2 उत्तरे
2
answers
ऑक्सिजनची पातळी कशी वाढवायची?
0
Answer link
ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने दिला प्रोनिंग करण्याचा सल्ला, प्रोनिंगची पद्धत व लाभ काय?
जेव्हा शरीरातील ऑक्सिजनची पातळी 94 च्या खाली येईल तेव्हा कोरोनाच्या रूग्णांनी घरात विलगीकरणात राहून प्रोनिंग केली पाहिजे. प्रोनिंगची ही स्थिती वेंटिलेशनमध्ये सुधार करून रुग्णाचा जीव देखील वाचवू शकते. असं आम्ही नाही तर जागतिक आरोग्य मंत्रालय म्हणतंय, पण का?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की कोविड -१९ चे रूग्ण जे होम आइसोलेशनमध्ये आहेत त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. देशातील करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे त्यामुळे देशातील सर्वच रुग्णालये तणावाखाली आहेत. या कारणास्तव ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास डॉक्टरांनी स्वत: लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तो प्रोनिंग पद्धत ट्राय करू शकतो. होम आइसोलेशनमध्ये (home isolation) राहणा-या रुग्णांसाठी प्रोनिंग खूपच उपयुक्त आहे. यामुळे आयसीयूमध्ये राहणा-या रूग्णांमध्ये चांगले रिझल्ट्स दिसून आले आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनवरून गोंधळाचं वातावरण सुरू आहे. करोनाच्या रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे पण ऑक्सिजन अभावी दररोज कितीतरी रुग्ण दगावत आहेत. ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे आणि जे रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत त्यांच्यासाठी आरोग्य मंत्रालयाने प्रोनिंगच्या विविध पद्धती सुचवल्या आहेत. वास्तविकता प्रोनिंग कोरोना रूग्णांसाठी एक चांगली पद्धत आहे. होम आइसोलेशनमध्ये राहून रुग्णाने हे केले तर तो शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारू शकतो. चला तर जाणून घेऊया आरोग्य मंत्रालयाने सुचवलेला हा उपाय प्रोनिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कसे करावं?
प्रोनिंग म्हणजे काय?
प्रोनिंगची ही पोझिशन श्वासोच्छवास घेण्यास आरामदायक आणि ऑक्सिकरण सुधारण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध अशी आहे. यात रूग्णाला पोटावर झोपवले जाते. ही प्रक्रिया 30 मिनिटे ते दोन तासांची असते. असे केल्याने फुफ्फुसांमधील ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने होते, ज्यामुळे ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये सहजपणे पोहोचतो आणि फुफ्फुसे चांगले कार्य करण्यास सुरूवात करतात. ऑक्सिजनेशनमध्ये 80% पर्यंत ही प्रक्रिया यशस्वी मानली गेली आहे. तज्ञांच्या मते, रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागताच रुग्णालयात धावण्याऐवजी ही प्रक्रिया योग्य वेळेत केली पाहिजे. प्रोनिंग स्थिती आणखी बिकट होण्यापासून बचाव करू शकते.
प्रोनिंग करण्याची योग्य पद्धत
प्रोनिंगसाठी सुमारे चार ते पाच उशांची आवश्यकता असते
सर्वप्रथम पलंगावर नेऊन रुग्णाला पोटावर झोपवा
पुढच्या बाजूला गळ्याखाली एक उशी ठेवा
पुढे, एक किंवा दोन उशा समान स्थितीत मान, छाती व पोटाखाली ठेवा
उर्वरित दोन उशा पायाच्या पंजाखाली दाबून ठेऊ शकता
लक्षात ठेवा की या काळात करोना रुग्णाने दीर्घ व लांब श्वास घेत राहिलं पाहिजे
सुमारे 30 मिनिटे ते दोन तासांपर्यंत या स्थितीत राहिल्यास रुग्णाला खूप आराम मिळतो. पण लक्षात ठेवा की 30 मिनिटे ते दोन तासांदरम्यान रुग्णाची पोझिशन बदलणे आवश्यक आहे. यावेळी रुग्णाला उजव्या किंवा डाव्या बाजूला वळून झोपायला लावू शकता.
प्रोनिंग करताना घ्या या गोष्टींची काळजी
खाल्ल्यानंतर लगेचच प्रोनिंग करणं कटाक्षाने टाळा
आपण हे दररोज विविध चक्रांत 16 तास करू शकता. यामुळे खूप आराम मिळेल
ही प्रक्रिया करत असताना जखमा आणि मार लागलेला असल्यास लक्ष द्या
दबाव क्षेत्र बदलण्यासाठी आणि त्यांना आराम देण्यासाठी उशा अॅडजस्ट करा
प्रोनिंग कधी करू नये?
महिलांनी गरोदरपणात प्रोनिंग करणं टाळलं पाहिजे
गंभीर कार्निक हार्ट स्थितीत प्रोनिंग करू नये
जर पाठीच्या मणक्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल किंवा पेल्विक फ्रॅक्चर असेल असेल तर प्रोनिंगचे दुष्परिणाम दिसू शकतात
जेवणानंतर ताबडतोब प्रोनिंग प्रक्रिया करणं टाळा
संतुलित आहार हाच ठोस उपाय! शरीर निरोगी ठेवण्यासाठी 'या' सोप्या गोष्टी ठेवा लक्षात ठेवा.
नियमित व्यायाम केल्यास तसंच आहारा पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. यासाठी आपण आहारतज्ज्ञ तसंच जिम ट्रेनरचा सल्ल्यानुसार काही नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे.
- आहारात फळे व भाज्यांचा समावेश करा
- जास्तीत जास्त पाणी प्या
- जंक फूड वर्ज्य करा
- नियमित व्यायाम करा
कोरोना महामारीमुळे सध्या काळ अनेक आव्हानांनी भरलेला आहे. सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने बरेच नोकरदार घरातून काम करत आहेत. त्यात उन्हाळा सुरू झाल्यामुळे उष्णतेचे आजार वाढण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे. परंतु, यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही.
कोरोना काळात आहारात करण्यामागे दोन गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहेत. एकतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहाराची आवश्यकता आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे लोकांची बदललेली जीवनशैली. लॉकडाउनमुळे लोकांच्या हालचालींवर बंधनं आली आहेत. सकाळचा व्यायाम, रोजचं जॉगिंग बंद झालं आहे. वर्क फ्रॉम होममुळे घरात एकाच जागेवर बसून कामे होत आहेत. त्यातून विरंगुळा म्हणून टीव्ही पाहणे, पुस्तके वाचणे, मोबाइलवर चॅट करणं, म्हणजे पुन्हा बैठी कांच होत आहेत. अशावेळी वजन वाढणे, थोडीशी हालचाल केली तर लगेच दम लागणं अशा समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास आहारात बदल आवश्यक आहे
आहारात फळं आणि भाज्यांचा भरपूर समावेश करावा. तसंच धान्ययुक्त पदार्थ खाण्यावर भर द्यावा. मका, गहू, ज्वारी, बाजरी तसंच हातसडीच्या तांदळात फायबर असल्यामुळे चांगल्या पचनप्रक्रियेसाठी हे पदार्थ उपयुक्त ठरतात.
आहारातील साखर आणि मीठाचं प्रमाण कमी करावे. मीठाचं प्रमाण साधारण पाच ग्रॅम प्रतिदिन म्हणजे साधारण एक चमचा प्रतिदिन इतकं असावं. मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, फळांचे रेडिमेड रस, एनर्जी ड्रिंक्स शक्यतो टाळावीत. त्याऐवजी फळे खावीत.
जंक फूड, बाहेरचे खाद्यपदार्थ, तेलकट, तुपकट पदार्थ खाऊ नयेत. यामुळे रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होऊ शकतो. शक्यतो घरात तयार केलेल ताज्या अन्नाचं सेवन करावं.
नियमित पाणी प्यावे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण राखणं फार आवश्यक आहे. त्यामुळे जस वेळ मिळेल तरं पाणी नियमितपणे प्यावे. शक्यतो साखरयुक्त किंवा प्रक्रिया केलेले पाणी पिऊ नये. पाणी उकळून पिणं सर्वात उत्तम.
'क' आणि 'ड' जीवनसत्त्वासाठी आहारामध्ये फळांचा समावेश करावा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया योग्यरित्या होईल आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढेल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे बंद करावं.
नियमित व्यायाम आवश्यक
संतुलित आहाराबरोबर नियमित व्यायामदेखील चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्य आहे. लॉकडाउनमुळे घराबाहेर पडणं शक्य नसल्याने घरच्या घरी व्यायाम करावा. ट्रेडमिल किंवा एक्सरसाइज सायकलवरही व्यायाम करता येतो.सर्वात उत्तम आणि कमी खर्चिक पर्याय म्हणजे दोरीवरच्या उड्या. सूर्यनमस्कार हाही एक सोपा आणि घरच्या घरी करता येण्याजोगा पारंपरिक व्यायाम आहे. याशिवाय पीटीचे व्यायाम, सांधे व हातपाय हलवण्याचे व्यायाम तसंच योगासनांमध्ये प्राणायाम, भस्त्रिका, कपालभातीचा सराव केल्यास श्वसनसंस्था निरोगी राहण्यास मदत मिळते आणि कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतेय
0
Answer link
ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी काही उपाय:
1. श्वासोच्छ्वास व्यायाम:
- दीर्घ श्वास (Deep breathing): दीर्घ श्वास घेतल्याने जास्त ऑक्सिजन शरीरात जातो.
- ओठ दाबून श्वास घेणे (Pursed-lip breathing): यामुळे फुफ्फुसातून कार्बन डायऑक्साइड बाहेर काढण्यास मदत होते.
2. योग्य आहार:
- लोहयुक्त पदार्थ खा: पालक, डाळिंब, आणि खजूर यांसारख्या पदार्थांचे सेवन करा.
- व्हिटॅमिन सी: आवळा, लिंबू, संत्री यांसारख्या व्हिटॅमिन सी युक्त फळांचे सेवन करा.
3. जीवनशैलीत बदल:
- धूम्रपान टाळा: धूम्रपानामुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होते.
- नियमित व्यायाम: व्यायामामुळे श्वासोच्छ्वास सुधारतो आणि ऑक्सिजनची पातळी वाढते.
- पुरेशी झोप: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
4. डॉक्टरांचा सल्ला:
- जर ऑक्सिजनची पातळी खूपच कमी असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करा.
5. नैसर्गिक उपाय:
- घरात हवा शुद्ध ठेवणारी झाडे लावा: उदाहरणार्थ, तुळस, चंदन, लिली.
टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. वैद्यकीय सल्ल्यासाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.