3 उत्तरे
3
answers
'तज्ञ' आणि 'तज्ज्ञ', यातील कोणता शब्द बरोबर आहे? का?
1
Answer link
तज्ज्ञ हे बरोबर आहे.
तत् जानाति इति तज्ज्ञ.
अशी या शब्दाची संस्कृतमध्ये व्याख्या आहे.
याचा शब्दशः अर्थ ते जाणतो तो असा आहे. ते म्हणजे ज्याविषयी चर्चा चालू आहे ते.
नेत्ररोग तज्ज्ञ मध्ये ते म्हणजे नेत्ररोग.
जानाति हे क्रियापद ज्ञा या धातूपासून तयार झालेले आहे. ज्ञा धातूचेच ज्ञ हे एक रूप आहे. त्यामुळे तत् जानाति हे सांगण्यासाठी तत् + ज्ञ अशी संधी वापरली जाते. आणि संधीच्या नियमानुसार त् च्या पुढे ज्ञ आला असता त् चा ज् होतो. अशा प्रकारे तज्ज्ञ हा शब्द सिद्ध झाला आहे.
शास्त्रज्ञ किंवा विधिज्ञ हे शब्दही अशाच प्रकारे सिद्ध होतात, फक्त त्यात ज् हे व्यंजन नाही. याचे कारण असे, की यात ज्ञ च्या मागे त् सारखे कोणतेही हलंत व्यंजन नसून पूर्ण व्यंजन आहे.
शास्त्रज्ञ = शास्त्र जाणतो तो
आणि विधिज्ञ = कायदा जाणतो तो.
0
Answer link
'तज्ञ' आणि 'तज्ज्ञ' या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, परंतु 'तज्ज्ञ' हा शब्द अधिक योग्य आहे.
तज्ज्ञ:
- हा शब्द दोन अक्षरांनी बनलेला आहे: 'तत्' + 'ज्ञ'.
- 'तत्' म्हणजे 'ते' आणि 'ज्ञ' म्हणजे 'जाणणारा'.
- म्हणून, 'तज्ज्ञ' म्हणजे 'त्या गोष्टीचे ज्ञान असणारा' किंवा 'विशेष ज्ञान असणारा'.
तज्ञ:
- या शब्दात 'तत्' ऐवजी 'त' आहे, ज्यामुळे अर्थ बदलण्याची शक्यता आहे.
- काहीवेळा लोक 'तज्ञ' हा शब्द वापरतात, पण तो व्याकरणाच्या दृष्टीने योग्य नाही.
त्यामुळे, अधिकृत आणि व्याकरणाच्या दृष्टीने योग्य शब्द 'तज्ज्ञ' आहे.