शारीरिक तंदुरुस्ती आरोग्य विज्ञान

स्नायूंचा दमदारपणा म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

स्नायूंचा दमदारपणा म्हणजे काय?

1
१. स्नायू दमदारपणा : रोधाच्या विरोधात सातत्यपुर्णपणे उद्देशाप्रत कार्य करीत रहाणेच्या स्नायूंच्या क्षमतेस स्नायू दमदारपणा म्हणतात.

स्नायूंची ताकद व स्नायूंचा दमदारपणा

विकसित करण्यासाठी स्वतःच्या शरीराच्या वजनाचा  वापर करून विविध व्यायाम करता व घेता येतील.

उदाहरण: जोर दंडबैठक, पुशअप्स, वॉलपुशअप्स, डायमंडपुशअप्स, वाईडग्रीपपुशअप्स, क्लोजग्रीपपुशअप्स, पलंग व सोफा यांच्या मदतीने इनक्लाईन व डिक्लाइन पुशअप्स. स्कॅवाट, सुमोस्कॅवाट, नेरो व स्कॅवाट, लंजेस, सिटअप्स, क्रंचेस, प्लेकहोल्ड इत्यादी.

स्नायूंची ताकद व स्नायूंचा दमदारपणा विकसित करण्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या विविध वस्तूंचा वापर करून देखील वेगवेगळे व्यायाम करता येतात.

उदाहरण पाण्याच्या बॉटलचा वापर करून, उशीचा वापर करून, विटांचा वापर करून, खुर्चीचा वापर करून, व कुठलीही छोटी व जड वस्तूंचा वापर करता येतो. युट्युब (YouTube) वर टबाटा व्यायाम (Tabata workout) बघून करता व घेता येतील.

रुधिराभिसरण दमदारपणा) विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या ऊड्यांचा समावेश करता येतील. रुधीराभिसरण दमदारपणा विकसित करण्यासाठी कमी तीव्रतेने आणि २० मिनिटांपेक्षा जास्तवेळ व्यायाम / हालचालीकरणे आवश्यक असते.

उदाहरण: जम्पिंगजॅक्स, जागेवरच्या उड्या म्हणजेच स्पॉटजंप्स, स्टारजंप्स, स्प्लिटजंम्स, साइड टू साइडजंम्स, पाईकजंम्स, दोरउड्या (इत्यादी. जागेवर पळणे, किंवा घरात छोटया जागेवर एक ते पाच फुटाच्या अंतरावर पुढे मागे पळणे, हायनी, बटककिक्स, फ्रंटकिक्स, साईडकिक्स, वेगातबदल  करून जागेवरच पळणे, अशाप्रकारचे व्यायाम करता येतात.

जर घरात पायऱ्या असतील तर त्या पायऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारेस्टेप वर्कआऊट ) करता येतो. एरोबिक्स, झुंबा व डान्स एक्सरसाइज पण रुधिराभीसरण दमदारपणा विकसित करण्यास मदत करतात, व हे व्यायाम पण आपण ऑनलाईन / वर्म्युअल क्लासेस घेताना करू शकतो.

लवचिकत विकसित करण्यासाठी जागेवरचे वेगवेगळे ताणाचे  व्यायाम घेता येतात. काही योगासनांचे  प्रकार तसेच सूर्यनमस्कार घेता येतील.
*****************************************

स्नायू शरीरातील एक प्रकारचे पेशी समुह असतात. हे समुह हे अल्पावधीत आकुंचन पावतात आणि शिथिल होऊन पूर्ववत होतात. [१] यामुळे सजीवांना हालचाली करणे शक्य होते. मजबूत स्नायू आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव करतात.[२] स्नायूंवर मर्यादेपेक्षा अधिक भार पडतो तेव्हा स्नायू दुखावला जातो किंवा आखडतो. यासाठी मालिश केल्याने आराम पडतो. मालिश केल्याने रक्तप्रवाह तर सुधारतोच परंतु आखडलेले स्नायू सरळ होतात.[३] प्रथिनयुक्त अन्नपदार्थ स्नायूना मदत करतात व त्यांची चांगली वाढ होते. त्यामध्ये मांस, मासे, दूध आणि शेंगादाण्यासारखे द्विदल अन्न पदार्थ असावेत. भरपूर पाणी पिणे हे ही आवश्यक् असते.
उत्तर लिहिले · 15/4/2022
कर्म · 121765
0

स्नायूंचा दमदारपणा म्हणजे स्नायूंची जास्तीत जास्त ताकद वापरण्याची क्षमता. हे स्नायूंच्या आकारमानावर, त्यांच्यातील तंतूंच्या प्रकारावर आणि मज्जासंस्थेशी असलेल्या त्यांच्या संबंधावर अवलंबून असते.

स्नायूंच्या दमदारपणाचे फायदे:

  • शारीरिक हालचाली सुधारतात.
  • खेळ खेळताना चांगली कामगिरी करता येते.
  • वजन उचलणे आणि इतर शारीरिक कामे करणे सोपे होते.
  • शरीराची मुद्रा सुधारते.
  • हाडे मजबूत होतात.
  • वृद्धापकाळात स्वतंत्रपणे जगणे सोपे होते.

स्नायूंचा दमदारपणा वाढवण्यासाठी व्यायाम:

  • वेट लिफ्टिंग (Weight lifting)
  • पुश-अप्स (Push-ups)
  • स्क्वॅट्स (Squats)
  • lunges (लंज)
  • प्लँक (Plank)

टीप: कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

पोलिस व्हायचे आहे पण गोळाफेक जमत नाही, काय करू? जगावेसे वाटत नाही. लेखी परीक्षा चांगली जाते पण शारीरिक चाचणीत जमत नाही.
स्नायूंची ताकद म्हणजे काय?
सेक्स केल्याने रनिंगवर काय परिणाम होतो?
आरोग्याधिष्ठित सुदृढतेच्या दोन घटकांची नावे कोणती?
प्रास्ताविक हालचालीचे महत्त्वाचे दोन फायदे कोणते?
स्नायूंचे दमदारपण म्हणजे काय?
प्रास्ताविक हालचालींचे महत्त्वाचे फायदे स्पष्ट करा?