2 उत्तरे
2
answers
पृथ्वीवर पाणी किती टक्के आहे आणि पृथ्वीवर ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे?
3
Answer link
पृथ्वीवर 71% पाणी आहे.
97% पाणी खारे आहे,आणि फक्त 3% पाणी पिण्यायोग्य आहे. 69% बर्फ ग्लेशियर रूपातले,तर 30% भूजल,आणि 1% जमिनीवर उपलब्ध पाणी.
पृथ्वीचा सुमारे ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने म्हणजे जलावरणाने व्यापला आहे. त्यामुळे या ग्रहाला ‘निळा ग्रह’ किंवा ‘जलरूप ग्रह’ असे संबोधले जाते. पृथ्वीवरील हे पाणी द्रवरूपात वा घनरूपात (हिम, बर्फ) आहे. जलावरणात महासागर (सुमारे ९३ टक्के), दोन्ही ध्रुवीय प्रदेशांवरील हिमबर्फ (सुमारे २ टक्के), जमिनीवरील व आतील पाणी (सुमारे ५ टक्के), वातावरणातील बाष्प (सुमारे ०.००१ टक्का) यांचा अंतर्भाव होतो. पृथ्वीवरील एकूण उपलब्ध पाण्यापैकी ९७.५ टक्के खारे पाणी आणि फक्त २.५ टक्के गोडे पाणी आहे. एकूण गोड्या पाण्यापैकी ६८.९ टक्के कायमस्वरूपी बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फ आणि हिमाच्या स्वरूपात, ३०.८ टक्के भूमिगत पाण्याच्या स्वरूपात आणि फक्त ०.३ टक्के पाणी नद्या, नाले, सरोवरे, जलाशय इत्यादीमध्ये आढळते.
महासागर, भूमिजल, खडकांच्या पोकळ्यांतील व खनिजांमधील पाणी, हिमनद्या तसेच हिम-बर्फ यांतील गोठलेले पाणी, वितळलेल्या अग्निज खडकांतील वा शिलारसातील नवजात पाणी, उन्हाळ्यांमधील (गरम पाण्याच्या झऱ्यांमधील) व गायझरांमधील पाणी, तसेच नदी, नाले, सरोवरे, जलाशय, डबकी इत्यादींमधील पाणी यांचा जलावरणात अंतर्भाव होतो.
ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे.
ऑक्सिजन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. हे रासायनिक घटक आहे. प्राणिमात्रांच्या जीवनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे यास प्राणवायू असे सुद्धा म्हटले जाते. हा वायू सामान्य तापमानास वायुरूपात असतो. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे २१% आहे. त्याची त्याची रासायनिक संज्ञा ओ (O) आणि अणू क्रमांक ८ आहे. प्राणवायूच्या एका अणूमध्ये ८ प्राणु , ८ विजाणू आणि ८ न्यूट्रॉन असतात. हवेमध्ये ऑक्सिजन नेहमी रेणूच्या स्वरूपात आढळतो. याच्या एका रेणूमध्ये २ अणू असतात. त्यामुळे त्याचे रासायनिक सूत्र O2 असे लिहितात. ऑक्सिजन चॉकोजेन ग्रुपचा सदस्य आहे. वस्तुमानानुसार, ऑक्सिजन हा हायड्रोजन आणि हेलियमनंतर विश्वातील तिसरे सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. पृथ्वीच्या पिकाच्या अर्धा भाग हा घटक बनवतो.
0
Answer link
पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण:
- पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे.
- यापैकी 96.5% पाणी महासागर आणि समुद्रांमध्ये आहे.
- बाकीचे 3.5% पाणी गोठलेल्या स्वरूपात, नद्या, तलाव आणि भूगर्भात आहे.
पृथ्वीवर ऑक्सिजनचे प्रमाण:
- पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे 21% आहे.
- नायट्रोजन 78% आहे.
- आणि उर्वरित 1% मध्ये इतर वायू आहेत.
अधिक माहितीसाठी काही स्रोत: