मराठी स्त्री संत कवयित्री
तुकारामांच्या समकालीन वारकरी संप्रदायात, स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई ,कान्होपात्रा जनाबाई ,वेणाबाई ,आक्काबाई , बहिणाबाई यांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांच्या अभंग रचना या सर्वसामान्य स्त्रीला आपल्याशा वाटणाऱ्या असल्याने ,जात्यावरच्या ओव्या दळणकांडण करतांना म्हटल्या जायच्या. दररोजच्या उपयोगातील आणि व्यवहारातील प्रसंगांना अनुसरून केलेल्या या अभंग किंवा ओव्याची रचना जनसामान्यांना जास्त आपलीशी वाटणारी आणि नकळत काहीतरी शिकवण देणारी होती.
यातील संत जनाबाई यांचा काल म्हणजे इसवी सन १२५८ ते १३५०. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावात दमा आणि करूंड यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. “माझ्या वडिलांचे दैवत l तो हा पंढरीनाथ ll”या त्यांच्या ओळी मुळे त्यांचे वडील हे पण पांडुरंगाचे भक्त होते लक्षात येतं. महाराष्ट्रात खेडोपाडी जात्यावर दळण कांडण करताना त्यांच्या ओव्या म्हटल्या जातात नामदेवांचे वडील दामू शेठ शिंपी यांच्याकडे नोकरीला जनाबाईंना त्यांच्या वडिलांनी पाठवले त्यामुळे त्या त्यांच्या कुटुंबाचा घटकच बनल्या आणि म्हणूनच स्वतःला “नामयाची दासी “म्हणू लागल्या. नामदेवांच्या सहवासात विठ्ठल भक्तीची आज त्यांना लागली आणि दळीता कांडिता तुज गाईन अनंता असे त्या म्हणू लागल्या नामदेव हे अध्यात्मिक गुरु त्यांचा सत्संग त्यांना लाभला विठु माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा अशा काव्य पंक्ती त्यांना सुचल्या. ज्ञानदेवांबद्दल भक्तिभाव अनन्यसाधारण होता.
परलोकी चे तारू l म्हणे माझा ज्ञानेश्वरू ll असे त्यांच्याबद्दल त्या लिहितात. गवऱ्या शेण्या वेचताना इतर काम करताना नामस्मरण सतत चालू राहत होते आणि ३५० अभंग हे सकल संत गाथा या एका ग्रंथांमध्ये त्यांचे एकत्रित झालेले आहे. अभंगाचा विषय हा कृष्ण जन्म, थाळीपाक , प्रल्हाद चरित्र बालक्रीडा या विषयांवरचे आहेत हरिश्चंद्राख्यान नामक आख्यान रचना पण त्यांच्या नावावर आहे.
थाळीफेक व द्रौपदीस्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महा कवी मुक्तेश्वर यांना स्फूर्ती मिळाली होती .भक्ती ,निष्काम कर्मयोग ,संपूर्ण शरणागती यातून त्यांच्या अभंगरचना स्फुरतात संत नामदेव ज्ञानदेव चोखोबांच्या भावा सामर्थ्याचे अनुसरण आणि विठ्ठल वापरत असलेली भक्तिभाव त्यांच्या काव्यात पूर्ण भरलेला आहे त्यांच्या जीवनातील अनंत अनुभूती रचनांमधून येतात.
संतांबरोबरच समाज प्रबोधन आला हात लावणाऱ्या अनेक स्त्री संतांपैकी संत मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांच्या धाकट्या बहीण असं असलं तरी त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं त्यांनी रचलेले ताटीचे अभंग हे त्यांच्या नावावर दोन नोंदवलेले आहेत त्यात त्यांनी ज्ञानदेवां ना काही बोध दिला . त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत्या त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचे लेखन केले आहे असे संशोधकांनी स्पष्ट केले या ग्रंथात संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा माता-पित्यांचा देहत्याग ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाई दिलेली सनद विसोबा खेचर यांचे शरण येणे हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग आहेत मुक्ताबाईंनी चांगदेवांना पासष्टी चा अर्थ सांगितला नंतर चांगदेव महाराज मुक्ताबाई चे पहिले शिष्य झाले गोरक्षनाथांच्या कृपेने मुक्ताबाई ना अमृत संजीवनी ची प्राप्ती झाली सर्वांच्या जीवनाच्या अनुषंगाने येणारे उल्लेख अर्थपूर्णता आणि समाजाभिमुखता यामुळे त्यांचे अभंग समाजातील सगळ्यांना आपलेसे वाटणारे आहेत.
संत सखुबाई कृष्णा नदीच्या काठी कराड गावी राहणारी घरातील सासू व नवरा यांचे अत्याचार सहन करणारी पण वेळोवेळी धावा करताच भगवंत खऱ्या भक्तीला धावून येतो त्याप्रमाणे प्रत्येक वेळी धावून आला भक्तिभाव सहनशीलता आणि कुठल्याही जीवा विषयी वाटणारी तळमळ संतान मधली साम्यस्थळे म्हणता येतील. कान्होपात्रा या वारकरी संप्रदायातील इसवीसन पंधराव्या शतकातील एक प्रमुख संत कवयित्री होऊन गेल्या. त्यांचा जन्म पंढरपूर जवळील मंगळवेढा या ठिकाणी एका गणिकेच्या पोटी झाला.
अनेक धनदांडग्यांना अमीर उमराव जान ना खूश करण्याचे काम शामा नायकीण करीत असे. अशा अशा या शामाने तिच्या पोटी सुरेखशी कन्या जन्माला आली जणू चिखलात कमळ उघड उमलले तिचे नाव कान्होपात्रा असे ठेवले. परंतु तिला पूर्व पुण्याईमुळे लहानपणापासूनच विठ्ठलाच्या भक्तीची ओढ होती गावातील वारकऱ्यांना समोर व्यक्ती पंढरपुरी जात असे आणि त्यामुळे आईचा व्यवसाय पुढे न्यावा असा विचार देखील तिला शिवला नाही. या पंढरीच्या वारीतच कान्होपात्रेला संतसंग लाभला. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींची भेट झाली आणि त्यामुळे ती पुरती बदलली आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि सतत हरी नामात दंग राहणं कीर्तन करणं या गोष्टी तिला आवडू लागल्या. परंतु अतिशय सुंदर असलेल्या या कान्होपात्रा ची ख्याती दूर पर्यंत पोहोचत होती स्वतःच्या शीलाचे रक्षण करण्यासाठी कानोपात्रा वेश बदलून वारीत सहभागी झाली आणि पंढरपुरी पोहोचली विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवून आपले रक्षण करण्यासाठी तिने आर्त विनवणी केली.
नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरीयेले मजलागी जाहले तैसे देवा
मोकलूनी आस जाहले उदास घेई कान्होपात्रेस हृदयात
बिदरच्या बादशहाच्या सरदारांनी थेट पंढरपूरच्या मंदिरापर्यंत तिचा पाठलाग केला आणि कान्होपात्रेला हवाली करण्यासाठी फर्मावले अन्यथा मंदिर उध्वस्त करण्याची धमकी दिली . मंदिराचे विश्वस्तांनी तिला हवाली करण्याचे ठरवले. तेव्हा तिने मान्यता दिली. परंतु शेवटी एकदा पंढरीरायाचे पायाला मिठी मारू देण्याचे कबूल केले. आणि तेव्हा त्या क्षणी तिने त्याच्या पायाशी प्राणत्याग केला.
तुकारामांच्या समकालीन वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि त्यांच्या शिष्या म्हणजे संत बहिणाबाई संत बहिणाबाई यांचा कार्यकाल१६२८–१७०० .कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे त्यांचा जन्म झाला. जानकी व आवजी कुलकर्णी या दांपत्याच्या पोटी यांचा जन्म झाला आणि वयाच्या केवळ पाचव्या वर्षी त्यांचा रत्नाकर पाठक म्हणून गावाजवळील एका छोट्या खेड्यात विवाह झाला .त्यांना दोन मुले झाली. परमार्थ व भक्तीची ओढ लहानपणापासूनच होती. कथा ,कीर्तने, पुराणे ,श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात तिचा जीव रमत असे .घरची गरिबी , शिक्षणाचा अभाव पण समाधानी वृत्ती व संत वृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीस, अखंड नामस्मरण चालू असताना ,शेतात काम करत असताना त्यांचा भक्तिभाव अभंगाचे रूपाने बाहेर पडला. जगण्याचे खूप मोठे तत्त्वज्ञान एवढ्या न शिकलेले असलेलया ,तिच्या तोंडून बाहेर पडत होते याचं कारण हा भक्तिभाव .जयराम स्वामींच्या कथा कीर्तनाच्या प्रभावातून त्या तुकारामांचे अभंग म्हणू लागल्या. तुकाराम दर्शनाचा ध्यास घेऊन त्यांच्याकडून अनुग्रह व आशीर्वाद घ्यायचा होता. तुकोबारायांचे वाईट वैकुंठ आगमन झाल्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष भेट झाली नाही. तेव्हा त्यांची निष्ठा पाहून तुकोबांनी स्वप्नात येऊन साक्षात दर्शन आणि गुरुपदेश त्यांना दिला. त्यामुळे बहिणाबाईंचे जीवनच बदलून गेले .तुकाराम महाराजांविषयी प्रत्यक्ष माहिती असलेल्याचे अभंग असल्याने त्यांना खूप जास्त महत्त्व आहे .आपले गुरु तुकाराम महाराज आणि त्यांची गुरुपरंपरा आपल्या अभंगात त्यांनी वर्णन केलेली आहे. संत दासगणू सुद्धा म्हणतात कि ,”पहा केवढा अधिकार….. ऋणी तिचा परमेश्वर.” . त्यांच्या अभंगां पैकी ,”संत कृपा झाली l इमारत फळा आली l ज्ञानदेवे रचिला पाया l उभारिले देवालया ll नामा तयाचा किंकर l तेणे विस्तारलेले आवारl जनीजनार्दन एकनाथ l तुका झालासे कळस l भजन करा सावकाश l बहिणा फडकती ध्वजा l तेरे रूप केले ओजा ll
ही प्रसिद्ध रचना त्यांचीच आहे 732 अभंग प्रकाशित झाले .”घट्ट फुटली आवरी ,नभाचे अंतरित” हा शेवटचा अभंग त्यांनी लिहिला आणि नंतर त्या समाधीस्त झाल्या.