2 उत्तरे
2
answers
सुयेर म्हणजे काय?
0
Answer link
घरात बाळ जन्माला आल्यावर नवी 'सोयरीक' होते, म्हणून त्याला 'सोयर' म्हणतात. हे परंपरेने चालत आलेले नियम आहेत. ते वेगवेगळ्या समूहाचे वेगवेगळे असू शकतात. “पर्वा नाही” किंवा “ देणेघेणे नाही.” या अर्थी मराठीत “सोयरसुतक नाही” असा वाक्प्रचार वापरला जातो.
कारण असे आहे की स्त्रियांना आराम मिळावा या करिता सर्व काही
स्त्रियांना हे चार दिवस असे बंदिस्त ठेवणे अयोग्य वाटते, पण प्रसूती झाल्यावर आई व मुलाला सव्वा महिना सोयर (विटाळ) का असतो ह्याचा विचार करताना कोणी दिसत नाही. प्रसुतीसारख्या प्रखर परीक्षेतून बाहेर पडल्यावर नक्कीच सव्वा महिना आराम मिळायला हवा असे आपले धर्मशास्त्र सांगते, तेही चूकच आहे का मग? तसेच बालकाला दुध पाजणे, त्याची अतिशय काळजी घेणे हे आवश्यक असतेच असते पण शरीराची झालेली झीज, प्रसुतीत झालेल्या जखमा, नंतर वाहणारे दुषित रक्त ह्या सगळ्यातून सावरण्यासाठी हा काळ आरामाचा ठरवला गेला आहे. त्यावर बोलण्यास मात्र बरेच लोक तयार नसतात.
असे नियम नसते तर पाळीच्या काळात किवा प्रसुतीनंतर दुसऱ्याच दिवशी स्त्रीला कामाला जुंपले गेले असते. कदाचित फार पूर्वी असे झालेही असेल. त्यात अनेक स्त्रिया दगावल्या देखील असतील म्हणूनच तर हा नियम निर्माण केला गेला.
घरात शिवता-शिवत नको म्हणून (कारण घरात देव-देव्हाराअसतो) स्त्रीला एका ठिकाणी बसवून ठेवणे हे आता गमतीचे वाटत असले तरी पूर्वीच्या जीवनशैलीचा विचार केला तर ते स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक होते.
आता स्त्रिया नोकरी करतात. त्यांना असे महिन्याला चार दिवस सुट्टी असलेली नोकरी कोणी देणार नाही. स्वतंत्र कुटुंबात तिलाच घरातील कामे करावी लागतात. अशावेळी जे पूर्वीच्या प्रथा मानतात त्यांच्या मनात फार गोंधळाचे वातवरण निर्माण होते. असा गोंधळ होऊ देण्याची गरज नाही म्हणून हा लेखप्रपंच केला आहे. पण असे असले तरी स्त्रियांनी ह्या काळात कमी कष्टाची कामे करावीत. पतीनेही घरातील कामात पत्नीला मदत करावी हा संदेश ह्यामागे आहे. काळ बदलला आहे, आधुनिकतेमुळे जीवन बदलले आहे, पण स्त्री तीच आहे, कष्ट थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत पण कष्ट तर आहेतच. शिवाय मानसिक ताण वाढतो आहे. ह्या परिस्थितीत जुन्या प्रथांचे महत्व समजून घेणे महत्वाचे आहे.
विटाळाचे नियम न पाळल्याने देवाचा/देवीचा कोप असे काही होत नसते, पण एका स्त्रीला त्या कठीण प्रसंगात अतिकष्टाच्या कामाला जुंपणे हेही अयोग्य आहे. संसाराच्या गोडीत भले ती कष्ट करायला तयार असली तरीही तिनेही स्वतःवर संयम ठेवायला हवा
0
Answer link
सुयेर म्हणजे लग्नानंतर नववधूने पहिल्यांदा आपल्या सासरच्या घरी बनवलेला गोड पदार्थ. ही एक प्रकारची प्रथा आहे.
सुयेरामध्ये साधारणपणे खालील पदार्थ बनवले जातात:
-
लाडू
-
वरण
-
भात
-
पुरी
-
खीर
हा पदार्थ बनवण्यामागे नववधू आपल्या सासरच्या लोकांचे मन जिंकून घेईल आणि तिच्या हातच्या चवदार पदार्थांनी कुटुंबात आनंद निर्माण होईल, अशी भावना असते.
टीप: सुयेरामध्ये बनवले जाणारे पदार्थ हे कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलू शकतात.