Topic icon

दिनचर्या

1

‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे’, अशी शिकवण पूर्वी मुलांना दिली जाई. आज मुले उशिरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात. पूर्वी ऋषीमुनींचा दिवस ब्राह्ममुहुर्ताच्या वेळी चालू होत असे, तर आज यंत्रयुगामुळे ‘रात्रपाळीत काम आणि दिवसा झोप’, असे करावे लागते. पूर्वीची दिनचर्या निसर्गाला धरून होती, तर सध्याची तशी नाही. दिनचर्या जितकी निसर्गाला धरून असेल, तितकी ती आरोग्याला पूरक असते. आज तशी ती नसल्यानेच पोटाच्या, घशाच्या, हृदयाच्या अशा नाना व्याधींनी मनुष्य त्रस्त झाला आहे.

पूर्वीच्या काळी स्नानानंतर तुळशीला पाणी घालून तिला वंदन केले जाई, तर आज कित्येकांकडे तुळशीवृंदावनही नसते. पूर्वी दिवेलागणीच्या वेळी ‘शुभं करोति…’ म्हटले जाई, तर आज दिवेलागणीच्या वेळी मुले दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहाण्यात मग्न असतात. हिंदु धर्माने सांगितलेल्या आचारपालनापासून हिंदू फार दूर जात आहेत. आचारांचे पालन करणे, हा अध्यात्माचा पाया आहे. ‘विज्ञानाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांनी नव्हे, तर अध्यात्माला धरून रहाण्यानेच मनुष्य खरा सुखी होऊ शकतो’, हे तत्त्व सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक कृतीतून आपल्यातील रज-तम घटून सत्त्वगुण वाढणे आणि वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होणे, हे साध्य होण्याच्या दृष्टीनेच आपल्या प्रत्येक आचाराची योजना केलेली आहे, हे हिंदु धर्माचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. ज्ञानयोग, कर्मयोग आदी साधनामार्गांप्रमाणे आचारधर्मही ईश्वरप्राप्तीच्या दिशेने नेणारा आहे. यादृष्टीने आपण दिनचर्या म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व पाहूया.



व्याख्या
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केल्या जाणार्‍या कृतींना एकत्रितपणे ‘दिनचर्या’ असे म्हणतात.



समानार्थी शब्द
‘दिनचर्या’ या शब्दाला ‘आन्हिक’ आणि ‘नित्यकर्म’ असे समानार्थी शब्द आहेत.



महत्त्व
अ. निसर्गनियमांनुसार दिनचर्या असणे आवश्यक
मानवाचे संपूर्ण आयुष्य स्वस्थ रहावे, त्याला कोणतेही विकार होऊ नयेत, या दृष्टीने दिनचर्येत विचार केलेला असतो. एखादी व्यक्ती दिवसभरात कोणता आहार-विहार करते, कोणकोणत्या कृती करते यांवर तिचे स्वास्थ्य अवलंबून असते. स्वास्थ्याच्या दृष्टीने दिनचर्या महत्त्वाची असते. दिनचर्या निसर्गाच्या नियमांप्रमाणे असल्यास त्या कृतींचा मानवाला त्रास न होता लाभच होतो. यासाठीच निसर्गनियमांप्रमाणे (धर्माने सांगितलेल्या गोष्टींनुसार) वागणे आवश्यक आहे, उदा. सकाळी लवकर उठणे, उठल्यावर मुखमार्जन करणे, दात घासणे, स्नान करणे इत्यादी.

‘ऋषी सूर्यगतीप्रमाणे ब्राह्ममुहुर्ताच्या वेळी प्रातर्विधी, स्नान आणि संध्या करत. त्यानंतर वेदाध्ययन आणि कृषीकर्म करत अन् रात्री लवकर झोपत. त्यामुळे त्यांना शारीरिक स्वास्थ्य होते; परंतु आज लोक निसर्गनियमांच्या विरुद्ध वागत असल्यामुळे त्यांचे शरीरस्वास्थ्य बिघडले आहे. पशूपक्षीसुद्धा निसर्गनियमांनुसार आपली दिनचर्या करतात.

येथे एक तत्त्व लक्षात घ्यावे की, उन्नत साधक आणि संत यांची साधना अंतर्मनातून सतत चालू असल्याने त्यांची वाटचाल ईश्वरप्राप्तीच्या दिशेने होतच असते. त्यामुळे त्यांनी प्राथमिक स्तरावरील आचारधर्माचे पालन केले नाही, तरी चालू शकते; कारण ते आचारधर्माच्या पलीकडे गेलेले असतात.



वेळेवर झोपून पहाटे उठण्याचे लाभ
सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोकांची जीवनशैली अत्यंत बिघडली आहे. लोक सकाळी उशिरापर्यंत झोपून रहातात आणि त्याचसमवेत रात्री उशिरा झोपतात. कदाचित् त्यामुळेच सकाळी उशिरा जाग येत असावी. एका संशोधनातून ‘पहाटे उठण्याचे अनेक लाभ’ समोर आले आहेत.



१. जे लोक रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठतात, त्यांना दिवसभर ताजेतवाने वाटते.

२. सकाळी लवकर उठण्याची वंशपरंपरागत सवय ज्यांना आपल्या आई-वडिलांकडून मिळाली आहे, ते शांत असतात. ते लगेच चिडत नाहीत. त्यांना नैराश्य आणि ‘सिजोफ्रेनिया’ यांसारखे मनोविकार होण्याची चिंता नसते. त्यांचे मानसिक आरोग्यही चांगले रहाते.

३. याविषयी ‘नेचर कम्युनिकेशन्स’ नावाच्या नियतकालिकामध्ये छापलेल्या एका शोधपत्रामध्ये माणसाच्या दिनचर्येविषयी मोठा खुलासा करण्यात आला होता. ‘उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे’, यामुळे मानसिक आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो, याविषयी या शोधपत्रामध्ये उल्लेख आहे. यासमवेतच यामुळे इतर रोगही होऊ शकतात.

४. याविषयीचे संशोधन ब्रिटनचे ‘एक्सटर विश्‍वविद्यालय’ आणि अमेरिकेचे ‘मेसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटल’ यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे.

उत्तर लिहिले · 25/6/2022
कर्म · 53710
2

ऋतुचर्या
व्यक्तीला स्वस्थ राहण्यासाठी आयुर्वेद शास्त्राने आहार आणि विहार यांचे योग्य पालन करण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. हे नियम देश, काल, वय, प्रकृती यांनुसार वेगळे वेगळे आहेत. परंतु, ऋतुनुसार पाळावयाचे नियम सर्वांसाठी सारखे आहेत.


ऋतुचर्या
ऋतुप्रमाणे मनुष्याने आहार विहार नियमांचे पालन केल्याने त्यास दीर्घायुष्याचा लाभ होतो. आयुर्वेदानुसार बारा महिन्यांमध्ये पुढील सहा ऋतूंची गणना होते — शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत. प्रत्येकी दोन महिन्यांकरिता एक असे सहा ऋतू होतात.

आयुर्वेद शास्त्रकारांनी प्रत्येक ऋतूची लक्षणे आणि त्यानुसार पाळावयाचे नियम यांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. शिशिर, वसंत आणि ग्रीष्म ह्या तीन ऋतू काळामध्ये अग्नी शक्तीचे प्राबल्य असते, म्हणून यास ‘आदान’ काल असेही म्हणतात. आदान काळात सूर्याच्या उष्णतेने वातावरणातील व शरीरातील जलांश शोषून घेतला जातो, वायूचा रुक्ष आणि तीक्ष्ण गुण वाढतो. हे बदल शिशिर ऋतूत कमी, वसंत ऋतूत मध्यम आणि ग्रीष्मामध्ये सर्वांत जास्त जाणवतात.

याच्याबरोबर उलट वर्षा, शरद, हेमंत ऋतूस ‘विसर्ग’ काल असेही म्हणतात. यात चंद्राची शक्ती वाढते व सूर्याची शक्ती कमी होते. पावसामुळे वातावरणातील व शरीरातील द्रव अंश वाढतो आणि स्निग्धता बल वाढते, विसर्ग कालामध्ये वर्षा ऋतूत अल्प, शरद ऋतूत मध्यम, हेमंत ऋतूत उत्तम बलवृद्धी होते.

(१) शिशिर ऋतुचर्या : या काळात उत्तरेकडून थंड वारे वाहत असतात, शारीर रुक्षता काही प्रमाणात वाढते; म्हणून वात वाढवणारे तिखट, कडू, कषय चवीचे पदार्थ खाऊ नयेत. तसेच शीत आणि रुक्ष पदार्थ खाऊ नयेत. शिशिर ऋतुकाळात भूक चांगली लागते; म्हणून दूध, दुधाचे पदार्थ, गुळ, नवीन तांदूळ, मांस पदार्थ यांचे सेवन करावे. रोज डोके व संपूर्ण शरीराला तेल लावून गरम पाण्याने स्नान करावे.

(२) वसंत ऋतुचर्या : या ऋतुकाळात वारे दक्षिण दिशेकडून वाहतात. सूर्याची प्रखरता वाढते, त्यामुळे शरद ऋतूत शरीरात साठलेले कफ प्रकुपित होतो. प्रकुपित झालेल्या कफाचे तीव्र वमन, नस्य, कफघ्न औषधे देऊन शमन करावे. हलके व रुक्ष अन्न सेवन करावे, जुने जव, गहू, मध इत्यादी अन्नपदार्थ तसेच जंगली प्राण्यांचे मांस सेवन करावे.


ऋतुचर्या
(३) ग्रीष्म ऋतुचर्या : या काळात सूर्यकिरण फार तीव्र असतात. वारा नैर्ऋत्य दिशेकडून वाहतो. तो पिडादायक असतो, शरीर कफ अतीव उष्म्यामुळे क्षीण होतो, त्यामुळे वात वृद्धी होते. या ऋतूत मधुर, लघु, स्निग्ध, शीत, द्रव आहाराचे सेवन करावे. थंड पाण्याने स्नान करावे. दूध, साखर, तांदूळ, आंबट पदार्थ, मुरंबे, सरबते यांचे सेवन करावे. मद्यासारखे तीक्ष्ण द्रव्याचे सेवन करू नये. दुपारचे वेळी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने वाळ्याचे पडदे लावलेल्या, जेथे झाडांमुळे गारवा आहे अशा जागी व रात्री जेथे गार वारा आहे अशा ठिकाणी झोपावे.

(४) वर्षा ऋतुचर्या : या काळात ग्रीष्म ऋतूत तापलेल्या जमिनीवर पावसाचे थेंब पडल्याने जमिनीतून वाफा येऊ लागतात, वारे जोराने वाहतात. या ऋतूत अम्ल विपकाने, पाणी गढूळ झाल्याने व अग्नीमंद झाल्याने सर्व दोषांचा प्रकोप होतो. प्रकुपित दोषांना वमन, विरेचन, बस्ती इत्यादी उपक्रमांनी सम स्थितीत आणावे. वर्षा ऋतूत जुने धान्य, मसाला व फोडणी देऊन केलेल्या विविध सुप व सार, जंगल मांस, जुनी अरिष्टे, दह्याची निवळी, गरम पाणी इत्यादींचा आहारात समावेश करावा. आंबट, खारट, स्निग्ध, उष्ण पदार्थांचे सेवन करावे.

(५) शरद ऋतुचर्या : या काळात दिवसा सूर्यकिरणे तीव्र असतात व रात्री हवा थंड असते, या कारणाने वर्षा ऋतूत साठलेले शारीर पित्त प्रकुपित होते. या पित्ताचे शमन करण्यासाठी कडू रसाचे काढे, तूप इत्यादी विरेचनासाठी वापरावे. विरेचनाबरोबर रक्तमोक्षणाचाही उपयोग करावा. मधुर, तुरट, कडू रसाचे पदार्थ खावेत. तांदूळ, मूग, पडवळ, आवळा, मध, साखर, मांस इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करावा. तीव्र ऊन, दिवसा झोपणे, मद्य, क्षार, दही, तेल इत्यादींचे सेवन करणे तसेच पोटभर जेवण करणे टाळावे.

(६) हेमंत ऋतुचर्या : या काळात थंड वारे वाहू लागतात, अग्नी प्रदीप्त होतो व त्यामुळे भूक जास्त लागते. मधुर, अम्ल, लवण रसयुक्त आहाराचे सेवन भरपूर करावे, व्यायाम करावा. त्यानंतर अंगाला तेल व उटणे लावून गरम पाण्याने स्नान करावे, याने मांस धातू उपचय होतो. आहारात मांस रस, चरबीयुक्त मांस, गूळ, रवा, कणिक, उडीद, ऊस, दूध यांपासून बनवलेल्या पदार्थांचा वापर करावा. ताजे सकस अन्न, गरम पाणी, गरम वस्त्रे वापरावीत.


उत्तर लिहिले · 18/4/2022
कर्म · 121765
1
सकाळी लवकर उठण्याचे फायदे
आयुष्यातील ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्हाला लवकर उठलेच पाहिजे. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते. सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळतो. विशेष म्हणजे मोठ्यांसोबत मुलांनीही पहाटे उठण्याची सवय ठेवली पाहिजे.


सकाळी लवकर उठण्याचे फायदे

“लवकर निजे,लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे” हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. खरंतर पूर्वजांच्या या शिकवणीचे अनेक चांगले फायदे आहेत. ज्या लोकांना लवकर झोपून लवकर उठण्याची सवय असते ते जीवनात सुखी, बुद्धीवान, श्रीमंत आणि निरोगी असतात. अनेक यशस्वी आणि श्रीमंत माणसांच्या यशाचे गुपित लवकर उठण्याच्या सवयीत दडलेले आहे. जर तुम्हाला ही जीवनात सुखी आणि यशस्वी व्हायचं असेल तर लवकर उठण्याची सवय लावून घ्या. मात्र जर लवकर उठण्याची सवय लावायची असेल तर तुम्हाला आधी वेळेवर झोपण्याची सवय स्वतःला लावावी लागेल. कारण माणसाला रात्रभरात कमीत कमी सात ते आठ तास झोप मिळणं फार गरजेचं आहे. सकाळी लवकर उठून सकाळी चालण्याचे फायदेही असतात.





सकाळी लवकर उठण्याचे फायदे 
सकाळी लवकर उठल्यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात फ्रेश होते. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतात. सकाळी लवकर उठल्यामुळे वाचन, प्रार्थना अथवा मेडीटेशन, व्यायाम अशा चांगल्या गोष्टी करता येतात.

सुर्योदय पाहता येतो

सुर्योदय पाहणं आजकाल प्रत्येकाच्या नशिबात असतेच असे नाही. कारण अनेकांची दिवसाची सुरूवात सुर्य डोक्यावर आल्यावर होते. सुर्योदय पाहणं हा एक अद्भूत अनुभव असतो. कारण त्यामुळे दिवसाची सुरूवात उत्साह आणि आनंदाने होते. रात्रीच्या काळ्या गर्भातून होणारा अरुणोदय नवसंजीवनी देणारा असतो. शिवाय कोवळ्या उन्हात फिरल्यामुळे तुम्हाला व्हिटॅमीन डी पुरेशा प्रमाणात मिळते. थोडक्यास सकाळी लवकर उठून सुर्याचे दर्शन घेतल्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी आणि आनंदी होते.

उत्साही वाटते
सकाळी लवकर उठणारे लोक फार उत्साही आणि कार्यक्षम असतात. कारण जे लोक दिवसाची सुरूवात ब्रम्हमुहुर्तावर करतात त्यांची बुद्धी अतिशय तल्लख आणि तेजस्वी असते. ‘ब्रम्हमुहुर्त’ म्हणजे रात्रीचा चौथा प्रहर आणि सुर्योदया आधीचा पहिला प्रहर. दिवसाच्या चोविस तासात एकुण तीस मुहुर्त असतात. यापैकी तिसावा मुहुर्त हा ब्रम्हमुहुर्त असतो. या ब्रम्हमुहुर्ताला अतिशय महत्व आहे. साधारणपणे पावणे तीन ते पावणे पाचच्या दरम्यान ब्रम्हमुहुर्त असू शकतो. या वेळी एखाद्या गोष्टीचा अभ्यास,प्रार्थना, चिंतन,मनन, ध्यान करणे फार फायदेशीर ठरते. वास्तविक माणसाचे शरीर चक्र हे सुर्यानुसार चालते. त्यामुळे सकाळी उठल्यामुळे निसर्गनियमानुसार तुम्हाला फ्रेश वाटते.

आनंद मिळतो
जी माणसे उत्साही आणि सशक्त असतात ती नेहमीच आनंदी राहतात. म्हणूनच जर तुम्ही सकाळी लवकर उठला तर तुम्हाला उत्साही आणि आनंदी वाटते.

आत्मविश्वास वाढतो
सकाळी लवकर उठल्यामुळे तुमची कामे वेळत पूर्ण होतात. काम वेळेत झाल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास अधिक वाढतो. 

सकारत्मक विचारसरणी
सकाळचे वातावरण अतिशय शांत आणि निवांत असते. अशा वेळी उठून आपली नित्याची कामे सुरू केल्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटते. जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा याचा चांगला परिणाम तुमच्या विचारसरणीवर होतो. मनात चांगले आणि हिताचे विचार येतात. जे तुमच्या दिवसाच्या सुरूवातीसाठी अतिशय उत्तम असतात. याउलट उशीरा उठल्याने कामाचा ताण वाढतो. ज्यामुळे दिवसभर चिडचिड आणि कंटाळा येऊ शकतो.

व्यायामासाठी वेळ मिळतो
सकाळचे वातावरण अतिशय शांत आणि निवांत असते. अशा वेळी उठून आपली नित्याची कामे सुरू केल्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटते. जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा याचा चांगला परिणाम तुमच्या विचारसरणीवर होतो. मनात चांगले आणि हिताचे विचार येतात. जे तुमच्या दिवसाच्या सुरूवातीसाठी अतिशय उत्तम असतात. याउलट उशीरा उठल्याने कामाचा ताण वाढतो. ज्यामुळे दिवसभर चिडचिड आणि कंटाळा येऊ शकतो.

रात्री गाढ झोप येते
अनेकांना रात्री झोप न येण्याची समस्या सतावत असते. ज्यांना निद्रानाशाची समस्या असेल त्यांनी सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. कारण जे लवकर उठतात त्यांना रात्री लवकर आणि निवांत झोप लागते. शिवाय लवकर उठल्यामुळे दिवसभराची कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे रात्री झोपताना कामाचा ताण अथवा चिंता सतावत नाही.

ताण-तणाव दूर होतो
जर तुम्ही सकाळी लवकर उठला तर तुमची कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे तुम्हाला कामाचे टेंशन येत नाही. शिवाय कामे वेळेत झाल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकता. कुटुंब आणि प्रिय व्यक्तीसोबत गुजगोष्टी करत दिवसाची सुरूवात केल्यामुळे तुमच्या मनात सुखद भावना निर्माण होतात.

कार्यक्षमता वाढते
रात्रीभर पुरेशी झोप झाल्यामुळे मेंदूला आराम मिळतो. त्यामुळे सकाळी लवकर उठल्यावर तुमचा मेंदू अधिक कार्यक्षम होतो. एखादे काम करताना तुम्हाला थकवा अथवा कंटाळा येत नाही. जे काम करता ते पूर्ण लक्ष देऊन केल्यामुळे तुम्हाला लवकर यश मिळते. जर तुम्हाला जीवनात लवकर यशस्वी व्हायचं असेल तर लवकर उठणं फायदेशीर ठरू शकतं.

भुक चांगली लागते
सकाळी लवकर उठून व्यायाम केल्यामुळे तुम्हाला चांगली भुक लागते. सकाळी पुरेसा वेळ असल्यामुळे तुम्ही वेळेवर आणि पौष्टिक नाश्ता करू शकता. ज्यामुळे दुपारी आणि रात्री वेळेत भुक लागते आणि तुम्ही व्यवस्थित जेवता. ज्यामुळे तुम्ही जंकफूड आणि अहितकारक पदार्थ खाणे टाळता.

आजारपणापासून बचाव होतो
सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामाचे योग्य नियोजन करू शकता. पूजापाठ, ऑफिसला जाण्याची तयारी, नास्ता तयार करण्यासाठी पुरेसा वेळ असल्यामुळे तुम्ही तुमच्या व्यायामासाठी वेळ काढू शकता. सकाळच्या वेळी चालणे, धावणे, योगासने केल्यामुळे दिवसभर तुमचे शरीर कार्यक्षम राहते.

वेळेचा सदुपयोग होतो
झोप आणि दिवसभराची कामे यांचे गणित चुकल्यामुळे तुमची दिवसभर चिडचिड होत असेल तर सकाळी लवकर उठा. कारण लवकर त्यामुळे तुमची कामे लवकर पूर्ण होतील. सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्ही कामाचे नियोजन करू शकता. ज्यामुळे तुम्ही दिवसाच्या चोविस तासांचा योग्य सदूपयोग करू शकता.

सकाळी लवकर उठण्यासाठी काय करावे
रात्री झोपताना मनाला सूचना द्या की तुम्हाला सकाळी किती वाजता उठायचे आहे. कारण तुम्ही जे विचार रात्री झोपताना करता ते जीवनात साकार होत असतात. यामागे तुमच्या अंर्तमनाचे शास्त्र कामी येत असते.
सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न सोडून देऊ नका. जर तुम्हाला ठरविल्याप्रमाणे जाग आली नाही तर पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रयत्न करा.
मानसशास्त्रानुसार एखादी गोष्ट 21 वेळा केली तर त्या गोष्टीची सवय तुम्हाला लागू शकते. यासाठी सलग 21 दिवस लवकर उठण्याचा प्रयत्न करा.
एकदम पहाटे उठण्यापेक्षा सुरूवातीला तुमच्या नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास आधी उठण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे हळूहळू तुम्ही ठरविलेल्या वेळेवर उठण्याचे ध्येय गाठू शकता.
रात्री झोपताना बेडरूमच्या खिडकीचे पदडे सरकवून ठेवा. ज्यामुळे सकाळी तुम्हाला सुर्यप्रकाशामुळे लवकर जाग येईल.
दररोज रात्री वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा. अगदी सुट्टीच्या दिवशीपण वेळेवर झोपा आणि उठा. ज्यामुळे तुम्हाला वेळेवर झोपून सकाळी लवकर उठण्यासाठी सवय लागेल.
जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचे असेल तर रात्रीची गाढ झोप घेण्याचा प्रयत्न करा. माणसाला दररोज कमीत कमी सात ते आठ तासांची झोप घेण्याची गरज आहे. झोप पूर्ण झाली की सकाळी वेळेवर जाग येते.
दिवसाची झोप घेणे टाळा. कारण तुम्ही दिवसा झोप घेतली तर रात्री तुम्हाला लवकर झोप येणार नाही आणि सकाळी उठणे तुम्हाला कठीण जाईल.
झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ करा. ज्यामुळे तुमचे शरीर रिलॅक्स होईल आणि तुम्हाला चांगली झोप येईल.
रात्री झोपण्यापूर्वी जड आहार घेऊ नका. झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी हलका आहार घ्या. ज्यामुळे झोपताना तुमच्या पचनसंस्थेवर ताण न येता तुम्हाला शांत झोप येईल.
झोपण्यापूर्वी तुमच्या आवडीचे काम करा, आवडीचे पुस्तक वाचा अथवा मंद स्वरातील गाणी ऐका ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल.
संध्याकाळी सात नंतर मद्यपान, चहा कॉफी अशी उत्तेजक पेय घेणं टाळा कारण त्यामुळे तुमच्या झोपेवर विपरित परिणाम होऊ शकतो.
झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी टिव्ही, मोबाईल अथवा इतर गॅझेट्स वापरणे बंद करा. ज्यामुळे तुमच्या मेंदूला झोपण्याचा संकेत मिळेल.
झोपण्यासाठी आरामदायक गादी आणि उशी वापरा. कारण जर तुम्हाला झोपताना आरामदायक वाटले तर तुम्हाला गाढ झोप येऊ शकते.
रात्री झोपताना अती घट्ट कपडे घालू नका. सैल आणि सुती कपडे घाला.
सकाळी उशीरा उठण्याचे दुष्परिणाम 
पचनक्रिया बिघडते
दिवस कंटाळावाणा आणि निरुत्साही जातो
दिवसभर चिडचिड होते
कामाचा ताण आणि टेंशन येते
व्यायामासाठी वेळ काढणे कठीण जाते
सकाळचा नाश्ता अथवा ब्रेकफास्ट करण्यास वेळ मिळत नाही.
विनाकारण दगदग आणि धावपळ होते
शरीराचे आरोग्य बिघडते
केस आणि त्वचा निस्तेज होते

1. पहाटे लवकर उठल्याचे खरंच चांगले फायदे होतात का ?
होय, नक्कीच मात्र रात्री उशीरा झोपून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करू नका. कारण शरीराला पुरेशी झोप देखील मिळणं गरजेचं आहे. लवकर उठण्यासाठी लवकर झोपणंदेखील तितकच गरजेचं आहे. जर तुम्हाला रात्री झोपण्यास उशीर होत असेल तर झोप पूर्ण न करता लवकर उठण्याचा प्रयत्न करू नका.

2. सकाळी अर्लाम बंद करून पुन्हा झोपण्याची सवय कशी मोडावी ?
सकाळी लवकर उठण्यासाठी जर तुम्ही अर्लाम लावणार असाल तर तो तुमच्या बेडपासून दूर ठेवा. कारण सकाळी जाग आल्यावर तो बंद करण्यासाठी तुम्हाला बेडमधून बाहेर यावे लागेल. जर तुम्ही अलार्म जवळ ठेवला तर तो बंद करून तुम्ही पुन्हा झोपण्याची शक्यता अधिक असते.

3. उशीरा उठणारी माणसे जीवनात यशस्वी होत नाहीत का?
जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न आणि सकारात्मक विचार गरजेचे असतात. त्यामुळे ज्यांच्याकडे ते असतात ती माणसे जीवनात यशस्वी होतात. सकारात्मक विचारसरणी आणि वेळेचा सदूपयोग करण्यासाठी सकाळी लवकर उठणे फायदेशीर ठरते.

4. ब्रम्हमुहुर्तावर उठण्याचे काय फायदे होतात?
ब्रम्हमुहुर्तावर उठल्यामुळे तुमचे शरीर चक्र निसर्गनियमानुसार सुरू राहते. शिवाय यावेळी अभ्यास अथवा चिंतन केल्यास बुद्धी अधिक तीक्ष्ण आणि तेजस्वी होते.


उत्तर लिहिले · 5/4/2022
कर्म · 121765
0

ईश्वर आरोग्यदायी दिनचर्या हा लेख श्री. वा. ना. उत्पात यांचा आहे.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1820
0

तुमच्या प्रश्नाचा अर्थ स्पष्ट होत नाही. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा जेणेकरून मी तुम्हाला योग्य उत्तर देऊ शकेन.

उदाहरणार्थ:

  • "सेना न्हावी" म्हणजे काय?
  • तुम्ही नेमक्या कोणत्या आरोग्यदायी दिनचर्येबद्दल (Healthy Routine) विचारत आहात?

अधिक माहिती दिल्यास, मला तुम्हाला मदत करता येईल.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1820
4
दिवसाची दिनचर्या साधारणपणे कशी असावी? हा आपला प्रश्न आहे. सकाळी ब्रह्म वेळेवर उठून म्हणजे सकाळी तीन ते सहा च्या दरम्यान उठून एक तास योगा करावा व आपले शरीर निरोगी ठेवावे. नंतर स्नान करावे, शुचिर्भूत होऊन आपल्या इष्ट देवतेचे स्मरण, कीर्तन, ध्यान, धारणा, पूजन म्हणजे धार्मिक विधी करून आपल्या नोकरी/धंद्यावर जावे. प्रामाणिकपणे नोकरी/धंद्याशी रहावे. एक तरी पुण्याचं काम करावे.
उत्तर लिहिले · 4/12/2020
कर्म · 345
2
सकाळी उठल्यावर आपल्या डोळ्यावर झोप असते. आंघोळ केल्यामुळे आपले शरीर मोकळे होते. आपल्याला ताजेतवाने वाटते. तसेच आंघोळीमुळे आपल्या शरीराची स्वच्छता होते, त्यामुळे दुसरी कामं करताना स्वच्छता ठेवण्यास मदत होते. तसेच सकाळी एकदा अंघोळ केली की नंतर दिवसभर बाकीची कामं करण्यासाठी मोकळे राहता येते. त्यामुळे अंघोळ सकाळीच करणे योग्य आहे.
उत्तर लिहिले · 16/10/2020
कर्म · 18385