, हा अध्यात्माचा पाया आहे. ‘विज्ञानाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांनी नव्हे, तर अध्यात्माला धरून रहाण्यानेच मनुष्य खरा सुखी होऊ शकतो’, हे तत्त्व सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक कृतीतून आपल्यातील रज-तम घटून सत्त्वगुण वाढणे आणि वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होणे, हे साध्य होण्याच्या दृष्टीनेच आपल्या प्रत्येक आचाराची योजना केलेली आहे, हे हिंदु धर्माचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. ज्ञानयोग, कर्मयोग आदी साधनामार्गांप्रमाणे आचारधर्मही ईश्वरप्राप्तीच्या दिशेने नेणारा आहे. यादृष्टीने आपण दिनचर्या म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व पाहूया.



व्याख्या
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केल्या जाणार्‍या कृतींना एकत्रितपणे ‘दिनचर्या’ असे म्हणतात.



समानार्थी शब्द
‘दिनचर्या’ या शब्दाला ‘आन्हिक’ आणि ‘नित्यकर्म’ असे समानार्थी शब्द आहेत.



महत्त्व
अ. निसर्गनियमांनुसार दिनचर्या असणे आवश्यक
मानवाचे संपूर्ण आयुष्य स्वस्थ रहावे, त्याला कोणतेही विकार होऊ नयेत, या दृष्टीने दिनचर्येत विचार केलेला असतो. एखादी व्यक्ती दिवसभरात कोणता आहार-विहार करते, कोणकोणत्या कृती करते यांवर तिचे स्वास्थ्य अवलंबून असते. स्वास्थ्याच्या दृष्टीने दिनचर्या महत्त्वाची असते. दिनचर्या निसर्गाच्या नियमांप्रमाणे असल्यास त्या कृतींचा मानवाला त्रास न होता लाभच होतो. यासाठीच निसर्गनियमांप्रमाणे (धर्माने सांगितलेल्या गोष्टींनुसार) वागणे आवश्यक आहे, उदा. सकाळी लवकर उठणे, उठल्यावर मुखमार्जन करणे, दात घासणे, स्नान करणे इत्यादी.

‘ऋषी सूर्यगतीप्रमाणे ब्राह्ममुहुर्ताच्या वेळी प्रातर्विधी, स्नान आणि संध्या करत. त्यानंतर वेदाध्ययन आणि कृषीकर्म करत अन् रात्री लवकर झोपत. त्यामुळे त्यांना शारीरिक स्वास्थ्य होते; परंतु आज लोक निसर्गनियमांच्या विरुद्ध वागत असल्यामुळे त्यांचे शरीरस्वास्थ्य बिघडले आहे. पशूपक्षीसुद्धा निसर्गनियमांनुसार आपली दिनचर्या करतात.

येथे एक तत्त्व लक्षात घ्यावे की, उन्नत साधक आणि संत यांची साधना अंतर्मनातून सतत चालू असल्याने त्यांची वाटचाल ईश्वरप्राप्तीच्या दिशेने होतच असते. त्यामुळे त्यांनी प्राथमिक स्तरावरील आचारधर्माचे पालन केले नाही, तरी चालू शकते; कारण ते आचारधर्माच्या पलीकडे गेलेले असतात.



वेळेवर झोपून पहाटे उठण्याचे लाभ
सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोकांची जीवनशैली अत्यंत बिघडली आहे. लोक सकाळी उशिरापर्यंत झोपून रहातात आणि त्याचसमवेत रात्री उशिरा झोपतात. कदाचित् त्यामुळेच सकाळी उशिरा जाग येत असावी. एका संशोधनातून ‘पहाटे उठण्याचे अनेक लाभ’ समोर आले आहेत.



१. जे लोक रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठतात, त्यांना दिवसभर ताजेतवाने वाटते.

२. सकाळी लवकर उठण्याची वंशपरंपरागत सवय ज्यांना आपल्या आई-वडिलांकडून मिळाली आहे, ते शांत असतात. ते लगेच चिडत नाहीत. त्यांना नैराश्य आणि ‘सिजोफ्रेनिया’ यांसारखे मनोविकार होण्याची चिंता नसते. त्यांचे मानसिक आरोग्यही चांगले रहाते.

३. याविषयी ‘नेचर कम्युनिकेशन्स’ नावाच्या नियतकालिकामध्ये छापलेल्या एका शोधपत्रामध्ये माणसाच्या दिनचर्येविषयी मोठा खुलासा करण्यात आला होता. ‘उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे’, यामुळे मानसिक आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो, याविषयी या शोधपत्रामध्ये उल्लेख आहे. यासमवेतच यामुळे इतर रोगही होऊ शकतात.

४. याविषयीचे संशोधन ब्रिटनचे ‘एक्सटर विश्‍वविद्यालय’ आणि अमेरिकेचे ‘मेसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटल’ यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे.

उत्तर लिहिले · 25/6/2022
कर्म · 53710
0

आरोग्य विज्ञानाच्या दृष्टीने दिनचर्या म्हणजे दिवसभरात आपण जे काही काम करतो, जसे की खाणे, पिणे, झोपणे, व्यायाम करणे, काम करणे, इत्यादी. या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यावर परिणाम करतात.

दिनचर्याचे महत्त्व:

  • शारीरिक आरोग्य: चांगली दिनचर्या आपल्याला शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवते.
  • मानसिक आरोग्य: नियमित दिनचर्या मानसिक तणाव कमी करते आणि मनःशांती वाढवते.
  • रोगप्रतिकारशक्ती: योग्य दिनचर्या रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
  • उत्पादकता: नियमित दिनचर्येमुळे कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित करता येते आणि उत्पादकता वाढते.

चांगल्या दिनचर्येमध्ये काय असावे:

  1. वेळेवर झोपणे आणि उठणे.
  2. सकाळचा व्यायाम किंवा योगा.
  3. पौष्टिक आणि संतुलित आहार.
  4. पुरेशी झोप (७-८ तास).
  5. कामामध्ये आणि विश्रांतीमध्ये संतुलन.

टीप: व्यक्तीनुसार दिनचर्या बदलू शकते. त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक गरजेनुसार दिनचर्या ठरवावी.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1820

Related Questions

ऋतुचर्या म्हणजे काय?
सकाळी लवकर उठायचे फायदे कोणते आहेत?
ईश्वर आरोग्यदायी दिनचर्या हा लेख कुणाचा आहे?
सेना न्हावी काय करू पाहत आहे? आरोग्यदायी दिनचर्या?
दिवसाची दिनचर्या साधारणपणे कशी असावी?
अंघोळ सकाळीच का करावी?
आरोग्य दिनचर्या कशी असावी?