कला सामान्य ज्ञान भांडी

बालाथल येथे मोठ्या प्रमाणात कोणत्या भांड्यांचे उत्पादन होते?

3 उत्तरे
3 answers

बालाथल येथे मोठ्या प्रमाणात कोणत्या भांड्यांचे उत्पादन होते?

1
बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे उत्पादन होत होते.

त्याचा पुरवठा आहाड संस्कृतीच्या इतर गाव- वसाहतींना केला जात होता.

आहाड संस्कृतीच्या मातीच्या भांड्यांमध्ये काळी आणि तांबडी भांडी महत्वाची आहेत.ती चाकावर घडवलेली असत.त्यांचा आतील भाग आणि तोंडाजवळचा भाग काळा आणि उरलेला भाग तांबडा असे. 

 मातीच्या भांड्याबरोबरच मातीचे बैल, शंखांच्या वस्तू, दगडी पाती, छिन्न्या, बाणाची अग्रे, तांब्याची हत्यारे यासारख्या वस्तू मोठ्या प्रमाणात मिळाल्या.

 बालाथल येथील घरे पक्क्या विटांची (इंग्लिश बॉण्ड पद्धत) बांधली होती.

बालाथलभोवती तटबंदी होती. हडप्पा संस्कृतीशी असलेल्या संबंधाचा पुरावा आहे.

हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडूनच तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावेत,असे दिसते.

तांबे वितळवून ते शुद्ध करण्याचे ज्ञान त्यांच्याकडे होते.

राजस्थानातील खेत्री येथील तांब्याच्या खाणींमधून हे लोक तांबे मिळवत होते.
उत्तर लिहिले · 2/12/2021
कर्म · 121765
0
दगड
उत्तर लिहिले · 17/11/2022
कर्म · 0
0

बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर खालील भांड्यांचे उत्पादन होते:

  • तांबडी मातीची भांडी
  • लाल रंगाची भांडी
  • काळ्या रंगाची भांडी

ही भांडी विविध आकारात आणि प्रकारात बनवली जात होती.

संदर्भ:

राजस्थान जी.के.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1220

Related Questions

पितळेच्या भांड्यात स्वयंपाक कसा करावा? कढी किंवा टोमॅटो असलेल्या भाज्या केल्याने पितळी भांडी खराब होतात का?
स्वयंपाक करण्यासाठी कोणती भांडी वापरणे फायदेशीर आहे, स्टील की लोखंडी?
अशी कोणती वस्तू आहे जी आपण खाण्यासाठी घेतो पण खात नाही?
बासुंदी बनवताना भांडे कोणत्या धातूचे वापरावे?
नॉनस्टिक भांडी वापरताना काय काळजी घ्यावी?
फिरकीचा पितळी तांब्या विकत कुठे मिळेल?