शब्दाचा अर्थ शब्द

स्वयंम अध्ययन म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

स्वयंम अध्ययन म्हणजे काय?

1
स्वयंअध्ययन म्हणजे काय? अभ्यासासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच विविध विषयांचा अभ्यास करणे, दुसऱ्याच्या नोटस्‌ अथवा बाजारपेठेतील रेडिमेड नोटस्‌ न हाताळता स्वतःच्या नोटस्‌ तयार करणे होय. या व्यतिरिक्त वार्षिक, सहामाही, मासिक व दैनंदिन अभ्यासाचे नियाजन करणे. आकलन, साठवण व वेळच्या वेळी उजळणी करून अभ्यासात रममाण होणे म्हणजे स्वयंअध्ययन पद्धतीचा वापर करणे होय. या पद्धतीमुळे तरुणाच्या सर्वांगीण उन्नतीच्या शक्‍यता बळावतात.

सुरुवातीला या पद्धतीसाठी वेळ लागत असला, तरी काही दिवसांनी याचे फायदेच अधिक वाट्याला येतात. आजकाल अनेक क्‍लासेसमुळे मुलांची स्वयंअध्ययनाची सवयच संपत चालली आहे. केवळ मार्कांच्या फूटपट्ट्या लावून आपण जगातील समृद्ध ज्ञान समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. केवळ घोकंपट्टीच्या तंत्राने बोलके पोपट तयार होत असतीलही; पण या समाजाला चिंतनशील, अनुभवसंपन्न व ज्ञानी अधिकाऱ्याची गरज आहे. त्यासाठीच आयोगाकडून बदलण्यात आलेल्या अभ्यासक्रमात आकलनाला अन्यन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. या स्पर्धा परीक्षेत असाच विद्यार्थी स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतो. ज्याच्याकडे एकलव्यासारखी तळमळ, स्वयंअध्ययनाची पद्धती आणि चिकाटी आहे.

उत्तर लिहिले · 6/6/2022
कर्म · 48335

Related Questions

ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती येईल?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?
आधूनिक भारतात सर्व प्रथमता नागरिकत कशा प्रकारे घोषित झाली?
समतेचा अधिकार कसा स्पष्ट कराल?
'कृष्णावळ' म्हणजे काय?