मानसशास्त्र सकारात्मक विचार

आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो याविषयी मत स्पष्ट करा?

2 उत्तरे
2 answers

आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो याविषयी मत स्पष्ट करा?

1
सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो', या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट कर

एखादी व्यक्ती काहीजणांना सुंदर दिसते. तर अन्य काहीजण ती सुंदर नाहीच, यावर पैज लावायला तयार होतात. हा व्यक्ति -व्यक्तींच्या दृष्टींतला फरक आहे. कोणत्या कारणांनी कोणती व्यक्ती कोणाला आवडेल हे काहीही सांगता येत नाही. त्याप्रमाणे कोणाला कशात आनंद मिळेल, हेही सांगता येत नाही. आनंदाच्या तहा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. पोस्टाची तिकिटे किंवा नाणी गोळा करण्याचा नेहमीचा छंद असलेली माणसे आपल्याला ठाऊक असतात. पण एकाला लोकांकडची जुनी पत्रे गोळा करण्याचा छंद होता. एकजण आठवड्यातून एकदा आसपासचा एकेकगाव पायी चालून यायचा. एकच सिनेमा एकाच महिन्यात सात-आठ वेळा पाहणारेही सापडतात. सिनेमातले सर्व संवाद त्यांना तोंडपाठ असतात. ते संवाद ते सिनेमाप्रेमी पुन्हा पुन्हा ऐकवतात. त्याला कोणता आनंद मिळत असेल? यावरून एकच दिसते की, प्रत्येकाची आनंदाची ठिकाणे भिन्न असतात. आनंद शोधण्याची वृत्ती भिन्न असते.

व्यक्तिव्यक्तींमधला हा वेगळेपणा आपण लक्षात घेतला तर समाजातील अनेकलक्षात घेतला, तर समाजातील अनेक भांडणे संपतील; समाजासमोरच्या समस्यासुद्धा सुटतील. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. आवडीनिवडी भिन्न असतात. हे वास्तव आपण ओळखले पाहिजे.

व्यक्तींची ही विविधता ओळखली पाहिजे. या विविधतेची बूज राखली पाहिजे. मग समाजात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी वस्तु निर्माण होतील. रंगीबेरंगी घटना घडत राहतील. समाजजीवन अनेक रंगांनी बहरून जाईल.
उत्तर लिहिले · 16/12/2021
कर्म · 121765
0

आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो, हे एक सत्य आहे. आनंद नेमका कशात आहे, हेObjectiv व्यक्तिनिष्ठ (Subjective) असते. त्यामुळे, दोन व्यक्तींना एकाच गोष्टीतून मिळणारा आनंद वेगवेगळा असू शकतो. किंबहुना, एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या वेळी, एकाच गोष्टीतून मिळणारा आनंद बदलू शकतो.

या विधानाला पुष्टी देणारे काही मुद्दे:

  • सकारात्मक दृष्टिकोन: ज्या व्यक्ती सकारात्मक विचारसरणीच्या असतात, ते नकारात्मक परिस्थितीतही काहीतरी सकारात्मक शोधू शकतात आणि आनंद घेऊ शकतात.
  • समाधान: ज्या व्यक्तींना जे आहे त्यात समाधान मानते, ती व्यक्ती अधिक आनंदी राहते.
  • तुलना टाळणे: स्वतःची इतरांशी तुलना करणे टाळल्यास असंतोष कमी होतो आणि आनंद वाढतो.
  • कृतज्ञता: आपल्या जीवनात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने आनंद मिळतो.
  • वर्तमानकाळात जगणे: भूतकाळातील दुःख आणि भविष्यातील चिंतांमध्ये न अडकता वर्तमानकाळात जगल्यास आनंद अनुभवता येतो.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1640

Related Questions

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर सगळं बदलतं का?
आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा?
सकारात्मक विचाराचे चिंतन कसे करावे?
पॉझिटिव्ह विचार कसे करावेत?
निसर्गात आनंद भरून राहिलेला आहे या विषयी तुमचे विचार कसे लिहाल?
खरे आनंदामुळे कोण कोणत्या गोष्टी घडतात?
आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो याविषयी महत्त्व स्पष्ट करा?