भारत बेरोजगारी अर्थशास्त्र

भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा?

2 उत्तरे
2 answers

भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा?

2
अतिरिक्त लोकसंख्या हे बेरोजगारीचे प्रमुख कारण सांगितले जाते . कारण सध्या भारताची लोकसंख्या दरवर्षी 2% ते 2.5% वाढत असल्याने अशा अतिरिक्त लोकसंख्या रोजगाराच्या संधी प्राप्त होत नाही . पर्यायाने बेरोजगारीत वाढत होत जाते . बेरोजगारी वाढण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे निरक्षरता होय .
भारतातील बहुतेक सर्व समस्यांचे मूळ हे लोकसंख्येच्या वाढीत आहे परंतू ह्या मुद्द्यावर कोणीच कधी बोलले नाही, बोलत नाही आणि बोलणार नाही कारण …. राजकारण..

१९४७ साली ४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची लोकसंख्या जर फक्त ७० वर्षात १३४ कोटी म्हणजे तिपटीपेक्षा जास्त वाढली असेल तर आजच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या युगात दुसरे काय होणार? स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंतचा कालावधी लक्षात घेतल्यास ह्या वाढीचा दर हा प्रतिवार्षिक १.७०% आहे जो लाजीरवाणा आहे. या वाढलेल्या लोकसंख्येचे अजून एक वैशिष्टय म्हणजे म्हणजे नुसती रिकाम्या डोक्यांची संख्या वाढली आहे ज्यात संभाव्य मानवी भांडवलाचा लवलेशसुद्धा नाही.

वाहतुकीच्या सिग्नलजवळ गाडी थांबली कि हात पसरून अनंत माशा घोंगावत असलेले अस्वच्छ तोंड वेंगाडत भारतमातेची अनेक बालके समोर भीक मागायला येतात. त्यात विशी-बाविशीची एखादी स्त्री सुद्धा असते जिच्या बोट पकडून एक पोर भीक मागत असते, एक कडेवर रडत बसलेले असते आणि एक पोटात असते. काय भविष्य असणार आहे या तीन भावी मतदारांचे आणि पुढे येऊ घातलेल्या त्यांच्या अनेक भावंडांचे ? एवढे करून ती बाई विवाहित असतेच असेही नाही …. कितीही लाजिरवाणे आणि ओंगळ वाटले तरीही हे आहे वास्तव वर्तमान सत्य. अगदी शिक्षण १००% फुकट केले तरीही ह्या पैकी किती बालके शाळेत जाणार आहेत? यांना सुद्धा एके दिवशी PAN कार्ड मिळेल आणि आधार सुद्धा मिळेल पण नोकरी काय म्हणून द्यायची ? बेरोजगारी आणि नंतर व्यसनाधीनता आणि शेवटी गुन्हेगारी या विळख्यातून यांची सुटका कशी होणार ?

१९४७ नंतर सरकारी नोकरी हाच सर्वात मोठा नोकऱ्यांचा स्त्रोत होता त्यानुसार सरकारी नोकरी मिळणे हे अनेक जणांच्या आयुष्याचे स्वप्न असायचे. अर्थातच ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत गेली त्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या वाढणे शक्यच नव्हते. नंतरच्या काळात खाजगी क्षेत्राची प्रगती सुरु झाली आणि खाजगी क्षेत्रात जोरदार भरत्या झाल्या. मात्र कधीनाकधी तिथेही नोकरीचा बाजार थंड होणारच होता आणि तो झाला. आता अतिरिक्त खर्चाचा विचार करून रिक्त झालेल्या सरकारी जागा भरल्या जात नाहीत आणि जास्तीत जास्त नफा मिळवणे हेच खाजगी क्षेत्राचे ध्येय असल्यामुळे तिथे भरत्या या नेहमीच सावधगिरीने केल्या जातात. तंत्रज्ञान बदलल्यामुळे ज्या कामास पूर्वी अनेक हातांची गरज भासायची त्या कामास आता एक संगणक आणि दोन प्रशिक्षित आत असले तरीही पुरेसे होतात. अशी परिस्थिती असताना वाढणाऱ्या हातांनी काय करायचे .. मग तेच हात … दुसऱ्याच्या खिशात जातात किंवा हातात दगड तरी घेतात … गुन्हेगारी.

पूर्वी एखाद्या माणसाची अगदी १०० एकर जमीन असली तरीही त्याला १० पोरे असतील तर प्रत्येकी १० एकरच जमीन मिळणार. पुढच्या प्रगत पिढीस जरी प्रत्येकी पाच पोरे असली तरी त्यांना प्रत्येकी दोन एकर जमीन उरली. आणि आता ब्रह्मज्ञान झाल्यासारखे जरी फक्त दोनच मुलांना जन्म दिला तरीही फक्त चार पिढ्यात १०० एकर जमिनीचा एक माणूस मालक होता हि परिस्थिती माणशी एक एकर पर्यंत ढासळलीच ना. शिवाय काळी आई - काळी आई म्हणत मातीला चिकटून बसले आणि लौकिक शिक्षण घेतले नाही त्यामुळे आता जमीन पुरत नाही आणि नोकरी मिळत नाही. मग कर्जमाफी आणि शिक्षण-नोकरीत आरक्षण आले ………………….. दुष्टचक्र आहे हे.
उत्तर लिहिले · 18/4/2022
कर्म · 121765
0

भारतातील बेरोजगारीची कारणे

भारतातील बेरोजगारीची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

1. लोकसंख्या वाढ:

भारताची लोकसंख्या खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे, रोजगाराच्या संधींची संख्या वाढीव लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडते.

2. शिक्षण प्रणाली:

आपली शिक्षण प्रणाली अजूनही पारंपरिक आहे. विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्ये आणि क्षमतांचा विकास योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे ते नोकरीसाठी तयार नसतात.

3. कृषी क्षेत्रावरील अवलंबित्व:

आजही भारतातील खूप मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतीमध्ये पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे अनेक लोक बेरोजगार राहतात.

4. औद्योगिक विकास:

भारतातील औद्योगिक विकास अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. नवीन उद्योग आणि व्यवसायांची वाढ कमी गतीने होत असल्यामुळे रोजगाराच्या संधींची निर्मिती कमी होते.

5. कौशल्य विकास कार्यक्रमांचा अभाव:

अनेक तरुणांना त्यांच्या गरजेनुसार योग्य प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळे, त्यांच्याकडे नोकरी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये नसतात.

6. सरकारी धोरणे:

काही सरकारी धोरणे उद्योगांना आणि व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरेशी नाहीत. त्यामुळे, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास अडथळा येतो.

7. सामाजिक कारणे:

जातीभेद, लिंगभेद आणि इतर सामाजिक कारणांमुळे काही लोकांना समान संधी मिळत नाहीत, ज्यामुळे बेरोजगारी वाढते.

8. पायाभूत सुविधांचा अभाव:

ग्रामीण भागात योग्य रस्ते, वीज, पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची कमतरता असल्यामुळे उद्योग आणि व्यवसायांचा विकास होत नाही, त्यामुळे बेरोजगारी वाढते.

9. तंत्रज्ञानाचा अभाव:

आजही अनेक उद्योगधंद्यांमध्ये जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्यामुळे उत्पादन क्षमता कमी होते आणि रोजगाराच्या संधी कमी होतात.

10. खाजगी क्षेत्रातील वाढ:

खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, परंतु त्या सर्वांसाठी पुरेशा नाहीत.

या सर्व कारणांमुळे भारतातील बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

रोजगाराच्या प्रश्नावर भाष्य करा?
बेरोजगारीचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम स्पष्ट करा?
बेरोजगारांसाठी जास्त असणारी राज्ये?
बेरोजगारी भत्त्याविषयी माहिती मिळेल का? भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांविषयी तरतुदी कशा स्पष्ट कराल?
तंत्रज्ञानातील बदलामुळे निर्माण होणारी बेरोजगारी?
बेकारी कमी होण्याची कारणे कशी स्पष्ट कराल?
बेकारीची कारणे कोणती आहेत?