2 उत्तरे
2
answers
सकारात्मक विचाराचे चिंतन कसे करावे?
2
Answer link
नकारात्मक विचारांच्या मालिकेतून सुटका करून घेण्यासाठी जेव्हा एखादा नकारात्मक विचार तुमच्या मनात येईल त्या वेळी लगेच जाणीवपूर्वक विचारांची दिशा बदला.जो नकारात्मक विचार तुमच्या मनात आला असेल त्या संदर्भातील सकारात्मक विचार लगेच तुम्ही तुमच्या मनात आणायचा .उदा. जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि तुमच्या मनात विचार आला कि रस्ता खराब आहे,टायर मध्ये एखादा खिळा जाऊन टायर पंक्चर झाला तर .... आणि ह्या पुढची अशी नकारात्मक विचारांची मालिका सुरु होण्याआधीच स्वताला रोखा आणि हा विचार करा कि " माझी गाडी सुरक्षित आहे ,माझा प्रवास सुरक्षित आहे आणि मी सुरक्षित आणि ठरलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी पोहचणार आहे."
ह्या विचाराने तुमच्या मनात सुरु व्हायला लागलेली नकरात्मक विचारांची मालिका थांबेल आणि सकारात्मक विचारांची मालिका सुरु होईल आणि तुमचा आत्मविश्वास कायम राहील.
आणि जो पर्यंत मनात आलेला नकरात्मक विचार जात नाही तोवर सकारात्मक विचार रिपीट करत राहा म्हणजेच चिंतन करा,
आणि त्याच सोबत जे तुम्हाला आयुष्यात मिळवायचं आहे त्यासाठी सकारात्मक विचारांचं चिंतन म्हणजेच अफीरमेशन ! ते तुम्ही रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर लगेच करू शकता.हे चिंतन करताना ते पूर्ण झाल्यानंतरच चित्र डोळ्यांसमोर सतत आणा त्यामुळे सवपन लवकर पूर्ण व्हायला मदत होईल.
0
Answer link
सकारात्मक विचारांचे चिंतन करण्यासाठी काही उपाय:
- कृतज्ञता व्यक्त करा: दररोज ज्या गोष्टींसाठी तुम्ही आभारी आहात, त्या गोष्टींची नोंद करा.
- सकारात्मक लोकांमध्ये राहा: जे लोक तुम्हाला प्रेरणा देतात आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतात, अशा लोकांच्या सोबत वेळ घालवा.
- सकारात्मक गोष्टी वाचा आणि ऐका: सकारात्मक पुस्तके वाचा, प्रेरणादेणारी भाषणे ऐका आणि सकारात्मक बातम्या पाहा.
- नकारात्मक विचार टाळा: नकारात्मक विचार मनात आले, तर त्यांना सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा.
- वर्तमानकाळात जगा: भूतकाळातील चुका आणि भविष्यातील चिंता सोडून वर्तमानकाळात लक्ष केंद्रित करा.
- ध्यान करा: नियमित ध्यान केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक विचार वाढण्यास मदत होते.
- स्वतःवर विश्वास ठेवा: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहा.
- नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा: नकारात्मक बातम्या, नकारात्मक चर्चा आणि नकारात्मक लोकांपासून शक्यतो दूर राहा.
- सकारात्मक दृष्टिकोन ठेवा: प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा.
- नियम बनवा: 'मी आनंदी आहे', 'मी निरोगी आहे', असे स्वतःला सांगा.
टीप: सकारात्मक विचार लगेच येत नाहीत, त्यासाठी नियमित प्रयत्न करणे आवश्यक आहे.