2 उत्तरे
2 answers

नम्रता म्हणजे काय?

2
नम्रता म्हणजे आपल्या विचारांचं कृतीतून अभिव्यक्त होणारं प्रतिरूपच असतं. नम्रता आपल्याला बऱ्याचदा आपल्या पात्रतेपेक्षाही प्रतिष्ठा, प्रेम, पत आणि पद देत असते. नम्रतेमुळेच आपण लोकांच्या हृदयाच्या समीप राहात असतो. कारण नम्रता आपल्या विचारांतून आणि कृतीतून नकळतपणे आपली ओळख सांगत असते.


नम्रता
तुकोबाराय म्हणालेत; ते किती खरं आहे.. लहानपणातच म्हणजे नम्रपणातच मोठेपण दडलेलं असतं. स्वभावातली नम्रता माणसाला यशाचं शिखर दाखवत असते.





महापुरे झाडे वाहती,

तेथे लव्हाळे वाचती।


तुकोबाराय म्हणालेत; ते किती खरं आहे.. लहानपणातच म्हणजे नम्रपणातच मोठेपण दडलेलं असतं. स्वभावातली नम्रता माणसाला यशाचं शिखर दाखवत असते.

तुम्ही किती ‘मोठे’ आहात हे तुम्ही किती नम्रतेनं वागता; यावरून ठरत असते. नम्रतेला उंची असते; प्रतिष्ठा असते. एक ओळख असते.

नम्रता म्हणजे लाचारी वा अगतिकता नव्हे. नम्रता म्हणजे आपल्या विचारांचं कृतीतून अभिव्यक्त होणारं प्रतिरूपच असतं.


नम्रता आपल्याला बऱ्याचदा आपल्या पात्रतेपेक्षाही प्रतिष्ठा, प्रेम, पत आणि पद देत असते. नम्रतेमुळेच आपण लोकांच्या हृदयाच्या समीप राहात असतो. कारण नम्रता आपल्या विचारांतून आणि कृतीतून नकळतपणे आपली ओळख सांगत असते.

नम्रता आपल्याला आंतरबाह्य व्यक्त करत असते. नम्रतेचे पाय मातीचे हवेत आणि हात मात्र संस्कारांचे हवेत. मग आपण खूप काही रुजवू शकतो, फुलवू शकतो, साकार करू शकतो.. नम्रतेमध्ये नकाजत हवी.. स्वाभाविकता हवी.. सहजगता हवी.. मग नम्रता भरभरून देत असते सर्वकाही मनासारखं.. मनसोक्त.


जगाचा आवाका असतो ज्यांच्या डोक्यात तीच डोकी झुकत असतात; इतरांसमोर..

झुकता वही हैं; जिस में जान होती हैं । अकडे रहना मुडदे की पहचान होती हैं ॥

आयुष्यात जे काही मिळवायचं असतं ते प्राप्त करण्यासाठी विनयशीलताच महत्त्वाची असते. म्हणूनच असं म्हटलं गेलंय ‘विद्या विनयेन शोभते’..

आयुष्यभर विद्यार्थी होऊन जगता आलं पाहिजे. ज्ञानवंतांना ज्ञानाची वेगवेगळी कवाडं उघडण्यासाठी नम्रता साहाय्यभूत ठरत असते. म्हणूनच एकलव्य होऊन अशक्यप्राय गोष्ट साध्य करता येते.


उत्तर लिहिले · 31/3/2022
कर्म · 121765
0

नम्रता म्हणजे विनयशीलता, सौम्यता आणि दुसऱ्यांचा आदर करणे.

नम्रतेचे काही पैलू:

  • विनयशीलता: स्वतःला कमी लेखणे नव्हे, तर आपल्या क्षमतांचा योग्य वापर करणे आणि अहंकार टाळणे.
  • सौम्यता: शांत आणि संयमी असणे, कठोर बोलणे टाळणे.
  • आदर: प्रत्येक व्यक्तीला मान देणे, त्यांच्या भावना आणि मतांचा आदर करणे.
  • सेवाभाव: दुसऱ्यांना मदत करण्याची तयारी ठेवणे.
  • क्षमाशीलता: इतरांच्या चुका माफ करण्याची वृत्ती.

नम्रता हा एक महत्त्वाचा गुण आहे जो आपल्याला सामाजिक संबंध सुधारण्यास आणि अधिक समंजस बनण्यास मदत करतो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1960

Related Questions

आपण शिस्त का पाळत नाही?
मी एका मुलीवर खूप प्रेम करतो, ती पण माझ्यावर खूप प्रेम करते, पण आमचं बोलणं दोन-तीन महिन्यांनी होतं. मग मला वाटतंय हे सगळं संपून टाकावं, कारण मला तिची सारखी आठवण येते?
दोन-तीन दिवसांपूर्वी एक जण मला खूप वाईट बोलला, त्या दिवसापासून माझ्या डोक्यात तेच चालू आहे की तो मला असं का बोलला?
मी समाज किंवा जग बदलण्याचा जसा विचार केला होता, हे जग तसे नाहीये?
ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या प्रभावी पद्धती आहेत? स्वाध्याय लेखनासाठी सविस्तर माहिती द्या.
कोणत्याही व्यक्तीकडे लगेच आकर्षण होण्याची कारणे काय असू शकतात?
ताणतणावाची कारणे काय आहेत? व्यक्तीच्या जीवनातील ताण-तणावाचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत?