युद्ध
डेटा सुरक्षा
तंत्रज्ञान
जर समजा विश्व युद्ध झाले, अमेरिकेत हल्ला झाला, Google Servers नष्ट झाले ज्यामध्ये आपला डेटा आहे ज्यामध्ये Google Pay, Blogger, Gmail, Drive आहे, हा डेटा आपल्याला परत मिळणार काय? जर असे खरंच होतं असेल, तर आपण काय केले पाहिजे? आपल्या ॲपचे काय होणार, माझ्या ब्लॉगचे काय होणार?
2 उत्तरे
2
answers
जर समजा विश्व युद्ध झाले, अमेरिकेत हल्ला झाला, Google Servers नष्ट झाले ज्यामध्ये आपला डेटा आहे ज्यामध्ये Google Pay, Blogger, Gmail, Drive आहे, हा डेटा आपल्याला परत मिळणार काय? जर असे खरंच होतं असेल, तर आपण काय केले पाहिजे? आपल्या ॲपचे काय होणार, माझ्या ब्लॉगचे काय होणार?
4
Answer link
गूगल किंवा इतर मोठ्या कंपन्या सगळा डेटा एकाच ठिकाणी ठेवत नाहीत.
त्यासाठी त्यांचे डेटा सेंटर संपूर्ण जगभर पसरलेले असतात आणि त्या सर्व डेटा सेंटरमध्ये हा डेटा आणि त्याची कॉपी ठेवलेली असते. म्हणजे जर एका ठिकाणी बॉम्बहल्ला झाला किंवा एखाद्या ठिकाणचे डेटा सेंटर नष्ट झाले तर संपूर्ण डेटा नष्ट होत नाही, दुसऱ्या ठिकाणावरून तो डेटा घेऊन गूगल परत पूर्ववत होईल आणि हीच गोष्ट बाकी सगळ्या क्लाऊड कंपन्यांची आहे. त्यामुळे असा काही प्रसंग आल्यास किंवा तिसरे महायुद्ध झाल्यास बॉम्ब हल्ल्यात सर्व डेटा नष्ट होईल असे म्हणणे चुकीचे ठरेल.
गुगलचे जगभर सुमारे 21 डेटा सेंटर आहेत आणि हे सर्व सेंटर जगभर वेगवेगळ्या शहरांमध्ये पसरलेले आहेत त्यातल्या बऱ्याच डेटा सेंटरचे अचूक पत्ते सार्वजनिक नाहीत त्यामुळे कोणी ठरवून सुद्धा बॉम्ब हल्ला करून सर्व डेटा नष्ट करु शकत नाही.
जर कुणी खरोखरच सर्व पत्ते सापडून त्या सर्व डेटा सेंटरवरच बॉम्ब टाकले, तर मात्र सर्व डेटा नष्ट होईल आणि गुगलला परत पहिल्यापासून डेटा जमा करणे सुरू करावे लागेल. अशा परिस्थितीत आपली एपीके किंवा इतर गोष्टी ज्या प्ले स्टोअरवर आहेत त्या नष्ट होतील परंतु जर डेव्हलपरने एपीके स्वतःकडे सेव्ह करून ठेवलेली असेल तर तो परत प्ले स्टोअर वर अपलोड करेन आणि अशा पद्धतीने परत तो डेटा तयार होईल.
या संदर्भात आणखी एक मजेशीर बाब आहे, ती म्हणजे अर्टिक कोड व्हॉल्ट प्रकल्प. GitHub वेबसाईटवरती जगातील जवळपास सर्व कंपन्यांचा कोड आहे आणि जसे उल्कापात होऊन हजारो वर्षांपूर्वी डायनॉसॉर नष्ट झाले आणि बहुतांश जीवसृष्टी नष्ट झाली तसा काही प्रकार झाल्यास हा कोड सुरक्षित राहावा म्हणून अंटार्टिका खंडामध्ये बर्फाच्या खाली एका ठिकाणी हा कोड हार्ड ड्राइव्हमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे. आणि त्या ठिकाणी नैसर्गिक कुठलीही आपत्ती आली तरी तो सुरक्षित राहील अशी व्यवस्था आहे. गिटहब आर्क्टिक कोड व्हॉल्ट हे आर्क्टिक वर्ल्ड आर्काइव्ह (AWA) मध्ये संरक्षित केलेली डेटा रिपॉझिटरी आहे, आर्क्टिक पर्वताच्या पर्माफ्रॉस्टमध्ये 250 मीटर खोलवर हे ठिकाण आहे. एका बंद पडलेल्या कोळशाच्या खाणीच्या जागेचा वापर या प्रकल्पासाठी केलेला आहे.
0
Answer link
जागतिक युद्धात अमेरिकेवर हल्ला झाल्यास आणि Google servers नष्ट झाल्यास तुमचा डेटा परत मिळण्याची शक्यता कमी आहे, परंतु काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता:
डेटा बॅकअप (Data Backup):
- तुमच्या Google Drive, Gmail, Photos आणि इतर डेटाचा नियमितपणे बॅकअप घ्या. तुम्ही तो डेटा हार्ड ड्राइव्ह (Hard drive), क्लाउड स्टोरेज (Cloud storage) किंवा इतर सुरक्षित ठिकाणी स्टोअर (Store) करू शकता.
- ऑफलाइन बॅकअप (Offline backup) असल्यास, इंटरनेट (Internet) नसतानाही तुम्ही तो डेटा ॲक्सेस (Access) करू शकता.
पर्यायी सेवा (Alternative services):
- Google च्या सेवांव्यतिरिक्त इतर सेवांचा वापर करणे सुरू करा. जसे की, Gmail ऐवजी Outlook, Google Drive ऐवजी Dropbox किंवा OneDrive वापरणे.
- तुमच्या ब्लॉगसाठी (Blog) वर्डप्रेस (WordPress) सारखे स्व-होस्टेड (Self-hosted) प्लॅटफॉर्म (Platform) वापरा, जेणेकरून तुमचा डेटा तुमच्या नियंत्रणात राहील.
सुरक्षितता आणि गोपनीयता (Security and privacy):
- तुमच्या खात्यांसाठी मजबूत पासवर्ड (Strong password) वापरा आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-factor authentication) सुरू करा.
- तुमच्या डेटाची सुरक्षा (Data security) करण्यासाठी नियमितपणे उपाययोजना करा.
ॲप्स (Apps) आणि ब्लॉग्स (Blogs) साठी उपाय:
- तुमच्या ॲप्सचा (Apps) डेटा आणि कोड (Code) सुरक्षित ठिकाणी ठेवा. GitHub किंवा Bitbucket सारख्या प्लॅटफॉर्मवर (Platform) बॅकअप (Backup) घ्या.
- तुमच्या ब्लॉगचा (Blog) डेटा नियमितपणे डाउनलोड (Download) करा आणि तो सुरक्षित ठिकाणी स्टोअर (Store) करा.
इतर उपाय:
- युद्ध झाल्यास डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपाययोजना केल्या जातात. त्यामध्ये सहभागी व्हा आणि जागरूकता वाढवा.
- तुमच्या परिसरातील लोकांना डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करा.
जर Google servers नष्ट झाले, तरी तुमच्या डेटाचा बॅकअप (Backup) असल्यास, तुम्ही तो डेटा इतर प्लॅटफॉर्मवर (Platform) रिस्टोअर (Restore) करू शकता. त्यामुळे, तयारी करणे महत्त्वाचे आहे.
Disclaimer: मी एक AI मॉडेल आहे आणि ही माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणत्याही गंभीर परिस्थितीत तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.